सणासुदीचे दिवस आता सुरू झाले आहेत. यानिमित्ताने दुकानात विकत मिळणारे पेढे, बर्फी, वेगवेगळ्या मिठाई असे गोडधोड पदार्थ हमखास विकत आणले जातात किंवा ते घेऊन दुसऱ्यांना दिले जातात. आता हेच पाहा ना राखीपौर्णिमेच्या दिवशीही अनेक भावंडं एकमेकांना देण्यासाठी मिठाई घेतातच.. पण ती मिठाई आपल्या भावाला किंवा बहिणीला खाऊ घालून आपण त्यांचा जीव धोक्यात तर घालत नाही ना, हे एकदा तपासून पाहा. कारण या दिवसांत मिठाईची मागणी प्रचंड वाढलेली असते. त्यामुळे या पदार्थांमधली भेसळ खूप जास्त वाढते. असे भेसळयुक्त पदार्थ खाणं आरोग्यासाठी अतिशय त्रासदायक ठरू शकतं (3 tips to identify adulteration in sweets). म्हणूनच आपण घेतलेली मिठाई भेसळयुक्त तर नाही ना, हे एकदा तपासून पाहा..(how to identify adulterated sweets during festive season?)
पेढा, बर्फी यामधली भेसळ कशी ओळखायची?
मिठाई तयार करताना दूध, दही, सुकामेवा अशा पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात भेसळ केली जाते. मिठायांमध्ये केमिकलयुक्त रंग, पाम ऑईल, भेसळयुक्त तूप, दुधाऐवजी डिटर्जंट असे शरीरासाठी हानिकारक असणारे पदार्थ टाकले जातात. त्यामुळे मिठाईची योग्य ती पारख करता यायलाच हवी.
श्रावणी सोमवारी करा साबुदाण्याचे कुरकुरीत खमंग पॉपकॉर्न! तोंडाला येईल चव- उपवास होईल चटकदार
१. कोणतीही मिठाई खरेदी करण्यापुर्वी तिचा रंग कसा आहे ते पाहा. जर हिरवा, गुलाबी, केशरी, लाल असे खूप गडद रंग त्या मिठाईला आलेले असतील तर ती मिठाई घेणं टाळा. नॅचरल हलके रंग असणारी मिठाई घ्या.
२. मिठाईचा एक तुकडा घ्या आणि तो तुकडा ग्लासभर पाण्यात टाका. यानंतर पाणी हलवून घ्या. जर पाण्याला फेस आलेला दिसला तर ती मिठाई भेसळयुक्त आहे हे ओळखावे.
साडी नेसल्यावर पोट जरा जास्तच मोठं दिसतं? १ सोपी ट्रिक- पोट झाकलं जाऊन दिसाल स्लिम
३. मिठाई खरेदी करण्यापुर्वी ती थोडी खाऊन पाहा. जर खाल्ल्यानंतर त्याच्यातलं तेल किंवा तूप तुमच्या टाळूला चिटकून बसत असेल किंवा टाळूला खूप तेलकट लागत असेल ती मिठाई घेणं टाळा. त्यामध्ये पाम ऑईल, व्हेजिटेबल ऑईल किंवा भेसळयुक्त तूप वापरलेले असू शकते.