Lokmat Sakhi >Food > आता घरच्या घरी करा 'रागी चोकोस पफ', हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ, विकतपेक्षा भारी चव

आता घरच्या घरी करा 'रागी चोकोस पफ', हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ, विकतपेक्षा भारी चव

Ragi Choco Puff recipe: Healthy ragi snacks: नाचणीच्या पीठाचे करा रागी पफ, सकाळच्या नाश्त्यात मुलांचा आवडीचा खाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2025 14:05 IST2025-05-04T14:00:00+5:302025-05-04T14:05:01+5:30

Ragi Choco Puff recipe: Healthy ragi snacks: नाचणीच्या पीठाचे करा रागी पफ, सकाळच्या नाश्त्यात मुलांचा आवडीचा खाऊ

how to make ragi Choco puff at home healthy and tasty recipe nutritious food | आता घरच्या घरी करा 'रागी चोकोस पफ', हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ, विकतपेक्षा भारी चव

आता घरच्या घरी करा 'रागी चोकोस पफ', हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ, विकतपेक्षा भारी चव

मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागल्या आहेत. अशातच मुलांना सतत चॉकलेट किंवा गोडाचे पदार्थ खाण्याची इच्छा होत राहते. (Ragi Choco Puff recipe) सकाळचा नाश्ता हा मुलांसाठी खरेतर हेल्दी आणि पौष्टिक असायला हवा.(Healthy ragi snacks) मैद्याचे किंवा तेलाचे पदार्थ मुलांनी खाऊ नये यासाठी आपण त्यांना दुधासोबत चोकोस खाऊ घालतो. (Homemade ragi choco puff)मुलांना नुसते दूध प्यायला आवडत नाही म्हणून मुले देखील आवडीने खातात. (Ragi puff recipe for kids)
हल्ली बाजारात विविध प्रकारच्या ब्रॅण्डच्या चोकोसची चव चाखायला मिळते.(Nutritious ragi chocolate snack) परंतु, अनेकदा त्यात असणारे गोडाचे आणि मैद्याचे प्रमाण मुलांच्या आरोग्यासाठी फारसे चांगले नसते.(Healthy millet puff recipe) यासाठी आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने नाचणीच्या पिठाचे चोकोस पफ घरात बनवू शकतो. ज्यामुळे मुलांच्या शरीराचा विकास देखील होईल आणि हेल्दी पदार्थ खाल्ल्यामुळे पोट देखील भरलेले राहिल. यामध्ये लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. हे पफ आपण एकदाच बनवून स्टोअर देखील करु शकतो. पाहूयात कसे करायचे रागी चोकोस पफ. 

सकाळी ब्रेकफास्ट होईल पौष्टिक - चमचमीत, करा चमचमीत इडली मंचुरियन, शिळ्या इडलीला नवा ट्विस्ट

साहित्य 

नाचणीचे पीठ - १/४ कप 
पाणी - १ कप 
रवा - १/४ कप 
कोको पावडर - २ कप 
साखर - २ चमचे 
तूप - १ चमचा 

">


कृती 

1. सगळ्यात आधी पॅनमध्ये नाचणीचे पीठ घेऊन त्यात पाणी घाला. मंद आचेवर पीठ चांगले घट्ट होईपर्यंत शिजवा. 

2. त्यात रवा, कोको पावडर, साखर आणि तूप घालून पुन्हा मंद आचेवर व्यवस्थित शिजवून घ्या. 

3. पीठ चिकट होणार नाही याची काळजी घ्या. तयार पीठाचा व्यवस्थित गोळा होईल याची काळजी घ्या. 

4. आता मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे रोल करा. सुरीने बारीक तुकडे करुन घ्या. 

5. एअर फ्रायमध्ये तयार छोटे तुकडे व्यवस्थित बेक करा. तयार होईल रागी चोकोस पफ. काचेच्या भरणीत बरुन ठेवा. 

6. गरम दुधासोबत हेल्दी-पौष्टिक रागी चोकोस पफ मुलांना खाऊ घाला. 

 

Web Title: how to make ragi Choco puff at home healthy and tasty recipe nutritious food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.