Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात घरीच करा झटपट मटका कुल्फी! पाहा रेसिपी-खा मनसोक्त मऊमऊ कुल्फी पोटभर

उन्हाळ्यात घरीच करा झटपट मटका कुल्फी! पाहा रेसिपी-खा मनसोक्त मऊमऊ कुल्फी पोटभर

Make instant Matka Kulfi at home this summer! Check out the recipe : उन्हाळ्यामध्ये मटका कुल्फी खाण्याची मज्जाच वेगळी आहे. पाहा रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2025 14:14 IST2025-03-15T14:12:53+5:302025-03-15T14:14:31+5:30

Make instant Matka Kulfi at home this summer! Check out the recipe : उन्हाळ्यामध्ये मटका कुल्फी खाण्याची मज्जाच वेगळी आहे. पाहा रेसिपी.

Make instant Matka Kulfi at home this summer! Check out the recipe | उन्हाळ्यात घरीच करा झटपट मटका कुल्फी! पाहा रेसिपी-खा मनसोक्त मऊमऊ कुल्फी पोटभर

उन्हाळ्यात घरीच करा झटपट मटका कुल्फी! पाहा रेसिपी-खा मनसोक्त मऊमऊ कुल्फी पोटभर

तुम्हाला उन्हाळी सुट्या आठवतात का? दुपारच्या वेळी कुटुंबातील सगळेच जण एकत्र पंख्याखाली पहूडलेले असायचे. (Make instant Matka Kulfi at home this summer! Check out the recipe)उकडून हालत फार बेकार व्हायची. पंख्याच्या वाऱ्याची मज्जा घेत असतानाच, अचानक लाईट जायचे आणि मग नुसत्या घामाच्या धारांमध्ये शरीर चिंब भिजून जायचे. तेवढ्यात एका घंटीचा आवाज यायचा त्या मागोमाग 'कुल्फी ले लो, थंडी थंडी कुल्फी' असं ऐकू यायचं. तो आवाज ऐकल्यावर मात्र लहान मुलंच काय तर सगळेच जण दरवाज्याच्या दिशेने धाव घ्यायचे. आणि मग त्या थंड अशा मटका कुल्फीचा आस्वाद घेताना जो काही आनंद मिळायचा, तो वेगळाच होता.(Make instant Matka Kulfi at home this summer! Check out the recipe)

आजकाल मटका कुल्फी विकणारे फेरीवाले फार दिसत नाहीत. गाड्या किंवा हॉटेलमध्ये ही कुल्फी मिळते, मात्र त्या कुल्फीची खरी मज्जा ही उन्हाळी दिवसांमध्ये  दुपारच्या वेळी खाण्यातच आहे. मटका कुल्फी घरी तयार करणेही फार काही कठीण नाही. मग आता घरीच तयार करा आणि दुपार मस्त गारेगार करा.

साहित्य
काजू, बदाम, पिस्ता, दूध, वेलची पूड, फॉइल पेपर, साखर, मातीचे लहान मडके

कृती
१.  एका मिक्सरच्या भांड्यात काजू, बदाम आणि पिस्ता घ्या. त्याची पावडर तयार करून घ्या. 

२. आता एका पातेल्यामध्ये दूध घ्या. ते उकळवत ठेवा. दूध वर आल्यावर गॅस एकदम कमी करा म्हणजे ओतू जाणार नाही. दुधाची पातळी अर्ध्यापर्यंत आटवून घ्यायची. त्यामध्ये साखर घाला. जर एक लिटर दूध वापरत असाल तर, एक मोठी वाटी साखर घाला. त्यामध्ये वेलची पूड घाला. साखर विरघळू द्या.

३. आता त्यामध्ये तयार केलेली सुकामेव्याची पूड घाला. दूध व्यवस्थित ढवळून घ्या. त्यामध्ये घातलेले सगळे पदार्थ मस्तपैकी मिक्स करून घ्या. 

४. दूध जरा घट्ट झालं की गॅस बंद करून टाका. ते गार होऊ द्या. गार झालं की मातीच्या मडक्यामध्ये भरा. वरतून फॉइल पेपरने बंद करा. आणि रात्रभर फ्रिझरला ठेवा. 
 

Web Title: Make instant Matka Kulfi at home this summer! Check out the recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.