Join us
Daily Top 2Weekly Top 5

गॅस संपला, सिलेंडर मिळेना? इंडक्शनवर करता येईल डाळ-भात, चपाती- ३ सोप्या ट्रिक्स- चपाती फुलेल मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2026 14:17 IST

Induction var chapati kashi karaychi: Gas samplyavar upay: Induction cooking tips Marathi: काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर इंडक्शनवर चपाती आणि डाळ-भात व्यवस्थित बनवता येईल.

अमेरिका-इराण युद्धामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही खंडित होऊ शकतो. अशातच तेल, पेट्रोल-डिझेल आणि सिलेंडरचा तुटवडा सगळीकडे जाणवायला लागला आहे. (Induction var chapati kashi karaychi) गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे तासनतास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परत यावे लागते. पण जर आपल्याकडे वीज उपलब्ध असेल तर इंडक्शन शेगडी हा एक चांगला पर्याय ठरु शकतो.( Gas samplyavar upay) अनेकांना प्रश्न पडतो की, इंडक्शनवर डाळ-भात तर होईल पण चपाती कशी फुलेल. पण काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर चपाती आणि डाळ-भात व्यवस्थित बनेल. 

Gudhipadwa 2026: गुढीपाडव्याला नेसा पारंपरिक मराठमोळी नऊवारी साडी! रेडी-टू-वेअरचे ५ लेटेस्ट पॅटर्न; मिनिटांत मिळेल राजघराण्यासारखा लूक

इंडक्शन कुकरमध्ये आपल्याला लागणाऱ्या जवळजवळ सर्व गोष्टी आपण बनवू शकतो. चहा, कॉफी, गरम दूध, मॅगी, पास्ता, उपमा, पोहे, सूप आणि विविध भाज्या सहज बनवता येतात. तसंच इंडक्शन कुकरमध्ये आपल्याला तळणे, उकळणे यांसारखे पदार्थ देखील बनवता येतात. 

अनेकांना असं वाटतं की भात फक्त गॅसवर किंवा कुकरमध्ये शिजवला जातो.इंडक्शनवर डाळ-भात लावताना नेहमी 'प्रेशर कुकर'चा वापर करावा. गॅसच्या तुलनेत इंडक्शनवर पाणी लवकर उकळते. डाळ-भात लावण्यापूर्वी तांदूळ आणि डाळ किमान २० मिनिटे भिजत ठेवा. यामुळे ते शिजायला कमी वेळ लागतो. इंडक्शनवर कुकर लावताना सुरुवातीला 'High Power' वर ठेवा आणि वाफ तयार झाली की 'Low Power' वर करून शिट्ट्या होऊ द्या.

शांत स्वभाव कमजोरी नाही ताकद, ‘या’ ४ गुणांमुळे इंट्रोवर्ट माणसं होतात यशस्वी-जगतात आनंदात

इंडक्शनवर चपाती करण्यासाठी लोखंडी तवा किंवा बिडाचा तवा वापरण्याऐवजी इंडक्शन फ्रेंडली फ्लॅट तवा वापरा. चपाती लाटून तव्यावर टाका. जेव्हा ती एका बाजून थोडी भाजली जाईल, तेव्हा ती उलटून घ्या. इंडक्शनवर फ्लेम नसल्यामुळे वाफेच्या मदतीने चपातीच्या कडा दाबून फुलवण्याचा प्रयत्न करा. 

आपल्याला गॅससारखी फुललेली चपाती हवी असेल तर एक स्टीलची जाळी इंडक्शन तव्यावर ठेवा. तवा गरम झाला की, चपाती दोन्ही बाजूने थोडी भाजून घ्या. मग तवा बाजूला ठेवून इंडक्शनच्या काचेवर जाळी ठेवून चपाती भाजा. उष्णतेच्या मदतीने चपाती भाजली जाईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gas shortage? Induction cooking: dal-rice, roti tips for perfect results.

Web Summary : Gas cylinder unavailable? Induction cooking is the solution! Learn easy tricks for cooking dal-rice and perfectly puffed rotis. Use pressure cooker for dal-rice and a flat pan with a mesh for roti.
टॅग्स :अन्नगॅस सिलेंडरअमेरिका-इस्रायल-इराण वॉर