एखादे निसर्गरम्य ठिकाण, भुरभुरणारा पाऊस आणि त्यांच्या जोडीला गरमागरम भुट्टा म्हणजे मक्याचं कणीस... असे चित्र आपल्याकडे नेहमीच दिसून येते. आपल्याकडील पावसाळा हा मक्याच्या कणसाशिवाय अधूराच म्हणावा लागेल. पावसाळ्याच्या दिवसात मक्याचे दाणे खाण्याचा आनंदच काही वेगळा असतो. तिखट-मीठ आणि लिंबू पिळलेला मका पाहिल्यानंतर ते खाण्याचा मोह आवरला जात नाही.
साहित्य :-
१. बारीक रवा - ३/४ कप २. दही - १/२ कप ३. पाणी - १/२ कप ४. हिरव्या मिरचीची पेस्ट - १/२ टेबलस्पून ५. हळद - १ टेबलस्पून ६. हिंग - १/२ टेबलस्पून ७. तेल - १ टेबलस्पून ८. मीठ - चवीनुसार ९. उकडवून घेतलेले मक्याचे दाणे - १/२ कप (मक्याचे दाणे उकडवून किंचित मिक्सरला फिरवून बारीक करुन घ्यावेत.)१०. फ्रुट सॉल्ट - १/२ टेबलस्पून
घरच्याघरी करा परफेक्ट ढोकळा प्रिमिक्स, १० मिनिटांत लुसलुशीत ढोकळा तयार ! पीठ टिकते ६ महिने...
कृती :-
१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये, बारीक रवा ओतून घ्यावा मग त्यात दही व गरजेनुसार पाणी घालावे, हे मिश्रण चमच्याने ढवळून घ्यावे. २. आता या मिश्रणात हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद, हिंग, तेल, मीठ घालून सगळे मिश्रण ढवळून एकजीव करून घ्यावे. ३. त्यानंतर हे तयार मिश्रण ५ मिनिटे झाकून ठेवावे. ४. ५ मिनिटांनंतर या ढोकळ्याच्या मिश्रणात उकडवून किंचित मिक्सरला फिरवून बारीक करुन घेतलेले मक्याचे दाणे घालावेत.
ढोकळा हवा तसा मनासारखा फुलून येत नाही ? सोडा घालण्याची पद्धत तर चुकत नाही ना...
आता चिकाच्या दुधाशिवाय बनवा तितक्याच सुंदर चवीचा खरवस...खरवसाची जिभेवर रेंगाळणारी चव...
५. चमच्याने ढळवून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणात फ्रुट सॉल्ट घालून मिश्रण ढवळून एकजीव करून घ्यावे. ६. आता एक प्लेन डिश घेऊन त्या डिशला तेल लावून मग त्यात हे ढोकळ्याचे बॅटर ओतावे, किंवा जर आपल्याकडे छोट्या छोट्या वेगवेगळ्या आकाराच्या वाट्या असतील तर त्याला तेल लावून मग हे बॅटर त्यात ओतावे. ७. त्यानंतर हा ढोकळा वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये किंवा कुकरमध्ये ठेवून द्यावा. १० ते १५ मिनिटे हा ढोकळा कुकरमध्ये वाफवून घ्यावा. ८. ढोकळा वाफवून झाल्यानंतर तो कुकरमधून काढून त्याचे काप पडून घ्यावेत किंवा मोल्डमध्ये ठेवले असल्यास ते काढून घ्यावेत.
कॉर्न रवा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. हा ढोकळा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.