Join us

महागडं केशर विकत आणलं पण ते शुद्ध आहे की भेसळयुक्त? ३ सोपे उपाय, ओळखा केशरातली भेसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 14:12 IST

Food Adulteration: कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी दुधात टाकण्यासाठी हमखास केशर (keshar/ saffron) आणलं जातंच. हे केशर शुद्ध की भेसळीचं हे ओळखण्याचे काही सोपे उपाय आहेत.

ठळक मुद्देहौशीने आणि एवढे पैसे खर्च करून आणलेलं केशर खरोखरंच शुद्ध असेल, याची काही खात्री नाही. म्हणूनच तर केशराची शुद्धता तपासण्यासाठी या काही टिप्स..

सणावाराचे दिवस सुरू झाले की घरोघरी हमखास गोड पदार्थ तयार केले जातातच. गोड पदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी मग त्यात मोठ्या हौशीने केशर टाकलं जातं. केशर खरंतर खूप महाग मिळतं. पण तरी आपण मोठ्या उत्साहात ते आणतो आणि बऱ्याच गोड पदार्थात अगदी आवर्जून टाकतो. आपल्यालाही मग महागडं, पौष्टिक खाल्ल्याचं आणि खाऊ घातल्याचं समाधान मिळतं. पण एवढ्या हौशीने आणि एवढे पैसे खर्च करून आणलेलं केशर खरोखरंच शुद्ध असेल, याची काही खात्री नाही. म्हणूनच तर केशराची शुद्धता (How to identify the adulteration in keshar or saffron) तपासण्यासाठी या काही टिप्स..

 

नकली केशर कशाचे तयार होते?- मक्याच्या कणसाचे जे तंतू असतात, त्याला खाण्याचे रंग लावून त्यापासून नकली केशर बनविले जाते आणि ते अगदी खऱ्या केशराच्या किमतीत विकले जाते. 

कोजागरी पौर्णिमा स्पेशल : चवदार, सुगंधी दूध मसाला तयार करण्याची खास रेसिपी, विकतचा मसाला आणणं विसरून जाल

- केशराच्या काड्या दुधात किंवा गोड पदार्थात टाकल्या की सुवास येतो. आपण त्या सुवासाला भुलतो. पण ज्याप्रमाणे मक्याच्या तंतुंना लाल- केशरी रंग लावला जातो, त्याप्रमाणेच त्याला आर्टिफिशियल इसेन्सही लावला जातो. त्यामुळे मग भेसळयुक्त केशराचा अगदी खऱ्या केशराप्रमाणे किंबहुना त्यापेक्षाही अधिक सुवास येतो.

 

कसे ओळखायचे खरे केशर?केशरमधली भेसळ ओळखण्यासाठी ३ सोपे उपाय आहेत. घरच्याघरी तुम्ही ही चाचणी घेऊ शकता. १. गरम दुधात जेव्हा आपण केशर टाकतो, तेव्हा जर केशर खरे असेल तर त्याचे तंतू तुटत नाहीत. पण नकली केशर असेल तर त्याचे तंतू काही वेळाने तुटून जातात.

आतापासूनच रोज वापरा घरगुती अलमंड नाईट क्रिम; दिवाळीला फेशियल करायची गरजच पडणार नाही, त्वचा होईल चमकदार

२. असली केशर जे असते ते दुधात टाकल्यानंतर हळू- हळू रंग सोडते. त्याउलट नकली केशर टाकल्यावर अवघ्या एका मिनिटाच्या आतच दुधाचा रंग बदललेला दिसतो.

तांदुळावर प्लास्टिक कोटिंग तर नाही? बघा तांदळातली भेसळ ओळखण्याच्या ४ टिप्स

३. असली केशर टाकल्याने दुधाचा रंग सोनेरी किंवा अगदी हलका पिवळसर येतो. पण नकली केशरामुळे दुधाचा रंग गर्द पिवळा किंवा क्वचित प्रसंगी तर लालसर, केशरी देखील असतो. 

 

टॅग्स :अन्नकोजागिरी