उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली की घरात एकच गलका सुरु होतो, आज काही तरी वेगळं...(Chickpea flour recipes) बाहेरुन काही मागवा किंवा हॉटेलमध्ये जाऊन खाऊया असा हट्ट मुले करतात.(Gluten-free baking at home) पण सतत बाहेरचे खाल्ल्यामुळे पोटाला त्रास होतो. तसेच पैसे अधिक खर्च होतात. हल्ली पिझ्झा, बर्गर, फ्राइजसारख्या गोष्टी मुलांना खायला अधिक आवडतात. (Gluten-free chickpea burger bun)बर्गर हा हल्ली घरात सगळ्यांना आवडतो. बाजारात मिळणारा बर्गर पाव हा मैदाच्या असतो.(Chickpea bun recipe) त्यामुळे आपल्या आरोग्याला नुकसान होऊ शकते. जर हेल्दी आणि पौष्टिक पदार्थाचा बर्गर बन बनवायचा असेल तर काबुली चण्याचे बर्गर बन नक्की ट्राय करुन पाहा.(Protein-rich snack ideas) ग्लुटन फ्री असल्यामुळे आरोग्यासाठी उत्तम आहे. तसेच मुलांना देखील खायला आवडेल. (Easy gluten-free recipes)
साहित्य भिजवलेले काबुली चणे - १ कपइसबगोल - ३ चमचे ऑलिव्ह ऑइल - १ चमचा पिझ्झा मसाला - १ चमचा मीठ - चवीनुसार व्हिनेगर - १ चमचा बेकिंग सोडा - १ चमचा पाणी - १/२ कप भोपळ्याच्या बिया, तीळ, अळशी - आवडीनुसार
कृती
1. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले काबुली चणे, इसबगोल, तेल, मीठ, पिझ्झा मसाला, व्हिनेगर आणि पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
2. तयार मिश्रणाची जाडसर पेस्ट झाल्यानंतर १० मिनिटे तसेच ठेवा. आता तयार कणकेला बनचा आकार द्या.
3. बन ला टॉपिंगसाठी भोपळ्याच्या बिया, तीळ, अळशी आवडत असल्यास लावा.
4. आता ओव्हनमध्ये हे बन्स १८० अंश सेल्सिअस तापमानावर ३५ ते ४० मिनिटे बेक करुन घ्या.
5. बर्नला मध्यभागी स्लाइड कट करुन त्यात हिरवी चटणी, कोबीची पाने, टोमॅटो आणि आलू टिक्की, कांदा , चीज आणि मसाले घालून बंद करा. तयार होईल पौष्टिक - चमचमीत बर्गर बन.