आज गणेश चतुर्थीचा दिवस, म्हणजेच घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होणार. गणपती बाप्पांसाठी नैवद्य आणि प्रसाद करायचा म्हटलं तर मोदकांचा मान सगळ्यात पहिलाच. मोदकांशिवाय (Instant Rava Modak In Idli Stand) बाप्पांचा नैवेद्य आणि प्रसाद अधूराच आहे. गणपती बाप्पांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार करतोच. कधी उकडीचे तर कधी तळणीचे असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक घरोघरी तयार केले जातात. मोदक तयार करायचा म्हटलं की, खूप मोठा घाट घालावा लागतो. इतकी मेहेनत घेऊनही मोदकांचा बेत फसला तर अक्षरशः हिरमोड होतोच(How to make Instant Rava Modak in Idli Stand).
सणावारा दरम्यान कामांच्या घाई - गडबडीत मोदकांचा इतका मोठा घाट घालणे शक्य नसते. अशा परिस्थितीत, कमी वेळात झटपट होतील अशी इन्स्टंट मोदकांची खास रेसिपी हवे असेच वाटते. यावर्षी आपण गणपती बाप्पासाठी झटपट आणि तितकेच चविष्ट इन्स्टंट रवा मोदक झटपट तयार करु शकतो. विशेष म्हणजे, यासाठी उकड काढायची किंवा सारण (rava modak in idli stand) तयार करण्याची झंझटच लागत नाही. आपण स्वयंपाक घरातील इडली पात्रात (quick rava modak for prasad) झटपट करता येतील असे इन्स्टंट रवा मोदक तयार करु शकतो. कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने बाप्पासाठी स्वादिष्ट असे रवा मोदक कसे तयार करायचे याची सोपी रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. साजूक तूप - २ ते ४ टेबलस्पून २. बारीक रवा - १ कप ३. सुकं खोबरं - १ कप (बारीक किसलेलं खोबरं)४. पाणी - गरजेनुसार५. साखर - चवीनुसार ६. केशर काड्या - १५ ते २० (पाण्यांत भिजवलेल्या)७. ओल्या नारळाचे लहान तुकडे - १/२ कप ८. केळीचे किंवा हळदीचे पान - २ ते ३ पाने
कृती :-
१. एका मोठ्या कढईत थोडे साजूक तूप घेऊन त्यात बारीक रवा हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. २. रवा चांगला भाजून घेतल्यानंतर त्यात किसलेलं सुकं खोबरं घालावं. ३. दुसऱ्या एका मोठ्या कढईत पाणी घेऊन त्यात साखर घालावी, मग साखर संपूर्णपणे विरघळवून घ्यावी. साखर विरघळून झाल्यावर त्यात केशर काड्या भिजवलेले पाणी, ओल्या नारळाचे लहान तुकडे व रव्याचे भाजून घेतलेले मिश्रण घालावे.
तांदळात अळ्या, पोरकिडे होऊ नये म्हणून, घाला ही जादूई पोटली, खराब न होता तांदूळ टिकेल वर्षानुवर्षे...
मोदकाला कळ्या पाडण्याचे टेन्शन विसरा! करा झटपट होणारे पोटली मोदक -स्वादिष्ट आणि दिसतातही सुबक...
. आता सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. ५. गॅसच्या मंद आचेवर हे सारण व्यवस्थित शिजवून घ्यावे. सारण कढईच्या कडा सोडू लागले की समजावे आपले मोदकांचे सारण तयार झाले आहे. सारण संपूर्णपणे शिजवून हलकेसे कोरडे करून घ्यावे. ६. मोदकाच्या साच्याला थोडे तूप लावून तयार सारण आत भरुन मोदक तयार करुन घ्यावा. ७. इडली पात्रात केळीचे किंवा हळदीचे पान घालून त्यावर हे मोदक ठेवून द्यावेत. १० ते १५ मिनिटे इडली पात्रात मोदक वाफवून घ्यावेत.
फारशी मेहेनत न घेता, मोठा घाट न घालता इडली पात्रात मस्त गरमागरम इन्स्टंट रवा मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार आहेत.