उन्हाळ्यात आपल्याला थंडगार-गारेगार पदार्थ खावेसे आणि प्यावेसे वाटतात.(Rose water drink recipe)वाढत्या उकड्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण अनेक पदार्थांचे सेवन करतो. (How to make gulab sharbat at home)चहाऐवजी आपण थंडगार पेय पिण्यास प्राधान्य देतो. आपल्या घरात लिंबाचे, आवळ्याचे, कोकमचे सरबत हमखास पाहायला मिळते. (Summer cold drink for dehydration)बागेमध्ये गुलाबाच्या फुलांना देखील फुले आली असतीलच. आता इतक्या फुलांचे काय करावे असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर आपण घरीच गुलाबाचे सरबत तयार करु शकतो. (Refreshing rose sharbat recipe)गुलाबाचे फुल दिसायला जितके सुंदर तितकेच जास्त त्याचे सरबत चवीला छान लागते. दाटसर-घट्ट जेलसारखे सरबत तयार करुन रुह अफजा तयार केला जातो. (Homemade rose water summer drink) हे आपण फालुदा किंवा आईस्क्रीमसारख्या इतर पदार्थांमध्ये चवीने खातो. परंतु, घरच्या घरी गुलाबाचे सरबत करायचे असेल तर काय करावे. कशा पद्धतीने बनवावे पाहूया. इतकेच नाही तर हे वर्षानुवर्षे टिकते, त्यामुळे खराब होण्याची शक्यता देखील कमीच असते. (Natural drink to beat the heat)
मैदा-पाव नको!शिळ्या चपातीचे करा दाबेली रॅप,चवदार स्ट्रीट फूड रेसिपी
साहित्य
गुलाबाच्या पाकळ्या - ३०० ग्रॅमबर्फ - आवश्यकतेनुसार पुदीन्याची पाने -१ कप साखर - २ कप पाणी - २ कप सायट्रिक ॲसिड/ लिंबाचा इसेन्स - १/४ कप रोझ इसेन्स - १/२ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी गुलाबाच्या पाकळ्या वेगळ्या करा. आता एका बाऊलमध्ये गुलाबाच्या पाकळ्या, बर्फ, पाणी आणि पुदिन्याची पाने घाला.
2. आता पाणी गाळून दुसऱ्या भांड्यात काढा. त्यात साखर घालून मिक्स करा.
3. गॅसवर कढई ठेवून त्यात २ कप पाणी घाला, त्यात साखर घातलेल्या गुलाबाच्या पाकळ्या शिजवून घ्या. काही वेळाने पाण्याचा रंग हलका गुलाबी होईल.
4. आता या पाण्यामध्ये सायट्रिक ॲसिड घाला, थोड्यावेळाने पाण्याचा रंग बदलेल. आता पाणी गाळून घ्या.
5. थंड झाल्यानंतर तयार गुलाबाचे पाणी घट्ट होईल. आता त्यात रोझ इसेन्स घाला. काचेच्या भरणीत भरुन फ्रीजमध्ये ठेवा.
6. हा गुलाबाचा अर्क आपण हवा तेव्हा सरबत बनवून पिऊ शकतो.