lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > ओल्या हळदीचा सोनसळी मौसम; हिवाळ्यात आहारात हवीच ओली हळद! करा भाजी, लोणचं आणि चहाही

ओल्या हळदीचा सोनसळी मौसम; हिवाळ्यात आहारात हवीच ओली हळद! करा भाजी, लोणचं आणि चहाही

How To Make Tasty And Healthy Raw Turmeric Recipes : ओली हळद ही आपल्या नेहमीच्या हळद पावडरपेक्षाही गुणकारी असते. म्हणून हिवाळ्यात तिचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात समावेश करुन आरोग्यास फायदा करुन घ्यायला हवा. ओल्या हळदीची भाजी, लोणचं हे पदार्थ चविष्ट तर लागतातच शिवाय सुदृढ आरोग्यासाठी आवश्यकही असतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 03:32 PM2021-12-07T15:32:21+5:302021-12-07T15:46:18+5:30

How To Make Tasty And Healthy Raw Turmeric Recipes : ओली हळद ही आपल्या नेहमीच्या हळद पावडरपेक्षाही गुणकारी असते. म्हणून हिवाळ्यात तिचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात समावेश करुन आरोग्यास फायदा करुन घ्यायला हवा. ओल्या हळदीची भाजी, लोणचं हे पदार्थ चविष्ट तर लागतातच शिवाय सुदृढ आरोग्यासाठी आवश्यकही असतात.

How To Make Tasty And Healthy Raw Turmeric Recipes : Raw turmeric is a must in winter diet! Make vegetables, pickles and even tea | ओल्या हळदीचा सोनसळी मौसम; हिवाळ्यात आहारात हवीच ओली हळद! करा भाजी, लोणचं आणि चहाही

ओल्या हळदीचा सोनसळी मौसम; हिवाळ्यात आहारात हवीच ओली हळद! करा भाजी, लोणचं आणि चहाही

Highlightsओल्या हळदीनं रोगप्रतिकारशक्ती वाढते.कोलेस्टेरॉलची पातळी कमी होवून हदयरोगाचा धोका कमी होतो. त्वचेला सौंदर्य आणि शरीराला सुडौलता येण्यासाठी ओली हळद हिवाळ्यात खाणं महत्त्वाचीच.

 थंडीत भाजीबाजार वेगवेगळ्या भाज्यांनी फुललेला असतो. आपण जेव्हा आलं मिरची घेण्यासाठी जातो तेव्हा तिथे आल्याच्या शेजारी आल्यासारखीच दिसणारी ओली हळद आपलं लक्ष वेधून घेते. ओली हळद घेऊन काय करायचं, ओल्या हळदीनं काय होतं हेच अनेकींना माहित नसतं. घरातील जेष्ठ व्यक्ती मात्र कोणी बाजारात जात असेल तर हिवाळ्याच्या दिवसात ओली हळद आणायलाच लावतात. हिवाळ्यातील लोणच्यांपैकी हळदीचं लोणचं बर्‍याच घरात घातलं जातं. किमान लोणच्याच्या निमित्तानं का होईना ओली हळद पोटात गेली पाहिजे असा या जेष्ठ व्यक्तींचा आग्रह असतो. ओली हळद ही आपल्या नेहमीच्या हळद पावडरपेक्षाही गुणकारी असते. म्हणून हिवाळ्यात तिचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात समावेश करुन आरोग्यास फायदा करुन घ्यायला हवा ही धडपड ‘ओली हळद आठवणीने आण हो ’ असं आवर्जून सांगण्यामागे असते.

Image: Google

ओल्या हळदीचा रंग हळदीच्या पावडरपेक्षा जास्त गडद असतो. ही ओली हळद दुधात उकळ्वून, तांदळाच्या पदार्थात, लोणच्यात, ओलसर चटणीत आणि सूपमधे मिसळून सेवन करता येते. तसेच ओल्या हळदीचा गुणकारी चहा आणि राजस्थानी प्रकारची चविष्ट भाजीही करता येते.

Image: Google

ओली हळद खाणं का असते महत्त्वाची?

