Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात झटपट विकतसारखं घट्ट मलईदार दही लावण्यासाठी २ सोप्या टिप्स, परफेक्ट वड्या पडतील-चवीलाही गोड

पावसाळ्यात झटपट विकतसारखं घट्ट मलईदार दही लावण्यासाठी २ सोप्या टिप्स, परफेक्ट वड्या पडतील-चवीलाही गोड

Monsoon malai curd recipe: Malai curd monsoon season: Sugar-free creamy dahi recipe : आपल्यालाही घरीच परफेक्ट मलईदार घट्ट दही बनवायचे असेल तर या सोप्या टिप्स लक्षात ठेवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2025 14:57 IST2025-05-26T14:57:19+5:302025-05-26T14:57:56+5:30

Monsoon malai curd recipe: Malai curd monsoon season: Sugar-free creamy dahi recipe : आपल्यालाही घरीच परफेक्ट मलईदार घट्ट दही बनवायचे असेल तर या सोप्या टिप्स लक्षात ठेवा.

Monsoon season how to make malai creamy curd at home 2 simple tips for sweet homemade dahi without sugar | पावसाळ्यात झटपट विकतसारखं घट्ट मलईदार दही लावण्यासाठी २ सोप्या टिप्स, परफेक्ट वड्या पडतील-चवीलाही गोड

पावसाळ्यात झटपट विकतसारखं घट्ट मलईदार दही लावण्यासाठी २ सोप्या टिप्स, परफेक्ट वड्या पडतील-चवीलाही गोड

ऋतू कोणताही असला तरी दह्याचे सेवन आरोग्यासाठी चांगले समजले जाते.(Monsoon malai curd recipe) दही हे आपल्या शरीरात चांगले बॅक्टेरिया तयार करतात ज्यामुळे आपली बिघडलेली पचनसंस्था सुरळीत होण्यास मदत होते.(Sweet homemade dahi without sugar) इतकेच नाही तर आपल्या शरीराला थंड ठेवण्याचे काम देखील दही करते. (Malai curd monsoon season)
अनेकांना जेवताना दही खाण्याची सवय असते. ताटात दही नसेल तर काही जणांना जेवणच जात नाही.(Sugar-free creamy dahi recipe) अनेकदा बाजारातून दही आणल्यानंतर त्याची चव आंबट लागते आणि ते जास्त काळ टिकत देखील नाही.(How to make malai curd at home) घरीच मलईदार घट्ट दही बनवल्यास बाहेरुन विकत आणायची गरजही भासणार नाही.(Monsoon special dahi recipe) पावसाळ्यात दह्याच विरजण व्यवस्थित लागत नाही. अशी तक्रार अनेकदा केली जाते. दह्यात पाणी साठते, चवही आंबट लागते. जर आपल्यालाही घरीच परफेक्ट मलईदार घट्ट दही बनवायचे असेल तर या सोप्या टिप्स लक्षात ठेवा. (Homemade curd thick texture tips)

ऑफिसचा डबा होईल टेस्टी, करा चमचमीत भरली भेंडी! भाजी चिकट होऊ नये म्हणून ३ चुका टाळा

घरी दही कसं तयार कराल? 

1. १ लीटर दूध घेऊन त्याला तापवून घ्या. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस स्लो करा. चमच्याने दूध ढवळत रहा. त्यानंतर दूध थोडे अर्ध झाल्यानंतर थंड करुन घ्या. एका वाटीत दही घेऊन ते चांगले फेटून घ्या, त्यात दूध घालून फेटून घ्या. फेटलेल दही दुधात घालून मिक्स करा. त्यानंतर एका भांड्यात दूध काढून झाकून ठेवा. ७ ते ८ तासात घट्ट मलईदार दही तयार होईल. आपण या दह्याच्या वड्या देखील पाडू शकतो. 

2. जर आपल्या दुधाला मलई आली नसेल तर आपण त्यात दुधाचा पावडर टाकून व्यवस्थित उकळून घ्यावे. त्यानंतर दूध थोडे घट्ट होईल आणि दही चांगले घट्ट जाडसर तयार होईल. 


Web Title: Monsoon season how to make malai creamy curd at home 2 simple tips for sweet homemade dahi without sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.