Join us

वर्षभराचं तिखट करायचं तर उत्तम मिरची कशी निवडाल? मिरची निवडताना चुकवू नका 5 गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 13:15 IST

How To Select Mirchi: बाजारात मिळणारं तिखट भेसळीचंही असू शकतं. त्यामुळे आता बरेच जण मिरची आणून घरीच तिखट करतात. त्यासाठीच मिरची निवडताना ती कशी निवडावी, याविषयीची माहिती..

ठळक मुद्देबाजारात मिरची खरेदीसाठी जाणार असाल, तर नेमकी कोणती मिरची घ्यावी, मिरचीची निवड कशी करावी याविषयीची ही माहिती...

उन्हाळा संपत आला की घरोघरी वर्षभराचं तिखट, वर्षभराचा काळा मसाला, गोडा मसाला आणि लाेणचं असं सगळं करून ठेवण्याची एकच लगबग सुरु होते. आजकाल हे सगळं विकत मिळतं. पण हल्ली प्रत्येक पदार्थामध्ये भेसळीचं प्रमाण एवढं वाढलं आहे की आपल्या घरी येणारं कोणतंही सामान कितपत शुद्ध असेल, याविषयी शंकाच असते. त्यामुळे थोडी मेहनत करावी लागली तरी चालेल, पण वर्षभराचं तिखट घरीच करण्याचा अनेकींचा प्रयत्न असतो. म्हणूनच जर बाजारात मिरची खरेदीसाठी जाणार असाल, तर नेमकी कोणती मिरची घ्यावी, मिरचीची निवड कशी करावी याविषयीची ही माहिती...(How To Select Mirchi for making mirchi powder)

 

मिरची खरेदी करताना..(red mirchi)१. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या मिळतात. त्यापैकी काही मिरच्या खूप तिखट असतात, काही मध्यम तर काही अगदीच फिक्या, पण त्यामुळे तिखटाला रंग मात्र छान येतो.२. मिरची खरेदी करताना सगळ्याच मिरच्या खूप तिखट असणाऱ्या घेऊ नका. १ किलो खूप तिखट मिरची घेणार असाल तर अर्धा किलो कमी किंवा मध्यम तिखट मिरची घ्या. यामुळे तिखटपणाचा समतोल राखला जातो. ३. कोणती मिरची तिखट आणि कोणती मिरची कमी तिखट हे न खाताच ओळखण्याची एक पद्धत म्हणजे ज्या मिरच्या कमी लांबीच्या असतात त्या तिखट असतात. तर ज्या अखूड असतात त्या कमी तिखट असतात.

४. मिरची निवडताना त्यात ओलसरपणा आहे की नाही, हे सगळ्यात आधी तपासून पहा. मिरचीमध्ये थोडा जरी ओलावा असेल, तरी अशी मिरची वर्षभराचे तिखट करण्यासाठी घेऊ नये.५. मिरचीचा कोरडेपणा तपासण्यासाठी कोणत्याही ४- ५ मिरच्या घ्या आणि त्या मधोमध हातानेच तोडून पहा. मिरची झटकन तुटली आणि तिच्यातून बिया लगेचच अगदी सहज बाहेर आल्या, तर ती मिरची बिधास्तपणे खरेदी करावी.६. ज्या मिरच्यांची देठे पुर्णपणे वाळलेली असतात, अशी मिरची लोणच्यासाठी घ्यावी. 

 

या गोष्टीही लक्षात ठेवा...१. बेडकी जातवान, बेडगी रायचूर, बेडकी हवेरी, बेडकी बेलारी, संकेश्वरी, ब्याडगी, गुंटूर, काश्मिरी या तिखट बनविण्यासाठी काही प्रसिद्ध मिरच्या आहेत.२. त्यापैकी ब्याडगी , बेडकी मिरचीचे प्रकार आणि गुुंटूर मिरची या २ मिरच्या तिखट तयार करण्यासाठी सर्वाधिक वापरल्या जातात. तसेच त्यांचा तिखटपणा आणि रंगही उत्तम असतो.३. काश्मिरी लाल मिरची ही बहुतांश वेळ फक्त तिखटाला लालबुंद रंग आणण्यासाठी वापरली जाते. लालभडक रंग असला तरी तिचा तिखटपणा अतिशय कमी असतो. 

 

टॅग्स :अन्नसमर स्पेशलखरेदी