1. ओल्या हळदीचा सर्वात मोठा गुण म्हणजे यातील गुणधम कर्करोगाशी लढण्याचं काम करतात. ओल्या हळ्दीत करक्यूमिनोइडस आणि वोलाटइल हे तेल कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखतं तसेच त्यांना नष्टही करतं. ओल्या हळदीतील घटक रेडिएशनच्या संपर्कात आल्याने होणार्‍या ट्यूमरपासून संरक्षण करतात.
2. ओल्या हळदीमधे सूज रोखण्याचा गुणधर्म आहे. याचा वापर संधिवाताच्या त्रासात फायदेशीर आहे. तसेच शरीरातील नैसर्गिक पेशींना हानी पोहोवणार्‍या मूक्त मुलकांचा अर्थात फ्री रॅडिकल्सचा नायनाट ओल्या हळदीतील घटक करतात.
3. ओली हळद इन्शुलिनची पातळी संतुलित ठेवते. इन्शुलिन व्यतिरिक्त ओली हळद ग्लूकोजचं प्रमाणही नियंत्रित करते.
4. हळदीमधे लिपोपायलिसॅराइड नावाचा घटक असतो. हा घटक शरीरातील रोगप्रितकारशक्ती वाढवतो. तसेच शरीरास घातक अशा जिवाणुंचा प्रतिबंध ओली हळद करते. ओली हळद ही शरीराचं बुरशीजन्य आजारांपासून संरक्षण करते.
5. ओल्या हळदीचा हिवाळ्यात नियमित वापर केल्याने कोलेस्टेरॉलची सिरमची पातळी नियंत्रणात राहून हदयरोगाचा धोका कमी होतो.
6. ओल्या हळदीत जीवाणूविरोधी आणि अँण्टिसेप्टिक गुणधर्म असतात. ओल्या हळदीमुळे शरीराला संसर्गाशी लढण्याचं बळ मिळतं. तसेच सोरायसिस सारख्या त्वचेशी निगडित गंभीर आजारांपासून बचाव करण्याची, ते बरे करण्याची ताकदही ओल्या हळदीतून मिळते.

Image: Google

7.ओल्या हळदीचा वापर त्वचेवर केल्यास त्वचा चमकदार आणि निरोगी होते. ओल्या हळदीचं उटणं शरीराला लावल्यास त्वचाविकार बरे होतात.
8. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच , वजन संतुलित ठेवण्यासाठी ओल्या हळदीचा चहा परिणामकारक ठरतो.
9. ओल्या हळदीचं सेवन केल्यानं लिव्हरचं काम सुधारतं हे विविध अभ्यास आणि संशोधनांनी सिध्द केलं आहे.
10. हळद ही गुणकारी असली तरी ज्यांना हळदीची अँलर्जी आहे त्यांना पोटात वेदना होणं किंवा अतिसारासारखी लक्षणं दिसतात. तसेच गरोदर महिलांनीही ओल्या हळदीचं सेवन करण्याआधी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image: Google

ओल्या हळदीचं लोणचं

ओल्या हळदीचं लोणचं जेवणाची लज्जत तर वाढवतंच शिवाय ते पौष्टिकही असतं. हे लोणचं म्हणजे महाराष्ट्रातील विंटर स्पेशल रेसीपी आहे.
ओल्या हळदीचं लोणचं तयार करण्यासाठी 1 कप मोहरीचं तेल, पाव किलो ओली हळद ( किसलेली) 1 मोठा चमचा आलं ( किसलेलं, 1 कप बारीक तुकडे केलेल्या हिरव्या मिरच्या, पाव कप मोहरीची पावडर (लोणच्याच्या मोहरी डाळीची पावडर), चार मोठे चमचे किंवा चवीनुसार मीठ आणि पाव कप लिंबाचा रस घ्यावा.

ओल्या हळदीचं लोणचं करताना एका जाड बुडाच्या भांड्यात मोहरीचं तेल गरम करुन घ्यावं. मग ते बाजूला ठेवून गार होवू द्यावं. एका मोठ्या भांड्यात किसलेली ओली हळद, हिरव्या मिरचीचे तुकडे, आलं, मोहरीची पावडर आणि मीठ घालून ते छान एकत्र करुन घ्यावं.नंतर या मिर्शणात गरम करुन गार केलेलं मोहरीचं तेल घालावं. तेल घालून लोणचं चांगलं हलवून घ्यावं. थोड्या वेळानं स्वच्छ काचेच्या बरणीत किंवा मोठ्या बाटलीत भरुन ठेवावं. बाटलीमधील लोणचं तीन चार दिवस रोज हलवावं आणि नीट झाकण लावून ठेवावं. अशा प्रकारचं हळदीचं लोणचं पुढच्या सहा ते सात महिने तरी टिकतं.

