नेहमीच गोडाचे पदार्थ खाऊन आपल्याला वैताग येतो. आपल्या सतत काहीतरी तिखट खावेसे वाटते. (Tomato Thecha recipe) अशावेळी आपल्याला आठवण येते ती ठेच्याची. गरमागरम वरण भातासोबत किंवा भाकरीसोबत आवडीने खाल्ला जातो तो मिरचीचा ठेचा. या मिरचीच्या ठेच्याला वेगळी कसली जोड द्यायची असेल तर आपण बनवू शकतो कच्च्या टोमॅटोचा ठेचा.(Spicy Tomato Thecha recipe) ताटाच्या डाव्या बाजूला हमखास वाढता येईल. भाजी बनवण्याचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करुन पाहू शकता. (Easy Tomato Thecha preparation)फोडणीसाठी किंवा पदार्थाची चव वाढवण्यासाठी हमखास टोमॅटोचा वापर होतो.(Tomato Thecha with green chilies) कच्चे टोमॅटोला मस्त भाजून आणि ठेचून आपण त्याचा ठेचा ट्राय करु शकतो. एकदम झणझणीत आणि चटपटीत बनेल. हा ठेचा मस्त ४ ते ५ दिवस राहिल. मोठ्यांसह लहान मुलं देखील आवडीने हा पदार्थ खातील. (Healthy Tomato Thecha recipe)
टोमॅटोचा ठेचा करण्यासाठी लागणारं साहित्य
हिरवे टोमॅटो ४-५ हिरव्या मिरच्या १०-१५ लसूण पाकळ्या १०-१५ भाजलेले शेंगदाणे १/४ वाटी जिरे १ चमचा मीठ - चवीनुसारकोथिंबीर १/४ वाटी तेल २ चमचे सुकी मिरची २-३ हिंग १/४ चमचा७-८ पाकळ्या ठेचलेला लसूण भिजवलेली चना डाळ १/२ वाटी
कृती
1. सगळ्यात आधी टोमॅटोच्या चकत्या कापून घ्या. त्यानंतर तव्यावर दीड चमचा तेल घालून गरम करा. यामध्ये गोल कापलेल्या टोमॅटोच्या चकत्या भाजून घ्या.
2. दोन्ही बाजूने टोमॅटोच्या चकत्या भाजल्या की, ताटात काढून घ्या. त्यानंतर तव्यावर शेंगदाणे भाजून घ्या.
3. तव्यावर तेल टाकून त्यात लसूण, हिरव्या मिरच्या, जिरे आणि मीठ घालून भाजून घ्या. यानंतर भिजवलेली चणाडाळ आणि मीठ कोरडी होईपर्यंत भाजून घ्या.
4. भाजलेल सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर आणि भाजलेल्या टोमॅटोच्या चकत्या पाणी न घालता जाडसर वाटून घ्या.
5. त्यानंतर फोडणीसाठी तेलात हिंग, ठेचलेला लसूण, लाल सुक्या मिरचीचा तडका तयार करा. तयार झालेल्या ठेच्यावर हा तडका मिक्स करा.
6. तयार होईल कच्च्या टोमॅटोच्या झणझणीत ठेचा. भाकरी-भातासोबत खा...