Join us  

अर्धवट संपलेला आईस्क्रिमचा फॅमिली पॅक फ्रिजमध्ये ठेवताना ३ चुका टाळा, बघा आईस्क्रिम ठेवण्याची योग्य पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2024 6:21 PM

How To Store Left Over Ice Cream: आईस्क्रिम फ्रिजमध्ये ठेवताना काही चुका करणं टाळावं. कारण तो ही शेवटी दुधापासूनच तयार केलेला पदार्थ आहे. (how to store ice cream)

ठळक मुद्देउरलेला पॅक आपण फ्रिजमध्ये ठेवून देतो. पण तो ठेवताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे घरोघरी आईस्क्रिम आणलं जातं. घरातल्या सगळ्यांनाच एकाच प्रकारचं आईस्क्रिम आवडत असेल तर हमखास फॅमिली पॅक आणले जातात. प्रत्येकाला वेगवेगळं आईस्क्रिम घेण्यापेक्षा एकच मोठा पॅक घेतला तर तो जरा किमतीच्या बाबतीतही परवडतो. पण कित्येकदा असंही होतं की एकदा फोडलेला पॅक त्याचवेळी संपत नाही. त्यातला थोडा उरतोच (How to refreeze left over ice cream). तो उरलेला पॅक आपण फ्रिजमध्ये ठेवून देतो. पण तो ठेवताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे (how to store ice cream). कारण आईस्क्रिम हे शेवटी दुधापासून तयार झालेले असते. ते खराब होऊ शकतेच. (Summer special tips and tricks)

 

उरलेलं आईस्क्रिम फ्रिजमध्ये ठेवण्याची योग्य पद्धत

१. आईस्क्रिमचे फॅमिली पॅक बऱ्याचदा कागदी खोक्यात येतात. आपण ते जसेच्यातसे फ्रिजरमध्ये ठेवताे. घरचं फ्रिज वारंवार उघडलं जातं. त्यामुळे त्याचं तापमान कमी- जास्त होत असतं.

उन्हामुळे कुंडीतली माती काेरडी पडून रोपं सुकतात? ३ उपाय- माती राहील ओलसर- रोपं हिरवीगार

त्यामुळे बऱ्याचदा खोक्याचा कागद सैलसर पडतो. त्यामुळे जेव्हा कागदी खोक्यातलं आईस्क्रिम असेल तेव्हा ते तसंच फ्रिजमध्ये ठेवू नका. एका एअरटाईट डब्यात घाला आणि मग फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे खोक्याचा कागद चांगला राहील आणि त्याच्यातलं आईस्क्रिम खराब होणार नाही.

 

२. आईस्क्रिम फ्रिजरमध्येच तर ठेवलं आहे, मग त्याला काय होणार असं म्हणून अनेक जण आईस्क्रिमचं पाकिट व्यवस्थित बंदही करत नाहीत. प्लास्टिकच्या कंटेनरचं झाकण लावलं जातं. पण कागदी पाकिटातलं आईस्क्रिम बऱ्याचदा उघडंच राहतं. असं फ्रिजरमध्ये उघडं ठेवलेलं आईस्क्रिम खाणं चांगलं नाही.

घर स्वच्छ- चकाचक ठेवण्याचे स्वस्तात मस्त उपाय, बघा घरगुती पदार्थ वापरून कशी करायची स्वच्छता

३. आईस्क्रिम फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर लाईट गेले तर आईस्क्रिम वितळते. पुन्हा जेव्हा लाईट येतात तेव्हा पुन्हा आईस्क्रिम घट्ट होते. असं वितळून पुन्हा घट्ट झालेलं आईस्क्रिम खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. कारण या प्रक्रियेमुळे त्यांच्यातल्या घटकांचं प्रमाण पुर्णपणे बदलून जातं.

 

टॅग्स :अन्नसमर स्पेशलकिचन टिप्स