Join us
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत करा ओव्याच्या पानांची कढी, पारंपरिक सोपी रेसिपी! मुलाचं पोट दुखणं आणि खोकलाही होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2026 09:30 IST

Ajwain leaf kadhi: Ajwain leaves benefits: Home remedy for cough and cold: ओव्याच्या पानांची कढी कशी बनवायची पाहूया.

भारतीय जेवणात कढीचे स्थान अढळ आहे. गरमागरम भात आणि त्यावर कढी. कढीचे देखील अनेक प्रकार आहेत. दह्याची कढी, पंजाबी कढी, सोलकढी, गुजराती कढी.(Ajwain leaf kadhi) पण आपण कधी ओव्याच्या पानांची कढी चाखून पाहिली आहे का? चाखून पाहिली आहे का? ओव्याची पाने केवळ दिसायला सुंदर नसून ती आरोग्याचा खजिना आहेत.(Ajwain leaves benefits) विशेषतः थंडीच्या दिवसात पोटाचे आरोग्य जपण्यासाठी आणि जिभेची चव वाढवण्यासाठी ओव्याच्या पानांची कढी हा एक चांगला पर्याय आहे. (Home remedy for cough and cold)थंडीचा ऋतू सुरू झाला की घराघरांत सर्दी, खोकला, घसा दुखणं, पोट बिघडणं असे त्रास हमखास दिसू लागतात. लहान मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांनाच या समस्यांना सामोरं जावं लागतं. अशा वेळी औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी आपल्या स्वयंपाकघरातच असलेला एक प्रभावी देसी उपाय उपयोगी पडतो, ओव्याच्या पानांची कढी. या कढीसाठी लागणारे साहित्य पाहूया. 

पुलाव किंवा भातात पाणी जास्त झालंय? ४ सिक्रेट ट्रिक, भात होईल मऊ-मोकळा आणि हॉटेलसारखा सुटसुटीत

साहित्य 

ताजे खवलेले खोबरे- १ कप ओव्याची ताजी पाने- ३/४ कपकोकम - १०-१२साखर - १/२ छोटा चमचालसूण पाकळ्या- ३-४ हिरवी मिरची- २साजूक तूप- १ छोटा चमचाजिरे- १/४ छोटा चमचाकोमट पाणी - १.५ कप गरम पाणी - ३-४ मोठे चमचे मीठ - चवीनुसारबारीक चिरलेली ताजी कोथिंबीर

कृती 

1. सगळ्यात आधी ओव्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कोकम एका वाटीत घेऊन त्यात गरम पाणी घालून भिजत ठेवा. 

2. यानंतर एका भांड्यात तूप गरम करुन त्यात जिरे घाला. ओव्याची पाने चांगले परतून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात ओल्या नारळाचा किस, लसूण, परतलेल्या ओव्याची पाने, हिरवी मिरची, मीठ, साखर, भिजवलेल्या कोकमचे पाणी आणि गरम पाणी घालून वाटून घ्या. 

3. आता वाटलेले मिश्रण गाळणीमध्ये गाळून घ्या. ज्यामुळे त्याचा रस काढता येईल. वरुन कोथिंबीर घाला. तयार होईल ओव्याच्या पानांची कढी. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajwain Leaf Kadhi: A Traditional Recipe for Cold, Cough Relief

Web Summary : Ajwain leaf kadhi, a flavorful and healthful dish, is perfect for winter. This traditional recipe helps to improve digestion, boost immunity, and relieve coughs and colds. It's a simple home remedy using readily available ingredients.
टॅग्स :अन्नपाककृतीहिवाळ्यातला आहार