Join us

अनारसे बिघडतात? घ्या अचूक प्रमाण, हलके- कुरकुरीत जाळीदार होतील अनारसे - पारंपरिक सिक्रेट टीप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2025 09:30 IST

anarsa recipe: crispy anarsa tips: traditional anarsa making: Diwali faral recipes: अनारसे बनवताना तांदूळ कोणता घ्यावा, बिघडल्यास काय करायला हवं. असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही रेसिपी नक्की पाहा.

दिवाळी सुरु होणाऱ्यापूर्वीच आपण घराची साफसफाई, फराळ, कंदील- दिवे यांसारख्या गोष्टींच्या पूर्वतयारीला लागतो. दिवाळी म्हटलं की फराळाचा सुगंध आठवतो. (Diwali faral recipes) तुपाचा सुवास, गुळाचा गंध आणि तळलेले पदार्थ. दिव्यांच्या आराससोबत फराळ आपल्याला आठवण येते. दिवाळीत चिवडा, लाडू, करंजी, चकली आणि अनारसेशिवाय फराळाचे ताट अपूर्ण वाटते. (anarsa recipe) फराळाच्या पदार्थात काही पदार्थ बनवणं अतिशय सोपं असते. (crispy anarsa tips) पण याउलट काही पदार्थ बनवणे म्हणजे तारेवरची कसरत. फराळाच्या पदार्थांपैकी एक म्हणजे अनारसे. (traditional anarsa making) चवीला गोड, जाळीदार, हलका आणि कुरकुरीत अनारसे खाण्याची इच्छा आपल्या होते. पण तो बनवण्यासाठी आपल्याला मोठा घाट घालावा लागतो. अनेकदा अनारसे बनवताना ते फसतात, चुकतात, तळताना करपतात. (Maharashtrian anarsa recipe) यामुळे पुन्हा बनवण्याचा आपण प्रयत्न करत नाही. (how to make soft and crispy anarsa) अनारसे बनवताना तांदूळ कोणता घ्यावा, बिघडल्यास काय करायला हवं. असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही रेसिपी नक्की पाहा. (Diwali sweets recipe)

करंज्या तेलात फुटतात, मऊ पडतात? ७ टिप्स - होतील खुसखुशीत, एकही करंजी फुटणारी नाही

साहित्य 

तांदळाची पिठी- ३ कपगूळ - तांदळानुसार १ कप खसखस - चवीनुसार तळण्यासाठी तेल - आवश्यकतेनुसार साजूक तूप - आवश्यकतेनुसार 

कृती 

1. अनारशाचे पीठ तयार करताना तांदूळ हा नवीन घेऊ नका. तांदूळ घेतल्यानंतर तो २ ते ३ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यातील पाणी काढून घ्या. त्यानंतर त्यात पुन्हा पाणी घालून झाकून ठेवा. ही प्रोसेस ३ ते ४ दिवस सारखीच करावी. ४ दिवसांनी चाळणीवर भिजवलेले तांदूळ ठेवून त्यातील पाणी निघू द्या. नंतर सुती कापडात हवे खाली सुकवून घ्या.

2. या तांदळाला मिक्सरमध्ये वाटून त्याची पिठी तयार करा. चाळणीने ही पिठी चाळून घ्या. आता त्यात चिरलेला गूळ घालून व्यवस्थित हाताने एकजीव करा. तयार मिश्रणाचे गोळे करुन लाडूचा आकार द्या. हे गोळे हवाबंद डब्यात १ दिवस ठेवा. दुसऱ्या दिवशी पुन्हा याला व्यवस्थित मळून हवाबंद डब्यात ठेवा. ही प्रोसेस तीन दिवस सारखीच करावी. 

3. तिसऱ्या दिवशी अनारसे बनवताना पिठाचे एकसारखे गोळे तयार करुन घ्या. साजूक तूप बोटांना लावून हळूहळू पुरीसारखं फिरवा. एका बाजूने आता खसखस लावा. कढईत तेल तापवून मंद आचेवर अनारसे तळून घ्या. तयार होतील खुसखुशीत जाळीदार, हलके, कुरकुरीत अनारसे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Perfect Anarsa Recipe: Crispy, Light, and Lacy Diwali Sweet Secrets

Web Summary : Make perfect Anarsa for Diwali! Use aged rice, soak it properly, grind into flour, mix with jaggery, and let it rest. Shape, add poppy seeds, and fry until golden and crispy. Enjoy this traditional treat!
टॅग्स :दिवाळी २०२५अन्न