Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > थंडीत करा ओव्याच्या पानांची कढी, पारंपरिक सोपी रेसिपी! मुलाचं पोट दुखणं आणि खोकलाही होईल कमी

थंडीत करा ओव्याच्या पानांची कढी, पारंपरिक सोपी रेसिपी! मुलाचं पोट दुखणं आणि खोकलाही होईल कमी

Ajwain leaf kadhi: Ajwain leaves benefits: Home remedy for cough and cold: ओव्याच्या पानांची कढी कशी बनवायची पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2026 09:30 IST2026-01-19T09:30:00+5:302026-01-19T09:30:03+5:30

Ajwain leaf kadhi: Ajwain leaves benefits: Home remedy for cough and cold: ओव्याच्या पानांची कढी कशी बनवायची पाहूया.

How to make ajwain leaf Ajwain leaves kadhi benefits for children Natural remedy for child stomach pain and cough Best winter kadha for kids immunity Traditional ajwain leaf kadhi recipe in winter | थंडीत करा ओव्याच्या पानांची कढी, पारंपरिक सोपी रेसिपी! मुलाचं पोट दुखणं आणि खोकलाही होईल कमी

थंडीत करा ओव्याच्या पानांची कढी, पारंपरिक सोपी रेसिपी! मुलाचं पोट दुखणं आणि खोकलाही होईल कमी

भारतीय जेवणात कढीचे स्थान अढळ आहे. गरमागरम भात आणि त्यावर कढी. कढीचे देखील अनेक प्रकार आहेत. दह्याची कढी, पंजाबी कढी, सोलकढी, गुजराती कढी.(Ajwain leaf kadhi) पण आपण कधी ओव्याच्या पानांची कढी चाखून पाहिली आहे का? चाखून पाहिली आहे का? ओव्याची पाने केवळ दिसायला सुंदर नसून ती आरोग्याचा खजिना आहेत.(Ajwain leaves benefits) विशेषतः थंडीच्या दिवसात पोटाचे आरोग्य जपण्यासाठी आणि जिभेची चव वाढवण्यासाठी ओव्याच्या पानांची कढी हा एक चांगला पर्याय आहे. (Home remedy for cough and cold)
थंडीचा ऋतू सुरू झाला की घराघरांत सर्दी, खोकला, घसा दुखणं, पोट बिघडणं असे त्रास हमखास दिसू लागतात. लहान मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांनाच या समस्यांना सामोरं जावं लागतं. अशा वेळी औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी आपल्या स्वयंपाकघरातच असलेला एक प्रभावी देसी उपाय उपयोगी पडतो, ओव्याच्या पानांची कढी. या कढीसाठी लागणारे साहित्य पाहूया. 

पुलाव किंवा भातात पाणी जास्त झालंय? ४ सिक्रेट ट्रिक, भात होईल मऊ-मोकळा आणि हॉटेलसारखा सुटसुटीत

साहित्य 

ताजे खवलेले खोबरे- १ कप 
ओव्याची ताजी पाने- ३/४ कप
कोकम - १०-१२
साखर - १/२ छोटा चमचा
लसूण पाकळ्या- ३-४ 
हिरवी मिरची- २
साजूक तूप- १ छोटा चमचा
जिरे- १/४ छोटा चमचा
कोमट पाणी - १.५ कप 
गरम पाणी - ३-४ मोठे चमचे 
मीठ - चवीनुसार
बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर

कृती 

1. सगळ्यात आधी ओव्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कोकम एका वाटीत घेऊन त्यात गरम पाणी घालून भिजत ठेवा. 

2. यानंतर एका भांड्यात तूप गरम करुन त्यात जिरे घाला. ओव्याची पाने चांगले परतून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात ओल्या नारळाचा किस, लसूण, परतलेल्या ओव्याची पाने, हिरवी मिरची, मीठ, साखर, भिजवलेल्या कोकमचे पाणी आणि गरम पाणी घालून वाटून घ्या. 

3. आता वाटलेले मिश्रण गाळणीमध्ये गाळून घ्या. ज्यामुळे त्याचा रस काढता येईल. वरुन कोथिंबीर घाला. तयार होईल ओव्याच्या पानांची कढी. 


Web Title : अजवाइन के पत्ते की कढ़ी: सर्दी, खांसी से राहत के लिए पारंपरिक रेसिपी

Web Summary : अजवाइन के पत्ते की कढ़ी, एक स्वादिष्ट और सेहतमंद व्यंजन, सर्दियों के लिए एकदम सही है। यह पारंपरिक रेसिपी पाचन में सुधार, रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाने और खांसी और सर्दी से राहत दिलाने में मदद करती है। यह आसानी से उपलब्ध सामग्री का उपयोग करके बनाया गया एक सरल घरेलू उपाय है।

Web Title : Ajwain Leaf Kadhi: A Traditional Recipe for Cold, Cough Relief

Web Summary : Ajwain leaf kadhi, a flavorful and healthful dish, is perfect for winter. This traditional recipe helps to improve digestion, boost immunity, and relieve coughs and colds. It's a simple home remedy using readily available ingredients.