Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > दिसायला फ्रेश पण चवीला कडू? काकडी खरेदी करताना ४ गोष्टी पाहा; निवडा गोड चवीची काकडी

दिसायला फ्रेश पण चवीला कडू? काकडी खरेदी करताना ४ गोष्टी पाहा; निवडा गोड चवीची काकडी

Fresh vs Bitter cucumber identification: Kitchen tips for fresh vegetables Marathi: काकडी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2026 15:22 IST2026-03-18T15:21:49+5:302026-03-18T15:22:40+5:30

Fresh vs Bitter cucumber identification: Kitchen tips for fresh vegetables Marathi: काकडी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या पाहूया.

How to identify bitter cucumber Kadu kakdi kashi olakhaychi Kakdi kharedi kartana kay pahave How to pick the best cucumber at the grocery store Cucumber selection guide for salad | दिसायला फ्रेश पण चवीला कडू? काकडी खरेदी करताना ४ गोष्टी पाहा; निवडा गोड चवीची काकडी

दिसायला फ्रेश पण चवीला कडू? काकडी खरेदी करताना ४ गोष्टी पाहा; निवडा गोड चवीची काकडी

उन्हाळा सुरु झाला की आपण शरीराला थंडावा देण्यासाठी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण आहारात काकडीचा समावेश करतो. मग ती कोशिंबीर असो, सलाड असो किंवा नुसती कापलेली काकडी. दुपारच्या जेवणाची चव काकडीशिवाय अपूर्णच वाटते. पण अनेकदा आपण बाजारातून अतिशय हिरवीगार आणि ताजी दिसणारी काकडी विकत आणतो. घरी आल्यावर ती कापून खातो.(Fresh vs Bitter cucumber identification) पण तेव्हा ती कडू लागते. ही कडू काकडी आपल्या जिभेची चवच बिघडवत नाही तर कोशिंबीर किंवा सलाड देखील खराब करते. (Kitchen tips for fresh vegetables Marathi)
अनेकदा वातावरणातील बदल किंवा पाण्याचे कमी प्रमाण यामुळे काकडीत कडूपणा वाढतो. वरून चकचकीत दिसणारी प्रत्येक काकडी गोडच असेल असं नाही. पण, काकडी न कापता ती कडू आहे की गोड हे कसं ओळखायचं? खरेदी करताना आपण काही गोष्टी तपासल्या तर आपली फसवणूक होणार नाही. काकडी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या पाहूया. (Tips to buy sweet cucumbers)

नवऱ्यावर प्रेम म्हणून तुम्हीही ‘या’ ५ गोष्टी करता का? कायम दु:खी राहाल आणि नातंही होईल कमजोर

1. काकडी खरेदी करताना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तिचा आकार. खूप जास्त मोठी किंवा जाड काकडी खरेदी करणं टाळा. ज्या काकडीचा आकार मध्यम आहे आणि ती दिसायला फार जाड नाही, ती सहसा गोड असते. जास्त मोठ्या काकड्यांमध्ये बियांचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्या चवीला कडू लागतात. त्यासाठी काकडी विकत घेताना ती नेहमी मध्यम आकाराची आणि दोन्ही टोकांकडून समान जाडीची असायला हवी. 

2. काकडीचा रंग तिच्या चवीबद्दल सांगतो. गडद हिरव्या रंगाची काकडी दिसायला छान असली तरी आतून कडू असते. काकडी खरेदी करताना तिचा नैसर्गिक रंग हवा. जर काकडीवर पिवळसर छटा दिसत असतील तर ती पिकलेली काकडी आहे आणि तिची चव कडवट असू शकते. काकडीवर जास्त डाग नसावेत. गुळगुळीत काकडी ताजी आणि गोड असते. 

3. काकडी हातात घेतल्यानंतर ती तपासून पाहा. जर ती हाताला कडक लागत असेल तर ती ताजी आहे. पण जर ती हाताला मऊ किंवा लवचिक लागत असेल तर ती शिळी झाली असं समजावं. अशा काकड्या अनेकदा कडू निघतात. काकडीच्या टोकाचा भाग (देठाकडील भाग) थोडा दाबून पहा, जर तो भाग जास्त मऊ असेल तर ती काकडी खरेदी करू नका.

4. काकडीचे वरचे टोक कापून त्यावर थोडे मीठ टाका आणि कापलेला काकडीचा भाग काकडीवर गोल गोल फिरवत राहा. जोपर्यंत पांढरा फेस निघत नाही तोपर्यंत घासा. यामुळे कडूपणा निघून जातो. काकडीच्या फोडी करून त्या १०-१५ मिनिटे बर्फाच्या थंड पाण्यात ठेवा. यामुळे कडवटपणा कमी होण्यास मदत होईल. 
 

Web Title : मीठी खीरा का रहस्य: कड़वे स्वाद से बचने के लिए 4 सुझाव

Web Summary : कड़वे खीरे से बचने के लिए, मध्यम आकार के, प्राकृतिक रंग और दृढ़ बनावट वाले खीरे चुनें। कड़वाहट दूर करने के लिए कटे हुए सिरे को नमक से रगड़ें या स्लाइस को बर्फ के पानी में भिगोएँ।

Web Title : Sweet Cucumber Secrets: 4 Tips to Avoid Bitter-Tasting Cucumbers

Web Summary : To avoid bitter cucumbers, choose medium-sized ones with natural coloring, firm texture. Rub cut end with salt to remove bitterness or soak slices in ice water.