>फूड > ही रेसिपी ट्राय करा, कैरीचे लोणचे होईल अधिक चटकदार

ही रेसिपी ट्राय करा, कैरीचे लोणचे होईल अधिक चटकदार

आपण कितीही चांगले लोणचे बनविले तरी आपल्या घरच्या मंडळींना शेजारच्यांचे किंवा दुसऱ्यांच्या घरचेच लोणचे अधिक आवडते, असा तुमचाही अनुभव आहे का ? असे असेल तर नक्कीच लोणच्याची ही झकास रेसिपी ट्राय करा. तुमचे लोणचे चटकदार तर होईलच पण वर्षभर अगदी छान टिकेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 03:40 PM2021-06-10T15:40:10+5:302021-06-10T16:05:40+5:30

आपण कितीही चांगले लोणचे बनविले तरी आपल्या घरच्या मंडळींना शेजारच्यांचे किंवा दुसऱ्यांच्या घरचेच लोणचे अधिक आवडते, असा तुमचाही अनुभव आहे का ? असे असेल तर नक्कीच लोणच्याची ही झकास रेसिपी ट्राय करा. तुमचे लोणचे चटकदार तर होईलच पण वर्षभर अगदी छान टिकेल.

Receipe fot tasty and yummy mango pickle | ही रेसिपी ट्राय करा, कैरीचे लोणचे होईल अधिक चटकदार

ही रेसिपी ट्राय करा, कैरीचे लोणचे होईल अधिक चटकदार

Next
Highlightsलोणच्यात खडेमीठ वापरा. त्यामुळे ते वर्षभर टिकते. हळकुंडाचा वापर करत असाल तर ते आधी तेलात तळून घ्या आणि नंतर मिक्सरमधून वाटून घ्या.लोणच्यासाठी तेल गरम करताना त्यातून धूर यायला नको. अन्यथा लोणच्याला धुरकट वास लागतो.

जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आता घरोघरी महिलांची कैरीचे लोणचे बनविण्याची जय्यत तयारी सुरू झाली असणार. लोणच्यासाठी कैऱ्या कुठून आणायच्या, यंदा कोणती नवी रेसिपी ट्राय करायची किंवा आपल्या त्या अमूक अमूक मावशीचे किंवा त्या अमक्या मैत्रिणीचे लोणचे फारच चटपटीत होत असते, त्यामुळे आपणही तिची रेसिपी फॉलो करूया, असे  अनेक विचार आता तुमच्या मनात आकाराला येऊ लागले असणार.  
म्हणूनच तर यावर्षी ही एक चटपटीत रेसिपी ट्राय करा आणि पाहता क्षणीच खावे वाटणारे,  तोंडाला पाणी आणणारे, चमचमीत आणि चटकदार लोणचे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच बनवा. 

 

लोणच्यासाठी कैरी निवडताना लक्षात ठेवा
- लोणच्यासाठी कैरी निवडताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मऊ पडलेल्या कैऱ्या अजिबात घेऊ नका.
- लोणच्याची कैरी हाताला टणकच लागली पाहिजे.
- कैरी अगदी अंबटच असायला हवी. 
- कैरी घेतली की लगेचच त्या दिवशी किंवा  दुसऱ्याच दिवशी लोणचे टाका. नाहीतर कैरी पिकू लागेल आणि लोणचे नासण्याची शक्यता वाढेल. 

साहित्य
हिरवीगार कैरी, लाल तिखट, हळद, हिंग, मोहरी किंवा मोहरीची डाळ, मेथ्या, मीठ, बडीशेप, लवंग, मिरे, जीरे, तेल.

कृती
- सगळ्यात आधी कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घ्या. अगदी काेरड्या झाल्यानंतरच त्याच्या फोडी करून घ्या. फोडी जास्त बारीकही नकोत आणि जास्त जाडही नको.
- नंतर चिरलेल्या फोडींमध्ये थोडी हळद आणि थोडे मीठ टाका. सगळ्या फोडींना ते व्यवस्थित लागेल, याची काळजी घ्या.
- मीठ आणि हळद लागताच पाणी सुटू लागणाऱ्या या फोडी स्वच्छ पुसून कोरड्या केलेल्या बरणीत भरून ठेवा. 
- वरची कृती आदल्या दिवशी केल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी लोणच्याचा मसाला तयार करा.
- यामध्ये सर्वात आधी मोहरी किंवा मोहरीची डाळ, मीरे, लवंगा, जीरे, बडीशेप, मेथ्या हे पदार्थ एकेक करून कढईमध्ये चांगले भाजून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्या. हा मसाला जाडसरच ठेवा.


