Join us

ख्रिसमस स्पेशल ‘प्रेटझेल’ करा घरच्याघरी, ‘देसी’स्टाइल, नो बेक बिस्किटं! ते ही मैदा न वापरता..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 17:24 IST

प्रेटझेल ही बिस्किटं आपण ज्वारी, बाजरी, गव्हाचं पीठ वापरुन घरच्याघरीही बनवू शकतो. 

ठळक मुद्देमस्त एन्जॉय करा ही वेगळी बिस्किटं. पौष्टिकही आणि घरची खास हॅण्डमेड चवही.

शुभा प्रभू साटम

ख्रिसमस जवळ आला आहे. खास त्यासाठी आता अनेक घरी बिस्किटं, कुकीज बनवली जातात. प्रत्येक घराची आपली एक खासियत, पध्दत असते. चवही वेगळी असते.  परदेशात ‘प्रेटझेल’ म्हणून एक प्रकारची बिस्कीट असतात, त्यांच्यावर साखर घालून खायला देतात,ख्रिसमसला  तर आवुर्जून अशी बिस्कीट होतातच होतात. ही खास बिस्किटं आपण घरीही बनवू शकतो. मात्र पहिला प्रश्न असतो, बेक कशात करणार? आपल्याकडे ओव्हन असतोच असे नाही,म्हणूंन आज आपण एक अस्सल देशी बिस्कीट प्रकार पाहू, आकार या प्रेटझेलसारखा पण चव आणि साहित्य आपलं.

ही कृती खेड्यात गरीब गृहिणी सणासुदीला करतात आणि वेळ साजरी करतात, कणिक नसेल तर बाजरी ज्वारी पीठ पण वापरलं जातं,गरीब घातला पदार्थ असला तरीही पोषणमुल्य खूप आहे, मैद्याच्या बिस्किटापेक्षा नक्कीच चांगली नाही का? फक्त ही बिस्कीटं फार टिकत नाही,म्हणून लवकर संपवावी.

साहित्य

आपली कणिक : साधारण 2 वाट्या ,यात आवडीप्रमाणे ज्वारी बाजरी पीठ घालता येते.मैदा :पाव वाटी ऐच्छिकगूळ : १ वाटीखसखस+तीळवेलची जायफळ पूडतळायला तेल/तूपहवा तर किंचित खायचा सोडा

कृती

पीठ आणि मैदा घट्टसर भिजवून घ्या,सोडा घालणार तर तेव्हाच घाला, आणि वेलची जायफळ पूड पण.तीळ खसखस किंचित भाजून घ्या.दुसऱ्या पातेल्यात गूळ पाण्यात विरघळवून घ्या,थोडा घट्ट हवा पण पाक नको,थोडा थंड होऊद्या.तूप/तेल तापवून घ्यापिठाचे प्रेटझेलसारखे आकार करून ते मंद आगीवर खमंग टाळून घ्या, तसा आकार नाही जमलं तर गोळे करा,हरकत नाही. गोल गोल बिस्किटासारखा आकार करा.  परातीत हे गोळे पसरून त्यावर पाक ओता, छान मुरू द्या.शेवटाला त्यावर तीळ खसखस पसरा.फार खुसखुशीत आणि चवदार असे देशी बिस्कीट तयार,आकार तुम्हाला हवा तो द्या. मस्त एन्जॉय करा ही वेगळी बिस्किटं. पौष्टिकही आणि घरची खास हॅण्डमेड चवही.

(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

टॅग्स :नाताळअन्नमहिला