जेवल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना गोड खाण्याची इच्छा होते. आईस्क्रिम किंवा गोडाचे पदार्थ बनवताना अनेकदा कंडेंस्ड मिल्कचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.(homemade condensed milk) याच्या चवीमुळे पदार्थ आणखी चविष्ट होतो. बाजारात आपल्याला कंडेंस्ड मिल्कचे कॅन पाहायला मिळतात.(simple condensed milk recipe) पण विकतचे आणलेले कंडेंस्ड मिल्क हे बऱ्याच दिवसांचे असते. त्यामुळे आरोग्याला हानिकारक ठरु शकते. (easy milk recipes for desserts)
कंडेंस्ड मिल्क हा गोड- जाडसर दूधाचा प्रकार आहे. ज्यामध्ये साखर आणि मिसळून तयार केला जातो.(how to thicken milk for desserts) यामध्ये जास्त साखर असल्यामुळे त्याची शेल्फ लाइफ बराच काळ टिकते. त्यामुळे ते सहज साठवता येते.(quick sweetened condensed milk recipe) कंडेंस्ड मिल्कचा जास्त वापर हा बर्फी, रबडी, खीर किंवा गोडाचे पदार्थ बनवताना केला जातो. याचा वापर करुन आपण पदार्थ सहज बनवू शकतो. बाहेरुन विकत आणण्यापेक्षा घरीच कंडेंस्ड मिल्क कसे बनवायचे पाहूया.(how to substitute condensed milk at home)
विदर्भातील पारंपरिक पदार्थ 'ताक- भाकरी', सकाळच्या नाश्त्यात करा, पोटाला थंडावा देणारी पौष्टिक रेसिपी
साहित्य
साखर - १ कप
मिल्क पावडर - २ चमचे
बटर - २ क्यूब
पाणी
कृती
1. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात साखर घेऊन बारीक वाटून घ्या.
2. आता वाटलेल्या साखरमध्ये मिल्क पावडर, बटर आणि पाणी घालून पुन्हा एकदा वाटून त्याची जाडसर पेस्ट तयार करा.
3. मिश्रण अधिक घट्ट झाले असेल तर त्यात पुन्हा थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
4. एका कंटेनरमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवा. कंडेंस्ड मिल्कचा वापर आपण गोडाचे पदार्थ बनवण्यासाठी सहज करु शकतो.