बाजारात गेल्यानंतर भाजी काय घ्यावी असा प्रश्न पडतो. अनेक महिला आठवड्याभराची भाजी एकाच वेळी खरेदी करतात.(remove worms from cauliflower) पण काही भाज्या ताज्या, फ्रेश आणि स्वच्छ दिसल्या की, आपण अधिक प्रमाणात घेतो. अशा भाज्या व्यवस्थित स्वच्छ करुन फ्रिजमध्ये ठेवतो. परंतु कधी कधी या भाज्या स्वच्छ करताना काही वेळा किडे किंवा अळ्या यात दिसतात.(how to clean cauliflower easily) या अळ्या भाज्यांना सहज खराब करतात. (cauliflower cleaning hacks)
कोबी, फ्लॉवर किंवा पालक यांसारख्या भाज्यांमध्ये अळ्या आणि किडे भरपूर असतात. या अळ्या किंवा किडे काढणे सोपे काम नाही.(kitchen tips for cleaning cauliflower) पालेभाज्यांवर किड सहज दिसते पण कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाज्यांचा गड्डा असल्यामुळे त्यात किड दिसत नाही.(quick method to wash cauliflower) अशावेळी आपल्याला भाजी चिरण्याचा देखील वैताग येतो. पण काही सोप्या पद्धतीने भाजी न कापता त्यातील किडे व अळ्या सहज काढता येईल.
ना लाटण्याची झंझट ना कणिक मळण्याचं टेंशन, मोजून १० मिनिटांत पराठे करण्याची एक सोपी ट्रिक
बाजारातून फ्लॉवर खरेदी केल्यानंतर कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. यात अधिक प्रमाणात जंत असतात.जे कधीकधी इतर अन्नपदार्थ आणि फ्रीजमध्ये पसरु शकतात. फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी त्यातील अळ्या-किडे काढून टाका. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका भांड्यात पाणी घ्यावे लागेल. त्यात फ्लॉवर पूर्ण बुडेल असं भांडं निवडा. आता त्यात फ्लॉवर ठेवा.
फ्लॉवरच्या वर काही तरी जड ठेवा म्हणजे ती पाण्यात तरंगणार नाही. आपण त्याचे देठ देखील काढू शकतो. हवं असल्यात कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे भाजीत लपलेले किडे किंवा अळ्या सहज निघण्यास मदत होईल. ही भाजी आता आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. बनवण्यापूर्वी आपण त्याचे तुकडे करुन पुन्हा एकदा गरम पाण्यात उकळवा. ज्यामुळे त्यातील जंत मरतील.
भाज्यांची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी त्यावर विविध प्रकारचे खत किंवा औषधांची फवारणी केली जाते. या औषधांमध्ये हानिकारक घटक असतात जे आपल्याला आरोग्यासाठी घातक ठरतात. त्यासाठी चिंचेचे पाणी तयार करुन त्यात काही वेळ भाज्या ठेवा. ज्यामुळे भाज्यांमधील घाण, किडे निघून जाण्यास मदत होईल.