सकाळचा नाश्ता नेहमी पोटभरीचा आणि ऊर्जात्मक असावा असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं.(Cucumber idli recipe) त्यातील काही साउथ इंडियन पदार्थ हे रोजच आपल्या घरी बनत असतात.(Southekai idli) इडली हा पदार्थ असा आहे जो नाश्त्याला सर्वांनाच खायला आवडतो.(Instant idli recipe) डाळ, तांदूळ भिजवून इडलीचे बॅटर तयार केले जाते.(No fermentation idli) पण अनेकदा बॅटर व्यवस्थित फुगत नाही किंवा नीट आंबवले गेले नाही तर इडली व्यवस्थित बनत नाही.(Healthy breakfast recipe) त्याच त्याच प्रकारची इडली खाऊन देखील आपल्याला वैताग येतो. नेहमीच्या डाळ-तांदळाच्या इडलीला आपण एक नवा ट्विस्ट देऊ शकतो.
काकडी ही आपल्या शरीराला थंडावा देणारी, हलका आणि पौष्टिक पदार्थ आहे. काकडीची इडली ही रेसिपी खास आहे. कर्नाटकात या इडलीला “Southekai Idli” म्हणून ओळखतात आणि विशेष म्हणजे यात तांदळासोबत किसलेली काकडी मिसळली जाते, ज्यामुळे इडलीचा स्वाद तर वाढतोच, पण ती अधिक मऊ बनते. ही काकडी इडली कशी बनवायची पाहूया.
कडू कारल्याचा झणझणीत ठेचा! सोपी आणि चविष्ट रेसिपी, भाकरी- वरणभातासोबत लागेल मस्त
साहित्य
काकडीचा किस - दीड कप
इडली रवा - ३/४ कप
मीठ - चवीनुसार
किसलेले खोबरे - ३/४ कप
हिरवी मिरची - १ ते २
चिरलेली कोथिंबीर - २ चमचे
पाणी - २ चमचे
कृती
1. सगळ्यात आधी दोन काकडी किसून घ्या. नंतर एका बाऊलमध्ये किसलेली काकडी, इडली रवा आणि मीठ घालून सर्व साहित्य मिक्स करा.
2. आता मिक्सरच्या भांड्यात किसलेले खोबरे, मिरची घालून त्याचे वाटण तयार करा. तयार इडली बाऊलमध्ये वाटलेले मिश्रण घाला. वरुन कोथिंबीर, चिमूटभर मीठ आणि चमचाभर पाणी घालून पुन्हा एकजीव करा.
3. त्यानंतर केळीच्या पानाला व्यवस्थित फोल्ड करुन घ्या. त्यात तेल किंवा तुपाने ग्रीस करा. तयार इडलीचे बॅटर घाला. इडली पात्रात किंवा स्टीमरमध्ये १० मिनिटे वाफ काढून घ्या. तयार होईल गरमागरम काकडी इडली. लाल चटणीसोबत आवडीने खा.
