श्रावण महिना सुरु झाला की, अनेकजण उपवास करतात.(Shravan Fast Food) श्रावणातल्या महिना विविध सण-उत्सव आल्याने घरातील अनेक मंडळीचे उपवास असतात.(Healthy Shravan dish) त्यामुळे सगळ्यांचा आवडीचे पदार्थ साधारणत: बनवले जातात.(Energy food for fast) साबुदाण्याची खिचडी, वडा, थालीपीठ, खीर असे अनेक तिखट आणि गोडाचे पदार्थ आपण उपवासाला खाल्ले असतीलच. साबुदाणा खाऊन अनेकांना अपचनाचा त्रास, पोट फुगते त्यामुळे साबुदाणे खाणे बरेचसे लोक टाळतात. जर आपल्यालाही साबुदाणा आवडत नसेल तर रताळ्याचा किस आपण ट्राय करु शकतो.(Shravan Special sweet potato recipe ) रताळू हे सूपरफूड आहे. हे खाल्ल्याने आपल्याला दिवसभर एनर्जी मिळते.(fasting upvas food) इतकेच नाही तर आपल्याला सारखी भूक देखील लागणार नाही. यात भरपूर प्रमाणात फायबर असतात जे पचायला खूप सोपे असतात. वेटलॉस करणाऱ्यासाठी रताळू अगदी चांगला पदार्थ आहे.(Shravan fasting recipe) रताळ्याचा हा तिखट किस कसा करायचा, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.
हॉटेलपेक्षा भारी चपाती बर्गर पॅटीज टॅकोज करा घरी, जंकफूडची चव पण पदार्थ पौष्टिक
साहित्य
तूप - १ मोठा चमचा जिरे - १ चमचा चिरलेली हिरवी मिरची - २ बारीक उभे चिरलेले रताळू - १ वाटी भाजून बारीक केलेला दाण्याचा कूट - १ वाटी ओले खोबरे - १ वाटी
कृती
1. सगळ्यात आधी रताळू धुवून त्याचे वरचे साल काढून घ्या. आता त्याला लांब आकारात कापून किंवा किसून घ्या. ज्यामुळे त्याचा आकार एकसारखा होईल.
2. मोठ्या कढईला व्यवस्थित गरम करुन त्यात चमचाभर तूप घाला, जिरे घालून चांगले तडतडून द्या. आता वरुन बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. यात बारीक उभे चिरलेले किंवा किसलेले रताळू घाला. आता वाफेवर परतवून घ्या.
3. व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात वरुन दाण्याचा कूट, ओले खोबरे घाला आणि मीठ घाला. श्रावणातील उपवासाला खा पोटभरीचा पदार्थ.