Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुकरमध्ये १० मिनिटांत करा स्ट्रीट स्टाईल पावभाजी, डिनरसाठी खास वनपॉट रेसिपी, झटपट होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2025 16:35 IST

Street style pav bhaji: One pot pav bhaji recipe: Pressure cooker pav bhaji: अवघ्या १० मिनिटांत कुकरमध्ये होणारी पावभाजीची रेसिपी पाहूया.

पावभाजी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. रस्त्यावरच्या गाडीवर मिळणारी झणझणीत, बटर- तूप घातलेली पावभाजी अनेकांची फेव्हरेट असते.(Street style pav bhaji)  पावभाजी हा असा पदार्थ आहे जो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडतो. खायला जितकी सोपा वाटणारा हा पदार्थ बनवताना मात्र नाकी नऊ येतो.(One pot pav bhaji recipe) तासंतास भाज्या निवडा, बटाटे उकडवा.. पावभाजी घरी बनवणं अनेकांना वेळखाऊ काम वाटतं म्हणून बऱ्यापैकी लोक घरी बनवण्याची झंझट ठेवत नाही. पण १० मिनिटांत खूप भांडी न भरवता पावभाजी करायची असेल तर १ गोष्ट लक्षात ठेवा. (Quick dinner recipe)रोजच्या धावपळीत वेगवेगळी भांडी वापरून भाजी करायला वेळ नसतो. अशावेळी वन पॉट पावभाजी हा उत्तम पर्याय ठरतो.(10 minute pav bhaji) कमी वेळ, कमी भांडी आणि तरीही चवीत कोणतीही तडजोड नाही. उलट घरच्या घरी स्ट्रीट स्टाइलची झणझणीत पावभाजी सहज करता येते. अवघ्या १० मिनिटांत कुकरमध्ये होणारी पावभाजीची रेसिपी पाहूया. (Easy pav bhaji at home)

Saree Day 2025 : बापरे.. साडी घेणार की फ्लॅट? भारतातील सगळ्यात महागड्या १० साड्या, तेवढ्यात किमतीत येईल घर

साहित्य 

तूप - १ चमचा बटर - ४ मोठे चमचेउभा चिरलेला कांदा - २ मोठा चिरलेला टोमॅटो - २ मीठ - चवीनुसार आले-लसूण पेस्ट - १ चमचाफ्लॉवर - १ वाटी शिमला मिरची - १ बटाटे - २ बीट - १ उकडवलेले वाटाणे - १ वाटी हळद - १ चमचा पावभाजी मसाला - १ चमचा लाल तिखट - १ चमचा पाणी - आवश्यकतेनुसार कोथिंबीर - आवश्यकतेनुसार 

कृती 

1. सगळ्यात आधी सर्व भाज्या धुवून व्यवस्थित चिरुन घ्या. त्यानंतर गॅसवर कुकर ठेवून ३ चमचे तेल, २ चमचे बटर आणि २ मोठे चिरलेले कांदे परतावून घ्या. कांदा लालसर होत आला की त्यामध्ये टोमेटो घालून परतवून घ्या. 

2. कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यात मीठ घालून चांगले परतून घ्या. त्यात आले लसूण पेस्ट घाला. आता पावभाजीच्या भाज्या एक एक करून घालून घ्या. फ्लॉवर, सिमला मिरची, बटाटा छान परतून घ्या. पावभाजीला छान लालसर रंग येण्यासाठी बिट घाला. सर्व भाज्या परतवून घ्या.

3. यामध्ये हळद, लाल तिखट आणि पावभाजी मसाला घालून पुन्हा परवतून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरचे झाकण लावा. ४ शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होऊ द्या. 

4. आता कुकरमधील मिश्रण चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्या. वरुन बटर आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. २ मिनिटे झाकून ठेवा तयार होईल झटपट पावभाजी. 

English
हिंदी सारांश
Web Title : 10-Minute Cooker Pav Bhaji: Quick, Easy, and Street-Style Dinner

Web Summary : Craving Pav Bhaji? This one-pot cooker recipe delivers street-style flavor in just 10 minutes! Skip lengthy prep; enjoy a quick, delicious dinner with minimal cleanup. Perfect for busy weeknights.
टॅग्स :अन्नपाककृतीहिवाळ्यातला आहार