हिवाळा सुरु झाला की बाजारात अनेक फळ पाहायला मिळतात. बाजारात फळं पाहिली की पिवळी, चमकदार पपई लगेच डोळ्यात भरते.(Papaya ripening) पण दिसायला सुंदर असणारी पपई नेहमीच गोड किंवा चांगली असेल असे नाही. सध्या फळं लवकर पिकवण्यासाठी कॅल्शियम काबाईडसारख्या केमिकल्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. (Sweet papaya buying tips) अशा केमिकलने पिकवलेली पपई खाल्ल्याने पोटाचे विकार, डोकेदुखी, उलट्या किंवा अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पपई खरेदी करताना थोडी सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे.(Papaya health tips)
खरं तर हिवाळ्यात पपई खाणे सगळ्यात जास्त चांगले असते. या काळात हिवाळ्यात पचनशक्ती मंदावते, बद्धकोष्ठता, गॅस, अपचनाचा त्रास वाढतो. पपईमध्ये पॅपेन हे नैसर्गिक एन्झाइम असतं, जे अन्न पचायला मदत करतं. रोज कमी प्रमाणात खाल्ल्यास पोट साफ राहते आणि जडपणा कमी होतो. पण पपई विकत घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, जाणून घेऊया.
कर्नाटकातील उड्डपी स्टाईल सांबार करा घरीच, कुकरमध्ये १५ मिनिटांत होईल, चविष्ट सांबारची सोपी रेसिपी
1. सगळ्यात आधी पपईच्या रंगाकडे लक्ष द्या. नैसर्गिकरित्या पिकलेली पपई हलकी पिवळी किंवा केशरी असते. तिचा रंग एकसारखा नसतो. केमिकलने पिकवलेली पपई खूप चमकदार व एकसारखी दिसते. अनेकदा तिच्यावर हिरव्या रंगाचे छोटे ठिपके असतात.
2. नैसर्गिकरित्या पिकवलेली पपई ही हाताने दाबल्यास मऊ लागते. पण फारच पिचलेली नसते. केमिकल पपई बाहेरुन मऊ पण आतून कडक आणि पाणचट असते. कधी कधी दाबल्यावर लगेच फुटते.
3. पपईचा सुगंध देखील महत्त्वाचा असतो. नैसर्गिक पिकवलेल्या पपईला हलका सुगंध असतो. केमिकलने पिकवलेल्या पपईला सहसा वास येत नाही. किंवा विचित्र केमिकलसारखा उग्र वास येतो. फळ कापल्यावर जर सुगंध येत नसेल तर पपई न खाल्ले बरी, अन्यथा विषबाधा होण्याची शक्यता असते.
4. पपईचा देठ नैसर्गिकरित्या पिकल्यावर थोडासा सुकलेला असतो. तर केमिकल असणारा पपईचा देठ हिरवट किंवा ओलसर दिसतो. तसेच नैसर्गिक पपईच्या बिया काळ्या, चमकदार असतात. तर केमिकल असणाऱ्या पपईच्या बिया फिकट किंवा चिकट असतात.
