उन्हाळा आला की अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आपण सगळेच शहाळ्याच पाणी पिणं पसंत करतो. ताजं, गार आणि नॅचरल इलेक्ट्रोलाइट्युक्त शहाळ्याचं पाणी म्हणजे आरोग्यासाठी एकदम बेस्ट पर्याय...मनाला आणि शरीराला गारवा देण्यासाठी 'शहाळ्याचे पाणी' लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोठ्या आवडीने पितात. रस्त्याच्या कडेला शहाळ्याची गाडी दिसली की आपण थांबतोच, पण तिथे गेल्यावर मनात एकच मोठा प्रश्न असतो. या हिरव्यागार दिसणाऱ्या शहाळ्यात पाणी जास्त असले की मलई ? कारण बाहेरून पाहून हे ओळखणं थोडं कठीणच वाटतं(How To Identify Perfect Coconut With More Water Or Malai Easy Tricks).
पण कधी असं होतं का, की शहाळं घेतल्यावर अपेक्षेप्रमाणे पाणी कमी आणि मलई जास्त निघते, किंवा उलटच? मग सगळा मूडच खराब होतो! खरंतर, शहाळं निवडणं ही सुद्धा एक कला आहे. बाहेरून अगदी सारखी दिसणारी दोन शहाळी आतून मात्र पूर्णपणे वेगळी असू शकतात - एका मध्ये भरपूर पाणी, तर दुसऱ्यात घट्ट मलई...अनेकदा आपण विक्रेत्यावर विसंबून राहतो, शहाळे न फोडता त्यात नक्की काय असेल, हे ओळखणे ही सुद्धा एक कला आहे. पण जर तुम्हाला काही (how to know coconut has more water or Malai) छोट्या - छोट्या ट्रिक्स माहित असतील, तर शहाळं न फोडताही आत पाणी जास्त की मलई हे ओळखणं अगदी सोपं होऊ शकतं.
शहाळं न फोडताही आत पाणी जास्त की मलई, कसं ओळखावं ?
१. नारळ हलवून पाहा :- नारळ हलवून पहाणे हा शहाळ्यातील पाण्याचा आणि मलईचा अंदाज घेण्याचा सर्वात अचूक आणि सोपा मार्ग आहे. शहाळे कानाजवळ धरून जोरात हलवा. पाण्याचा खळखळ असा आवाज येत असल्यास शहाळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे आणि त्यामध्ये मलई अजून तयार झालेली नाही किंवा ती अत्यंत पातळ आहे. याउलट, आवाज दबलेला, जड येत असल्यास किंवा जर शहाळे हलवल्यावर पाण्याचा आवाज खूपच कमी येत असेल किंवा आतमध्ये जागा कमी असल्यासारखे वाटत असेल, तर समजावे की त्यामध्ये जाड आणि भरपूर मलई तयार झाली आहे. ज्याप्रमाणे आपण कलिंगड घेताना ते वाजवून पाहतो, तसेच शहाळ्याच्या बाबतीतही करा. आपल्या बोटांनी शहाळ्यावर हळूच टिचकी मारा किंवा टॅप करा. जर आवाज 'पोकळ' येत असेल, तर त्यात पाणी जास्त आहे. जर आवाज 'ठोस' किंवा जड येत असेल, तर समजावे की आत मलईचा थर चांगला जमला आहे.
२. वजन आणि आकार :- जे शहाळ त्याच्या आकाराच्या तुलनेत वजनाला जास्त जड वाटते, त्यामध्ये पाणी जास्त असते. विशेषतः गोल आकाराच्या आणि गडद हिरव्या रंगाच्या शहाळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. मलई तयार होण्याच्या प्रक्रियेत पाण्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागते, त्यामुळे मलईदार शहाळे वजनाला थोडे हलके वाटते. तसेच, जर शहाळ्याचा आकार थोडा अंडाकृती (Oval shape) असेल, तर त्यात जाड मलई असण्याची शक्यता जास्त असते.
पोह्याचं थालीपीठ करा फक्त १० मिनिटांत, आई भूक लागली काहीतरी मस्त कर म्हणणारी मुलंही होतील खुश...
३. बाहेरील सालीचा रंग :- शहाळ्याच्या वरच्या आवरणाच्या रंगावरूनही त्यातील मलई आणि पाण्याचा अचूक अंदाज लावता येतो. जर शहाळ्याची साल एकदम चमकदार आणि गडद हिरवी असेल, तर समजावे की ते शहाळे पाण्याने गच्च भरलेले आहे. अशा शहाळ्यात मलई नसते किंवा ती अगदीच पाणीदार असते. जर शहाळ्याच्या सालीवर हलके तपकिरी रंगाचे डाग दिसू लागले किंवा त्याचा रंग फिकट पिवळसर पडू लागला, तर याचा अर्थ असा की ते शहाळे आता परिपक्व होत आहे. अशा शहाळ्यामध्ये जाड मलई तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते.
४. शहाळ्याचा देठ तपासा :- शहाळ्याच्या वरच्या भागाला जिथे देठ असतो, तिथे नीट लक्ष द्या. जर देठाकडचा भाग वर उचलेला किंवा फुगीर दिसत असेल, तर त्यात मलई असण्याची शक्यता जास्त असते. जर तो भाग सपाट किंवा आत दबलेला असेल, तर त्या शहाळ्यात फक्त पाणी असण्याची शक्यता असते.
डाएट करतानाही बिंधास्त खा पुऱ्या, तमन्न भाटियाचे फिटनेस कोच सांगतात-पुरी खाण्याचं तंत्र...
५. योग्य आकाराची निवड :- अनेकांना वाटते की मोठे शहाळे म्हणजे जास्त पाणी, पण कधीकधी मोठ्या शहाळ्यात फक्त जाड कवच असते. मध्यम आकाराचे शहाळे सहसा जास्त चवदार पाणी आणि मध्यम मलईसाठी उत्तम असते. जर विक्रेत्याने नारळ सोलताना तो सहज सोलला गेला, तर ते शहाळे कोवळे असते आणि त्यात पाणीच जास्त असते. जर सोलण्यासाठी त्याला जास्त ताकद लावावी लागली, तर ते शहाळे जून आणि त्यात जास्त मलई असण्याची शक्यता असते.
