lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > दिवाळीसाठी मिठाई घेता, पण त्यात भेसळ तर नाही हे कसे ओळखाल? ३ गोष्टी तपासा..

दिवाळीसाठी मिठाई घेता, पण त्यात भेसळ तर नाही हे कसे ओळखाल? ३ गोष्टी तपासा..

How To Identify Adulteration In Mithai Sweets In Diwali Festivals : भेसळ होण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवून मिठाई घेताना काही गोष्टींची खात्री केलेली बरी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 04:39 PM2022-10-19T16:39:01+5:302022-10-19T16:45:28+5:30

How To Identify Adulteration In Mithai Sweets In Diwali Festivals : भेसळ होण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवून मिठाई घेताना काही गोष्टींची खात्री केलेली बरी..

How To Identify Adulteration In Mithai Sweets In Diwali Festivals : How do you know if you buy sweets for Diwali, but it is not adulterated? Check 3 things.. | दिवाळीसाठी मिठाई घेता, पण त्यात भेसळ तर नाही हे कसे ओळखाल? ३ गोष्टी तपासा..

दिवाळीसाठी मिठाई घेता, पण त्यात भेसळ तर नाही हे कसे ओळखाल? ३ गोष्टी तपासा..

Highlightsमिठाईचा तुकडा जमलं तर तोडून पाहा, म्हणजे शिळ्या मिठाईचा कोरडेपणा कळण्यास मदत होईल. दिवाळीच्या दिवसांत मिठाईसारख्या पदार्थांना जास्त मागणी असल्याने हे पदार्थ खरेदी करताना काळजी घेतलेली केव्हाही चांगली.

दिवाळी जवळ आली,  सगळ्यांच्याच घरात फराळाची लगबग एव्हाना सुरू झाली असेल. याशिवाय बाजारातूनही आपण अनेक प्रकारच्या मिठाया विकत आणतो. मात्र मिठाईत भेसळ तर नाही हे कसं ओळखायचं? त्यासाठी मिठाई खरेदी करताना काही गोष्टींची खात्री अवश्य करुन घ्यायला हवी. नाहीतर आपल्या आरोग्यासाठी ही मिठाई घातक ठरु शकते. एकतर माहितगार दुकानातून मिठाई घ्या आणि त्यासोबतच हाताशी असू द्या, ही चेकलिस्ट (How To Identify Adulteration In Mithai Sweets In Diwali Festivals)..

(Image : Google)
(Image : Google)

१. खाण्याचा रंग की भेसळ?

जास्त रंग असलेल्या मिठाई खरेदी करणे शक्यतो टाळावे. मिठाई खरेदी करताना मिठाई आधी हातावर घेऊन पाहावे. जर मिठाईचा रंग हाताला लागला, तर शक्यतो ती मिठाई घेऊ नये.  मिठाईवर रंग येण्यासाठी मेटानिल येलो आणि टारट्राजाइनचा वापर अधिक केला जातो. हे रंग आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतात. या रंगामुळे किडनी खराब होण्याचा अधिक धोका असतो. तेव्हा शक्यतो रंगबिरंगी मिठाई घेणे टाळलेलेच बरे.

२. खव्यात भेसळ?

मिठाईतील बरेचसे प्रकार साधारणपणे खव्यापासून तयार झालेले असतात. दिवाळीच्या काळात बाजारात मागणी जास्त असल्याने खवा किंवा मेवा यातली भेसळ शोधण्यासाठी घरच्या घरी करता येईल असा एक सोपा उपाय आहे. या पदार्थावर आयोडीनचे दोन थेंब टाकावे. जर हा रंग काळा पडला तर, मेवा भेसळयुक्त आहे असे समजावे.

(Image : Google)
(Image : Google)

३. मिठाई ताजी की शिळी?

मिठाई विकली गेली नाही तर ती दुकानात काही दिवसांसाठी तशीच पडून राहीलेली असू शकते. अशावेळी एकतर वास घ्या. आंबूस वास येत असेल तर मिठाई घेऊ नका.  मिठाईवर बुरशी तर नाही ना खात्री करा.  मिठाईचा तुकडा जमलं तर तोडून पाहा, म्हणजे शिळ्या मिठाईचा कोरडेपणा कळण्यास मदत होईल. 


 

Web Title: How To Identify Adulteration In Mithai Sweets In Diwali Festivals : How do you know if you buy sweets for Diwali, but it is not adulterated? Check 3 things..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.