Join us  

शेवयाच्या नूडल्स !! शेवयांना द्या चायनिज तडका.. सुपर ब्रेकफास्ट रेसिपी, करायला सोपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 8:15 PM

नेहमीच चायनिज खाणे काही योग्य नाही ना... म्हणून तर आपल्या भारतीय नूडल्सला म्हणजेच शेवयांना द्या चायनिज तडका.. ट्राय करा ही सुपर ब्रेकफास्ट रेसिपी !!

ठळक मुद्दे नूडल्सची टेस्ट शेवयांना येईल अशी भन्नाट रेसिपी. नूडल्स जेवढ्या आवडीने खाता, तेवढ्याच आवडीने शेवयाही खा.

आजकालची लहान मुलं पण अतिशय हुशार झाली आहेत. नूूडल्स म्हणून शेवया दिल्या तर त्यांना त्या अगदीच नको असतात. कारण नूडल्ससारखी टेस्ट शेवयांना येत नाही आणि म्हणूनच शेवयांच्या नूडल्स काही बच्चे कंपनीला चालत नाहीत. म्हणूनच तर आता आपण नूडल्सची टेस्ट शेवयांना येईल अशी काहीतरी भन्नाट रेसिपी करू या. जेणेकरून मुलं नूडल्स जेवढ्या आवडीने खातात, तेवढ्याच आवडीने शेवयाही खातील. घरातली मोठी मंडळीही ही चवदार रेसिपी खाऊन खुश होतील हे नक्की.

 

शेवयाच्या नुडल्ससाठी लागणारे साहित्यशेवया, मीठ, तेल, पाणी, टोमॅटो सॉस, सोया सॉस, नूडल्स मसाला, अद्रक- लसूण पेस्ट, कांदा, सिमला मिरची, पत्ताकोबी.

कशा करायच्या शेवयाच्या नुडल्स?१. सगळ्यात आधी तर कांदा, सिमला मिरची, पत्ताकोबी व्यवस्थित कापून घ्या.२. यानंतर कढई तापायला ठेवा. त्यामध्ये तेल टाका.३. तेल गरम झाले की यात कांदा, सिमला मिरची, पत्ताकोबी या सगळ्या चिरलेल्या भाज्या टाका.४. भाज्या थोड्या परतून झाल्या की मग त्यात अद्रक- लसूण पेस्ट टाका.

५. यानंतर एक टेबलस्पून टोमॅटो सॉस, अर्धा टेबलस्पून सोया सॉस आणि एक टेबलस्पून नूडल्स मसाला टाकावा. नूडल्ससारखी टेस्ट हवी आहे, त्यामुळे मॅगी मसाला वापरू नका. बाजारात मिळणारा कोणताही नूडल्स मसाला वापरला तरी चालतो.६. कढईतले मिश्रण एकदा हलवून घ्या. आता त्यामध्ये शेवया टाका आणि व्यवस्थित हलवून घ्या.

७. आता शेवया बुडल्या जातील एवढे पाणी कढईत टाका. थोडे मीठ टाका. नूडल्स मसाला आणि सोया सॉस यांच्यामध्ये मीठ असते. त्यामुळे मीठ जरा कमी टाकावे.८. सगळे एकदा हलवून घेतले की झाकण ठेवून वाफ येऊ द्या. चांगली वाफ आली की झाल्या शेवयाच्या नूडल्स तयार.

 

टॅग्स :अन्नपाककृतीचिनी ड्रॅगन