Image: Google

ओल्या हळदीची भाजी

ओल्या हळदीची राजस्थानी भाजी ही थंडीतल्या हवेला साजेशी अशी असते. त्यामुळे ती थंडीत खावीच असं आहारतज्ज्ञही सांगतात. ही भाजी खोबा रोटीसोबत एकदम छान लागते. खोबा रोटी म्हणजे मोठी आणि जाड पोळी. ती बनवण्याचीही विशिष्ट पध्दत आहे.

ओल्या हळदीच्या भाजीसाठी 200 ग्रॅम साजूक तूप, 1 चमचा जिरे, 1 तमालपत्र, 4 लवंगा, 4 छोट्या वेलची, 1 दालचिनी तुकडा, 1 मोठी काळी वेलची, 5-6 मिरे, पाव किलो ओली हळद, पाव किलो हिरवे मटार, 200 ग्रॅम घट्ट दही , भरपूर लसणाची पेस्ट, 2 टमाटे बारीक चिरलेले, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 2 चमचे लाल तिखट, 3 चमचे धने पावडर, दिड चमचा चवीनुसार मीठ घ्यावं.

ओल्या हळदीची भाजी करताना कढईत तूप गरम करावं. त्यात सगळे अख्खे मसाले आणि जिरे घालून ते परतावेत आलं लसणाची पेस्ट घालून ती परतून घ्यावी.,अग टमाटा घालून तो मऊसर होईपर्यंत परतून घ्यावा. टमाटा मऊ झाला की किसलेली ओली हळद घालावी आणि हळद शिजेपर्यंत हलवत राहावी. हळद खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर हिरवे मटार घालून ते नीट शिजवून घ्यावेत. मटार शिजले की त्यात तिखट, धने पावडर आणि मीठ घालावं. दही घालून भाजी हलवून घ्यावी. भाजीला तूप सूटेपर्यंत ती शिजू द्यावी. अशी ही चविष्ट ओल्या हळदीची भाजी खाण्यासाठी साधी चपाती किंवा फुलका नकोच त्याला खोबा रोटीच हवी.

Image: Google

खोबा रोटी तयार करण्यासाठी..

1 कप गव्हाची जाडसर कणिक घ्यावी. ( डाळ बाटी करण्यासाठी लागतं तसं रवाळ पीठ) , 1 चमचा तेल, चिमूटभर मीठ आणि 3 चमचे तूप घ्यावं.

खोबा रोटी तयार करतान  आधी कणकेत तेलाचं मोहन घालून कणिक मळून घेऊन ती 5-10 मिनिटं मुरु द्यावी. नंतर जाडसर पोळी लाटून तिला बोटांनी चिमटे घेत नक्षी बनवावी. नक्षीची बाजू वर येईल अश पध्दतीने पोळी तव्यावर टाकून मंद आचेवर भाजून घ्यावी. खालचा भाग भाजला गेला की अलगद उलटून दुसर्‍या बाजूनं थोडं तूप सोडून पोळी खरपूस भाजून घ्यावी. ओल्या हळदीची भाजी या खमंग खोबा रोटीसोबत छान लागते.

Image: Google

ओल्या हळदीचा चहा

ओल्या हळदीचा चहा हा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतो.
ओल्या हळदीचा चहा करण्यासाठी अर्धा कप पाणी, पाव चमचा मिरे पूड आणि अर्धा इंच ओली हळद घ्यावी.
ओली हळद किसून घ्यावी. पाणी पातेल्यात घालून ते उकळायला ठेवावं. नंतर त्यात किसलेली हळद आणि मिरेपूड घालून पाणी चांगलं उकळू द्यावं. पाणी उकळल्यावर कपामधे गाळून घ्यावं. हा चहा कोमट प्यावा.

Image: Google

ओल्या हळदीचा चहा आणखी एका पध्दतीने करता येतो. त्यासाठी एक इंच ओली हळद किसून घ्यावी. त्याच्या निम्मं आलं किसून घ्यावं. 1 कप पाणी उकळायला ठेवावं. त्यात ओल्या हळदीचा आणि आल्याचा किस घालावा. हा चहा नीट उकळू द्यावा. थोडी वाफ गेली की मग कोमटसर प्यावा.

Web Title: How To Make Tasty And Healthy Raw Turmeric Recipes : Raw turmeric is a must in winter diet! Make vegetables, pickles and even tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.