Join us  

पुदिन्याचा मस्त चटपटीत ठेचा, ही रेसिपी करून पहा, असा ठेचा तुम्ही खाल्लाच नसणार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 5:27 PM

पाणीपुरी, रगडा पॅटीस यासारखे काही पदार्थ पुदिन्याशिवाय बनणे केवळ अशक्य. चिंच पुदिन्याची चटणी असो किंवा मग पुदिन्याचे नुसतेच केलेले चमचमीत पाणी. पदार्थाला अधिक लज्जतदार बनविण्याचे काम पुदिना हमखास करतो. पुदिन्याचा ठेचाही मोठा चटपटीत लागतो आणि खातानाही खूपच मजा येते. ही आगळीवेगळी आणि सगळ्यात सोपी रेसिपी एकदा करून तर बघा.

ठळक मुद्देपुदिन्याचा ठेचा करताना तो एकाच वेळी खूप जास्त करू नये. जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस खाता येईल, एवढ्याच प्रमाणात करावा.हा ठेचा फ्रिजमध्येच ठेवावा. बाहेर ठेवल्यास लवकर खराब होऊ शकतो.

औषधी आणि बहुगुणी वनस्पती म्हणून पुदिना ओळखला जातो. पुदिना आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा  असूनही अनेक स्वयंपाक घरात पुदिना फक्त पाणीपुरी बनविण्यापुरताच आणला जातो. वर्षभर अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या पुदिन्याचे सेवन भरपूर प्रमाणात केले पाहिजे, असे आहारतज्ज्ञ आवर्जून सांगतात. म्हणूनच आज पुदिन्याचा ठेचा या चटपटीत रेसिपीपासून सुरूवात करूया आणि आठवड्यातून दोन- तीन दिवस का होईना, पण भरपूर प्रमाणात पुदिना खाऊया.

हेल्दी पुदिन्याचा चटपटीत ठेचासाहित्यपुदिना, कोथिंबीर, लसून, हिरव्या मिरच्या, लिंबू, मीठ, तेल, मोहरी, जीरे, गुळ, हिंग

कृती१. सगळ्यात आधी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून जरा कोरडी करून घ्या.२. जेवढा पुदिना घेतला तेवढीच कोथिंबीर घ्यावी.३. ठेचा असल्याने तो जरा झणझणीतच हवा. म्हणून साधारणपणे ८ ते १० हिरव्या मिरच्या तव्यावर तेल टाकून पाच मिनिटे परतू द्या. तुमच्या तिखट खाण्याच्या प्रमाणानुसार तुम्ही मिरच्यांची संख्या कमी जास्त करू शकता.४. पुदिना, कोथिंबीर, परतलेल्या मिरच्या, जीरे, लसूणाच्या ५ ते ६ पाकळ्या आणि एक टेबल स्पून गुळ हे मिश्रण चवीनुसार मीठ टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्या.५. हे वाटण एका वाटीत काढा, त्यामधे अर्धे लिंबू पिळा आणि वरून मोहरी व हिंग टाकून खमंग फोडणी द्या.६. पुदिन्याचा चमचमीत ठेचा झाला तयार.

 

आरोग्यदायी पुदिना खाण्याचे फायदे१. पोटदुखीवर सर्वोत्तम इलाज म्हणजे पुदिना.२. पुदिना नियमित खाल्ला तर सर्दी, खाेकला, वातदोष, पित्त, दातदुखी यासारखे जुनाट आजार दुर होतात.३. पुदिन्यात भरपूर प्रमाणात असलेले फायबर कोलेस्टरॉल कमी करण्यास मदत करते.४. पुदिन्यातील मॅग्नेशियम हाडांना बळकटी देते.५. पुदिना खाल्ल्यामुळे मासिक पाळीत होणाऱ्या त्रासापासूनही आराम मिळतो.६. हिरड्या मजबूत करणे, तोंडाची दुर्गंधी घालविणे यासाठीही पुदिना उपयुक्त ठरतो.  

टॅग्स :अन्नआरोग्यपाककृती