उन्हाळ्याच्या दिवसांत थंडगार, लालचुटुक, रवाळ कलिंगड खाणे म्हणजे सुखद आनंद असतो. उन्हाळ्यात वाढत्या उन्हामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची फळ, ज्यूस, सरबत पिण्याला प्राधान्य देतो. कलिंगड आणि टरबूज अशी रसाळ फळ उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ली जातात. कलिंगड आणि टरबूज चवीला चांगले असण्यासोबतच आरोग्यदायी देखील असतात. या दोन्ही फळांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. या दोघांचे सेवन केल्याने शरीराला उष्णतेपासून आराम मिळतो.
कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी प्यावे की पिऊ नये ? बघा तज्ज्ञ नेमकं काय सांगतात...
ओन्ली माय हेल्थमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, टरबूजमध्ये ९२ % पाणी असते, जे हायड्रेट आणि तुमची तहान शमवण्यासाठी पुरेसे असते. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे ए आणि सी असतात. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचा निरोगी राहते. याशिवाय, हे कमी कॅलरी आणि उच्च फायबर समृद्ध फळ आहे. पण टरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अस्वस्थता आली आहे का?
आंबा खाल्ल्यावर लगेच खाऊ नयेत असे ५ पदार्थ, बिघडेल पोट-सांभाळा...
बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पाचक रस पातळ होतो आणि पचन प्रक्रियेत अडथळा येतो. मात्र, अनेक रिपोर्ट्समध्ये या गोष्टीचे खंडन करण्यात आले असून असे काहीही होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही.डॉक्टरांच्या मते, कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिणे सामान्यतः सुरक्षित असते आणि त्याचे कोणतेही विशेष दुष्परिणाम होत नाहीत. मात्र, कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यावे की पिऊ नये हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर अवलंबून असते.
कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याबाबत कोणताही नियम नाही...
कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याचा कोणताही विशिष्ट असा नियम नाही. जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा तुम्ही कलिंगड खाल्ल्यानंतर आरामात पाणी पिऊ शकता. उन्हाळ्यात दिवसभर हायड्रेट राहणे सर्वात महत्त्वाचे असते. आपले शरीर सुमारे ६० % पाण्याने बनलेले आहे आणि अनेक शारीरिक कार्यांमध्ये पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच, हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे शारीरिक असमतोल होऊ शकतो. कलिंगड शरीरातील पोषक तत्वांची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता पूर्ण करते.