वेफर्स हा जगभरातील सर्व वयोगटांतील व्यक्तींचा आवडता पदार्थ आहे. आपल्याला सगळ्यांना बटाट्याचे वेफर्स, केळीचे वेफर्स, विविध चवींचे वेफर्स किंवा विविध प्रकारच्या फ्रेंच फ्राईज खायला खूप आवडते. एकदा वेफर्स खायला सुरुवात केल्यावर कोणीही स्वत:ला थांबवू शकत नाही, ही वस्तुस्थितीदेखील सगळेच मान्य करतील. आपल्याकडे संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी, लहान मुलांना खाऊच्या डब्ब्यात देण्यासाठी म्हणून हे वेफर्स सहज खाल्ले जातात. सहलीला किंवा बाहेरगावी जाताना चिवडा, वेफर्स असे पदार्थ आवर्जून सोबत नेले जातात. वेफर्ससाठी लागणाऱ्या केळींचे उत्पादन हे केरळमध्ये जास्त होते. त्यामुळे हे केळ्यांचे वेफर्स बनविण्याचे जास्त प्रमाण केरळमध्ये आहे. कोणत्याही प्रकारचे कृत्रिम रंग, कृत्रिम चव यांचा वापर न करता नैसर्गिक व पारंपरिक पद्धतींचा वापर करून हे वेफर्स तयार केले जातात. केरळची ही अनोखी पाककृती आता तुम्ही घरच्या घरी झटपट करू शकता. कच्च्या केळ्याचे अतिशय कुरकुरीत, चटकदार, पातळ व तळलेले वेफर्स घरी करणे आता सोपे झाले आहे. कच्च्या केळ्यापासून हे वेफर्स कसे तयार करायचे हे समजून घेऊयात(Homemade Raw Banana Chips Recipe).
साहित्य -
१. कच्ची केळी - ४२. नारळाचे तेल - ३ कप (तळण्यासाठी)३. हळद - १ टेबलस्पून ४. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून ५. मीठ - आवडीनुसार
कृती -
१. सर्वप्रथम कच्ची केळी स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घ्या. मग या कच्च्या केळीचे वेफर्सच्या आकाराचे काप करून घ्या. २. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात हळद, मीठ घालून मग सगळे काप त्यात घालून ५ मिनिटे तसेच बुडवून ठेवा.
हे लक्षात ठेवा -
१. हे वेफर्स थंड झाल्यावर एका हवाबंद डब्ब्यात किमान एक आठवड्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता.