दररोजच्या जेवणात भात करण्यासाठी आपल्याला तांदूळ फार मोठ्या प्रमाणावर लागतोच. तांदूळ हे आपल्या रोजच्या जेवणातील महत्वाचा पदार्थ असल्याने आपण घरात एकदम एकाच वेळी भरपूर प्रमाणात तांदूळ (how to store rice naturally at home) साठवून ठेवतो. तांदूळ फार मोठ्या प्रमाणांत साठवताना (cheap trick to prevent rice weevils) त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. तांदुळ साठवताना जर ते योग्य पद्धतीने साठवले नाहीत तर त्यात त्यात किडे, अळ्या किंवा पोरकिडे होऊ लागतात, ज्यामुळे ते खराब होतात आणि वापरण्यायोग्य राहत नाहीत. तांदळात किडे, अळ्या किंवा पोरकिडे (natural ways to keep bugs away from rice) होऊ नये म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्युक्त पावडर, औषध तांदुळात घालून ठेवतो. परंतु अशाप्रकारे केमिकल्सयुक्त उपायांचा वापर करण्यापेक्षा, घरगुती व पारंपरिक उपाय हे कधीही उत्तमच(home remedy to store rice for long time).
तांदुळात किडे, अळ्या किंवा पोरकिडे होऊ नये म्हणून बाजारातील केमिकलयुक्त उपाय वापरण्यापेक्षा घरगुती नैसर्गिक पद्धत अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरते. किचनमधील काही मसाल्यांची छोटीशी पोटली बनवून तांदळात ठेवली, तर तांदूळ ताजा राहतो आणि किडे होण्याची शक्यता कमी होते. या सोप्या उपायाने तुमचे तांदूळ दीर्घकाळ टिकतील आणि ताजे राहतील. तांदूळ खराब होऊ नये म्हणून त्यात नेमकी जादूई पोटली टाकावी ते पाहा.
तांदुळात किडे, अळ्या किंवा पोरकिडे होऊ नये म्हणून...
जर तुमच्या तांदळात आधीच किडे लागले असतील तर ते चांगले चाळून स्वच्छ करून घ्या. तांदळात एकही किडा राहता कामा नये. आता हे तांदूळ हवाबंद आणि कोरड्या डब्यात भरा. डब्यात अजिबात ओलावा नसावा, नाहीतर त्यात किडे किंवा अळ्या लगेच होतील. तांदूळ पूर्णपणे कोरडे असतील याची खात्री करा, कारण तांदळात ओलावा असल्यास बुरशी येण्याचा धोका असतो.
मूग-तूर-हरबरा-कोणती डाळ किती वेळ पाण्यात भिजवून शिजवली तर होत नाही गॅस-पित्ताचा त्रास?
एक टिशू पेपर किंवा एक छोट सुती कपडा घेऊन त्याच्या मध्यभागी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घाला. त्यांच्यावरच १० ते १२ अख्ख्या लवंगा आणि १० ते १२ अख्ख्या काळ्यामिरी घाला. आता टिशू पेपर किंवा कपडा चारही बाजूंनी उचलून एक छोटी पोटली बनवा आणि त्याला दोऱ्याने घट्ट बांधा. पोटली चांगली बांधलेली असावी जेणेकरून त्यातील कोणताही पदार्थ बाहेर पडणार नाही याची काळजी घ्या. आता तुम्ही ज्या डब्यात तांदूळ साठवून ठेवणार आहात, त्यात ही पोटली तळाशी किंवा मध्यभागी दाबून ठेवा. तुमच्याकडे तांदळाचे प्रमाण जास्त असेल तर तुम्ही एकापेक्षा जास्त पोटल्या बनवून ठेवू शकता. पोटली ठेवल्यानंतर तांदळाच्या डब्याचे झाकण नीट लावून ठेवा.
प्लास्टिकच्या बादल्या-मग- आंघोळीचे पाट तुटले? १ इन्स्टंट ट्रिक - तुटलेले प्लास्टिकही चिकटेल मस्त...
मोदकाला कळ्या पाडण्याचे टेन्शन विसरा! करा झटपट होणारे पोटली मोदक -स्वादिष्ट आणि दिसतातही सुबक...
या पोटली मधील मसाल्यांचा नैसर्गिक सुगंध आणि औषधी गुणधर्म तांदळात कीड, अळ्या किंवा पोरकिडे होऊ देत नाहीत. किड्यांना आणि अळ्यांना तिखट वास आणि काही विशिष्ट मसाल्यांचा सुगंध अजिबात आवडत नाही. लवंग आणि काळीमिरीचा तिखट वास आणि तिखटपणा किड्यांसाठी असह्य असतो, ज्यामुळे ते दूर पळतात. तर हळदीमध्ये करक्यूमिन नावाचे संयुग असते, ज्यात बुरशीविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे तांदळाला खराब होण्यापासून वाचवते आणि मीठ ओलावा शोषून घेण्याचे काम करते.