भारतीय जेवणात मुख्य पदार्थांसोबत तोंडी लावायला म्हणून अनेक पदार्थ ताटात असतात. खरंतर हे तोंडी लावायचे पदार्थच आपल्या मुख्य जेवणाची चव वाढवण्याचे काम करतात. भारतीय जेवणात तोंडी लावायला म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, कोशिंबीर, भरलेली मिरची, लोणचं, पापड, कुरडया, सांडगे असे अनेक पदार्थ असतात. तोंडी लावायला म्हणून घेतलेल्या या पदार्थांशिवाय आपले जेवणच पूर्ण होऊ शकत नाही. रोजच्या जेवणाची रंगत अजूनच वाढवण्यासाठी आपण काही पदार्थ आवर्जून ताटात वाढून घेतो.
लोणचे लगेच खराब होऊ नये म्हणून काही टिप्स :-
१. कच्चा आंबा निवडणे :- जर आपल्याला लोणचे जास्त काळ ताजे ठेवायचे असेल तर प्रथम आपल्याला योग्य कच्चा आंबा निवडावा लागेल. आंबा कच्चा आणि कडक असणे खूप महत्वाचे आहे. थोडासा पिकलेला आंबाही तुमच्या लोणच्याची चव खराब करू शकतो. म्हणूनच आंबा खरेदी करताना तो कच्चा आहे हे तपासूनच मग आंबा खरेदी करावा.
२. कंटेनर निवडणे :- आंब्याचे लोणचे बनवल्यानंतर ते स्टोअर करून ठेवण्यासाठी चिनीमातीचे भांडे सर्वात योग्य मानले जाते. जर तुम्हाला चिनीमातीच्या भांड्यात लोणचे ठेवायचे नसेल तर तुम्ही ते काचेच्या भांड्यात किंवा डब्यात ठेवू शकता. लोणचे प्लॅस्टिकच्या डब्यात कधीही ठेवू नये, कारण त्यामुळे लोणचे खराब होण्याचा धोका असतो.
शिळा भात खायचा नाही, फोडणीच्या भाताचा कंटाळा आला? करा खमंग झटपट ‘भात वडा’!-चवीला जबरदस्त...
३. भांड्यांची स्वच्छता :- आंब्याचे लोणचे बरणीत भरण्यापूर्वी ते स्वच्छ असल्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याचे कारण असे की जर बरणी स्वच्छ नसेल तर त्यामध्ये बुरशी वाढण्याचा धोका असतो, ज्यामुळे लोणचे खराब होऊ शकते. यासाठीच बरणीत लोणचे ठेवण्यापूर्वी बरणी गरम पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे, जेणेकरून ते स्वच्छ होईल.
रोजचं वरण होईल आता एकदम चविष्ट, घरीच करा खास पारंपरिक आमटी मसाला...
४. चांगल्या तेलाचा वापर :- तुमचे लोणचे जास्त काळ टिकून राहावे असे वाटत असेल तर त्यात तेलाचा मोठा वाटा आहे. कैरीच्या लोणच्यामध्ये चव आणण्यासाठी तेल खूप महत्वाचे आहे. त्यामुळे नेहमी चांगल्या दर्जाचे तेल निवडा. उत्तम दर्जाचे मोहरीचे तेल वापरणे हे उत्तम असते. लोणचे बराच काळ टिकण्यासाठी लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल घालावे.
५. लोणचे काढण्याची पद्धत :- आपण कैरीचे लोणचे योग्य पद्धतीने स्टोअर करुन ठेवले आहेत. पण ते काढताना काळजी घेणे फार गरजेचे आहे. लोणचे जास्त दिवस टिकायचे असेल तर स्वच्छतेची काळजी घेतलीच पाहिजे. अस्वच्छ चमच्याने किंवा हाताने लोणचे बाहेर काढणे टाळावे. लोणचे नेहमी हवाबंद डब्यात आणि थंड ठिकाणी स्टोअर करून ठेवावे.