Join us  

गणपती- गौरीसाठी करा तांबूल, घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास पदार्थ, छानसा तांबूल वाढवेल रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2023 4:30 PM

Tambul Recipe For Gauri Ganapati Festival: पानांचा विडा तर आपण नेहमीच खातो. आता घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी झटपट चवदार तांबूल कसा करायचा ते पाहूया...

ठळक मुद्देहळदी- कुंकू कार्यक्रमासाठीही तांबूल करून ठेवा. येणाऱ्या महिलाही तांबुलाची चव घेऊन अगदी खुश होऊन जातील.

गणपती आणि महालक्ष्मी किंवा गौरीचा सण (Gauri Ganapati festival) म्हणजे घरी पाहुण्यांची नुसती लगबग असते. या सणांच्या निमित्ताने काही पाहुणे घरी जेवायला येतात तर काही पाहुणे दर्शनाला, हळदी- कुंकू कार्यक्रमाला येतात. घरी पाहूणा आला म्हटलं की आपण त्याला फराळाचं देताेच. म्हणूनच फराळ झाल्यानंतर येणाऱ्या पाहुण्याला विड्याऐवजी छानसा चवदार तांबूल द्या (How to make tambul?). हळदी- कुंकू कार्यक्रमासाठीही तांबूल करून ठेवा. येणाऱ्या महिलाही तांबुलाची चव घेऊन अगदी खुश होऊन जातील. (Easy and quick recipe of tambul )

 

तांबूल करण्याची रेसिपी

साहित्य

विड्याची २५ ते ३० पाने

अर्धा टी स्पून कात पावडर

पावसाळ्यात कुंडीतली माती शेवाळली- हिरवीनिळी झाली? लवकर करा ३ गोष्टी, नाहीतर झाडं जातील कोमेजून

३ टेबलस्पून खोबऱ्याचा किस

७ ते ८ वेलची

१० ते १२ लवंगा

५ ते ६ टेबलस्पून बडिशेप

२ ते ३ टेबलस्पून ज्येष्ठमध

 

रेसिपी

१. सगळ्यात आधी विड्याची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि त्यांची देठे काढून टाका.

२. त्यानंतर विड्याच्या पानांचे हातानेच तुकडे तुकडे करा.

मुलांच्या छातीत कफ झाला? करा ३ पदार्थांचा सोपा घरगुती उपाय, अतिशय असरदार- कफ लवकर कमी होईल

३. खोबऱ्याचा किस करून घ्या आणि तो एखादा मिनिट कढईमध्ये भाजून घ्या.

४. खोबऱ्याचा किस भाजून झाला की वेलची आणि लवंगही अर्धा ते एखादा मिनिटे भाजून घ्या. वेलचीची टरफले काढून टाकावीत आणि नंतर ती भाजावी.

 

५. यानंतर बडिशेपही २ ते ३ मिनिटे कढईत टाकून मंद आचेवर भाजून घ्या.

फक्त २० रुपयांत सगळं घर होईल एकदम स्वच्छ- चकाचक, ते ही कमी मेहनतीत.. कसं?? पाहा ८ भन्नाट उपाय

६. आता भाजलेले सगळे पदार्थ थंड झाले की ते मिक्सरच्या भांड्यात टाका. विड्याच्या पानांचे तुकडेही टाका. तसेच कात आणि ज्येष्ठमध पावडरही टाका.

७. हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेतलं की झाला चवदार तांबूल तयार... 

 

टॅग्स :गणेशोत्सवअन्नगणेश चतुर्थी रेसिपी