Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > बिनाखोबऱ्याची साऊथ इंडियन चटणी, इडली-डोशासोबत लागते मस्त! ना नारळ फोडण्याची झंझट-ना खोबरं खवण्याची घाई

बिनाखोबऱ्याची साऊथ इंडियन चटणी, इडली-डोशासोबत लागते मस्त! ना नारळ फोडण्याची झंझट-ना खोबरं खवण्याची घाई

South Indian chutney: Idli chutney recipe: Dosa chutney recipe: कांदा-टोमॅटोपासून केलेली ही चटणी चवीला अगदी मस्त लागते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2026 11:49 IST2026-02-27T09:30:00+5:302026-03-02T11:49:44+5:30

South Indian chutney: Idli chutney recipe: Dosa chutney recipe: कांदा-टोमॅटोपासून केलेली ही चटणी चवीला अगदी मस्त लागते.

How to make chutney without coconut South Indian chutney recipe without coconut Easy idli chutney without grating coconut Quick dosa chutney recipe at home Instant chutney for breakfast | बिनाखोबऱ्याची साऊथ इंडियन चटणी, इडली-डोशासोबत लागते मस्त! ना नारळ फोडण्याची झंझट-ना खोबरं खवण्याची घाई

बिनाखोबऱ्याची साऊथ इंडियन चटणी, इडली-डोशासोबत लागते मस्त! ना नारळ फोडण्याची झंझट-ना खोबरं खवण्याची घाई

सकाळच्या नाश्त्यात गरमागरम इडली, कुरकुरीत डोसा किंवा अप्पम असतील तर घरामध्ये आवडीने खाल्ले जाते. पण या साऊथ इंडियन पदार्थांची चव वाढवते ती म्हणजे त्यासोबत असणारी चटणी. आपण अनेकदा ही चटणी नारळापासून करतो.(South Indian chutney)  पण अनेकदा सकाळी ऐन घाईच्या वेळी घरामध्ये नारळ उपलब्ध नसतो, किंवा नारळ फोडून तो खवणे हे अतिशय वेळखाऊ आणि कष्टाचे काम वाटते. अशावेळी आयत्या वेळी चटणी कशी करायची? हा मोठा प्रश्न गृहिणींसमोर उभा राहतो. जर आपल्यालाही नारळाशिवाय चटणी करायची असेल तर या पद्धतीने चटणी बनवा. (Idli chutney recipe)
दाक्षिणात्य घरांमध्ये आणि प्रसिद्ध हॉटेलमध्ये नारळाला एक अतिशय चविष्ट पर्याय दिला जातो, तो म्हणजे 'कांदा-टोमॅटोची लाल चटणी. ही चटणी बनवण्यासाठी नारळ लागत नाही.(Dosa chutney recipe)  पण कांदा-टोमॅटोपासून केलेली ही चटणी चवीला अगदी मस्त लागते. ही चटणी तयार करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि ती फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस आरामात टिकते. या चटणीसाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

होली है..! यंदा खेळा ऑरगॅनिक होळी, वाटीभर बिटाचा असा करा नॅचरल गुलाबी रंग-५ मिनिटांचं सोपं काम

साहित्य 

तेल - २ चमचे 
शेंगदाणे - १ छोटी वाटी 
चण्याची डाळ - १ छोटी वाटी 
लसूण पाकळ्या - ७ ते ८ 
उभा चिरलेला कांदा - १ 
चिरलेला टोमॅटो - १
लाल मिरच्या - २ ते ३
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
मीठ - चवीनुसार 
चिंचेचा कोळ - १ छोटी वाटी 
गूळ - छोटा तुकडा 
लाल मिरची पावडर - १ चमचा
पाणी - आवश्यकतेनुसार 
मोहरी - १ चमचा 
कढीपत्ता - ५ ते ६ पाने


कृती 

1. सगळ्यात आधी गॅसवर पॅन ठेवून त्यात तेल गरम करुन घ्या. त्यात शेंगदाणे, चण्याची डाळ परतवून घ्या. नंतर लसूण, कांदा, टोमॅटो, लाल मिरच्या आणि कोथिंबीर घालून चांगले परतवून घ्या. मिश्रण थंड होऊ द्या

2. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले सर्व साहित्य, मीठ, चिंचेचा कोळ, गूळ, लाल मिरची पावडर आणि पाणी घालून त्याची बारीक पेस्ट तयार करा. 

3. फोडणीसाठी फोडणी पात्रात तेल, मोहरी, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घाला. चटणीला वरुन फोडणी द्या. इडली किंवा डोशासोबत खा गरमागरम कांदा-टोमॅटो चटणी. 


Web Title : बिना नारियल के साउथ इंडियन चटनी: झटपट, आसान और स्वादिष्ट!

Web Summary : इस आसान रेसिपी से बिना नारियल के साउथ इंडियन चटनी बनाएं। यह प्याज-टमाटर की चटनी एक स्वादिष्ट विकल्प है, जो इडली और डोसा के साथ एकदम सही है। यह जल्दी से तैयार हो जाती है और दिनों तक चलती है।

Web Title : Coconut-free South Indian chutney recipe: Quick, easy, and delicious!

Web Summary : Make South Indian chutney without coconut using this simple recipe. This onion-tomato chutney is a flavorful alternative, perfect with idli and dosa. It's quick to prepare and lasts for days.