- आता आदल्या दिवशी मीठ आणि हळद लावलेल्या फोडी बरणीतून एका मोठ्या भांड्यात काढा. त्याला आता भरपूर पाणी सुटले असेल, हे पाणी वेगळे काढून घ्या.
- या फोडींमध्ये आपण केलेला मसाला, मीठ, हळद, तिखट आणि हवे असल्यास थोडा विकतचा लोणच्याचा मसालाही टाकू शकता.
- सगळ्या फोडींना व्यवस्थित मसाला लागला, की मग त्या बरणीत भरा. बरणीच्या तळाशी थोडे मीठ नक्की टाका.
- फोडी बरणीत भरल्यानंतर वरून तेल टाका. लोणच्यात टाकण्याचे तेल कडक तापवून पुन्हा थंड करा आणि त्यानंतरच लोणच्यात टाका.
- १० ते १२ दिवस दररोज एका मोठ्या चमच्याने लोणचे हलवायला विसरू नका. जेणेकरून त्याला बुरशी लागणार नाही.
- लोणच्याची बरणी नेहमी स्वच्छ सुर्यप्रकाश येईल आणि हवा खेळती राहील अशाच ठिकाणी ठेवा. 
- अशा पद्धतीने घातलेले लोणचे सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि वर्षभर हमखास टिकेल. 


 

Web Title: Receipe fot tasty and yummy mango pickle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

थंडीतल्या निवांत सांयकाळी खास मेन्यू, कटलेटची मेजवानी; 3 प्रकारच्या कटलेटची सोपी रेसीपी.. - Marathi News | How ToMake Delicious Cutlets: Special menu for winter evening, a feast of cutlets A simple recipe for 3 types of cutlets. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीतल्या निवांत सांयकाळी खास मेन्यू, कटलेटची मेजवानी; 3 प्रकारच्या कटलेटची सोपी रेसीपी..

How To Make Delicious Cutlets: थंडीत संध्याकाळी चटपटीत खावंसं वाटत असेल तर कटलेट पर्याय उत्तम. ओट्स, बटाटा आणि पोह्यांचे कटलेट . कुठलाही प्रकार केला तरी संध्याकाळ छान जाणार! ...

हिवाळ्यात जेवणात हवीच चाकवत भाजी! करा भाजी-कढी-पराठे, 7 पोषक फायदे - Marathi News | How to include healthy bathua in diet for 7 health benefits ! 3 Tasty and Easy recipes of Bathua | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात जेवणात हवीच चाकवत भाजी! करा भाजी-कढी-पराठे, 7 पोषक फायदे

सर्वच पालेभाज्या आरोग्यासाठी पोषक असतात. पण काही पालेभाज्या विशिष्ट ऋतूत मिळतात आणि त्या विशिष्ट ऋतूत खाल्ल्या तर जास्त फायदेशीर ठरतं. चाकवताची भाजी ही त्यातलीच एक पालेभाजी आहे. चाकवताच्या भाजीतील गुणधर्म आणि पोषक तत्त्वांमुळे आरोग्यतज्ज्ञ आणि आहारतज ...

हिरवी मिरची आणि लसणाचं मस्त झणझणीत लोणचं! रेसिपी अशी की तोंडाला पाणी सुटेल  - Marathi News | Food, Recipe: How to make green chilli, garlic pickle, spicy, delicious recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिरवी मिरची आणि लसणाचं मस्त झणझणीत लोणचं! रेसिपी अशी की तोंडाला पाणी सुटेल 

How to make green chili, garlic pickle: कैरी, लिंबू, आवळा अशी लोणची खाऊन कंटाळा आला, की हे मस्त झणझणीत लोणचं करा... (green chili, garlic pickle) लोणच्याची इन्स्टंट रेसिपी (instant recipe)... एकदा करा आणि चव चाखून बघाच..  ...

How to make Instant Dosa : या विकेंडला घरीच बनवा ५ प्रकारचे इंस्टंट डोसे; या घ्या झटपट, स्वादिष्ट डोसा, सांबर रेसेपीज - Marathi News | How to make Instant Dosa : 5 Types of instant Dosa Recipes for weekend learn how to make perfect dosa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना आंबवण्याची झंझट ना भिजवण्याची कटकट; या विकेंडला घरीच बनव या ५ प्रकारचे इंस्टंट डोसे

How to make Instant Dosa : अगदी कमीत कमी वेळात कमी साहित्यासह तुम्ही स्वादिष्ट डोसे बनवू शकता. ...

Viral Food Combinations : अजबच आहे! लाल उसाचा रस कधी प्यायलाय का? व्हायरल होतोय खुनी गन्ने का ज्यूस - Marathi News | Viral Food Combinations : Have you ever had bloody sugarcane juice video of making it going viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अजबच आहे! लाल उसाचा रस कधी प्यायलात का? व्हायरल होतोय खुनी गन्ने का ज्यूस

Viral Food Combinations : व्हिडीओमध्ये दिसणारा उसाचा रस तुम्ही क्वचितच प्यायला असेल. त्याचे नाव ऐकताच अनेकजण घाबरले. ...

केळी खूप पिकली, फेकून देताय? थांबा, करा पिकलेल्या केळीचा पौष्टिक बनाना पराठा ! - Marathi News | Food, Recipe : How to make healthy and tasty banana paratha  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केळी खूप पिकली, फेकून देताय? थांबा, करा पिकलेल्या केळीचा पौष्टिक बनाना पराठा !

How to make banana paratha : केळी (banana) म्हणजे सर्वसामान्यांचं सुपर फुड. हे सूपर फूड अति पिकलं किंवा डागाळलं म्हणून फेकून देऊ नका. त्याचा असा मस्त उपयोग करा आणि गरमागरम, खमंग बनाना पराठे (paratha recipe) करा.  ...