Lokmat Sakhi >Food > नवरात्री स्पेशल : पूर्वतयारी न करता, १५ मिनिटांत करा उपवासाचा ढोकळा! पांढराशुभ्र, चव अप्रतिम - करायला सोपी रेसिपी...

नवरात्री स्पेशल : पूर्वतयारी न करता, १५ मिनिटांत करा उपवासाचा ढोकळा! पांढराशुभ्र, चव अप्रतिम - करायला सोपी रेसिपी...

Upvas Dhokla : Vrat Ka dhokla : Farali Dhokla : How To Make Fasting Dhokla : Dhokla For Fasting : नवरात्रीत पांढराशुभ्र उत्तम चवीचा उपवासाचा ढोकळा कसा करायचा याची खास रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2025 15:20 IST2025-09-16T15:19:28+5:302025-09-16T15:20:50+5:30

Upvas Dhokla : Vrat Ka dhokla : Farali Dhokla : How To Make Fasting Dhokla : Dhokla For Fasting : नवरात्रीत पांढराशुभ्र उत्तम चवीचा उपवासाचा ढोकळा कसा करायचा याची खास रेसिपी...

Navratri Specia Upvas Dhokla Vrat Ka dhokla Farali Dhokla How To Make Fasting Dhokla Dhokla For Fasting | नवरात्री स्पेशल : पूर्वतयारी न करता, १५ मिनिटांत करा उपवासाचा ढोकळा! पांढराशुभ्र, चव अप्रतिम - करायला सोपी रेसिपी...

नवरात्री स्पेशल : पूर्वतयारी न करता, १५ मिनिटांत करा उपवासाचा ढोकळा! पांढराशुभ्र, चव अप्रतिम - करायला सोपी रेसिपी...

शारदीय नवरात्रौउत्सवाला आता अगदी काहीच दिवस बाकी राहिले आहेत. नवरात्रीत आपल्यापैकी बरेचजण उपवास करतात. उपवास म्हटलं की, काही मोजकेच पदार्थ खाल्ले जातात. उपवास असेल तर घरात साबुदाण्याची खिचडी, वडे, बटाट्याची भाजी असे काही मोजकेच आणि फार कॉमन पदार्थ हमखास घरोघरी तयार केले जातात. नवरात्रीच्या (How To Make Fasting Dhokla) नऊ दिवसांत उपवासाचे तेच ते नेहमीचे पदार्थ खाऊन अनेकदा आपल्याला (Farali Dhokla) कंटाळा येतो. रोज तेच साबुदाणा वडा, खिचडी, शेंगदाण्याची आमटी खाण्याऐवजी काहीतरी (Upvasacha Dhokla) नवीन आणि चविष्ट असा पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी, पारंपरिक उपवासाच्या पदार्थांना एक वेगळा ट्विस्ट देऊन आपण उपवासाचा ढोकळा अगदी झटपट तयार करु शकतो(Dhokla For Fasting).

उपवासाचा पांढराशुभ्र ढोकळा तयार करण्यासाठी  फारसा वेळ आणि साहित्य लागत नाही, घरात उपलब्ध असलेल्या काही मोजक्याच पदार्थांच्या मदतीने आपण हा चविष्ट ढोकळा तयार करु शकतो. हा उपवासाचा ढोकळा करायला सोपा आणि चवीला अप्रतिम लागतो. यंदाच्या नवरात्रीत, पांढराशुभ्र उत्तम चवीचा उपवासाचा ढोकळा कसा तयार करायचा याची साधीसोपी रेसिपी पाहूयात...    

साहित्य :-

१. वरीचे तांदूळ / भगर - १ कप 
२. साबुदाणा - १/२ कप 
३. दही - १ कप 
४. पाणी - १ कप 
५. हिरव्या मिरच्या - २ ते ३ (बारीक चिरलेल्या)   
६. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
७. तेल - २ ते ३ टेबलस्पून 
८. जिरे - १ टेबलस्पून 
९. खायचा सोडा - चिमूटभर
१०. मीठ - चवीनुसार

आशा भोसलेंना आवडते 'माँ की दाल'! पराठा, भातासोबत खा पोटभर - अस्सल पारंपरिक रेसिपी...    


ना माती, ना कुंडी, ग्लासभर पाण्यात लावा आलं घरच्याघरीच! ताजं औषधी आलं चहात घाला मस्त...

कृती :-

१. एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात वरीचे तांदूळ, साबुदाणा, दही व थोडे पाणी घालावे. आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्रित फिरवून त्याचे मध्यम कंन्सिस्टंन्सीचे बॅटर तयार करुन घ्यावे. 
२. मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं तयार बॅटर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून त्यावर झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे झाकून ठेवावे. 
३. १५ मिनिटानंतर या बॅटरमध्ये, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व कोथिंबीर भुरभुरवून घालावी. 

तेल की तूप, फोडणीसाठी काय फायदेशीर ? ९९% लोकांना माहीतच नसते रोजची १ चूक - होते आरोग्याचे नुकसान... 

४. मग एका दुसऱ्या भांड्यात थोडे तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. या गरम तेलात जिरे घालून ते थोडे तडतडू द्यावे. हे जिरे मग ढोकळ्याच्या बॅटर मध्ये घालावे. सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. सगळ्यात शेवटी यात चवीनुसार मीठ व चिमूटभर खायचा सोडा घालावा. 
५. आता एका मोठ्या व पसरट कढईत पाणी घेऊन ते गरम करून घ्यावे. एका भांड्यात किंवा केक टीनला आतून थोडे तेल लावून त्यात ढोकळ्याचे तयार बॅटर ओतून हे भांडं स्टँड वर ठेवून वरुन झाकण ठेवून ढोकळा १० ते १५ मिनिटे वाफेवर वाफवून घ्यावा.  

 मस्त हलका - फुलका आणि कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त १५ मिनिटांत उपवासाचा पांढराशुभ्र ढोकळा खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Navratri Specia Upvas Dhokla Vrat Ka dhokla Farali Dhokla How To Make Fasting Dhokla Dhokla For Fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.