lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food >  ग्रीन् टी विथ लिंबू, हा चहा पावसाळ्यात आजारांपासून ठेवतो दूर, वाचा फायदे

 ग्रीन् टी विथ लिंबू, हा चहा पावसाळ्यात आजारांपासून ठेवतो दूर, वाचा फायदे

एक कप लिंबू घातलेल्या ग्रीन टीमधे काय काय पोषक घटक असतात आणि वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्यांसाठी तो कसा फायदेशीर असतो याचा आरोग्यपातळीवर अभ्यास करण्यात आला आहे. त्वचेच्या समस्येपासून हदयाच्या आरोग्यापर्यंत लिंबू घातलेला ग्रीन टी फायदेशीर असतो असं अभ्यास सांगतो.. तो कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 05:26 PM2021-06-10T17:26:58+5:302021-06-10T17:39:38+5:30

एक कप लिंबू घातलेल्या ग्रीन टीमधे काय काय पोषक घटक असतात आणि वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्यांसाठी तो कसा फायदेशीर असतो याचा आरोग्यपातळीवर अभ्यास करण्यात आला आहे. त्वचेच्या समस्येपासून हदयाच्या आरोग्यापर्यंत लिंबू घातलेला ग्रीन टी फायदेशीर असतो असं अभ्यास सांगतो.. तो कसा?

Green tea with lemon, this tea keeps away from diseases in rainy season, read the benefits |  ग्रीन् टी विथ लिंबू, हा चहा पावसाळ्यात आजारांपासून ठेवतो दूर, वाचा फायदे

 ग्रीन् टी विथ लिंबू, हा चहा पावसाळ्यात आजारांपासून ठेवतो दूर, वाचा फायदे

Highlights वजन कमी करण्यासाठीच्या आहारात लिंबू घातलेला ग्रीन टीचा आवर्जून समावेश करावा असं अभ्यासक सांगतात.ग्रीन टी आणि लिंबू एकत्र सेवन केल्यास त्याचा फायदा मेंदूस होतो असं एक अभ्यास सांगतो. ग्रीन टी आणि लिंबामधे कर्करोगाशी लढणारे घटक असतात. लिंबातील घटक हे शरीरात कॅन्सर पेशींची वाढ आणि प्रसार रोखतात.

लिंबू घालून ग्रीन टी पिणं हा एक सुखद अनूभव आहे. हे असं पेयं आहे जे दिवसातून कधीही पिलं तरी छान वाटतं. उत्तम चवीचा आणि तयार करण्यास अतिशय सोपा असलेला हा चहा कधीही हवाहवासाच वाटतो. पण लिंबू घालून ग्रीन टी फक्त एवढ्याच कारणासाठी प्यायचा असतो का? तर नाही. कारण एक कप लिंबू घातलेल्या ग्रीन टीमधे काय काय पोषक घटक असतात आणि वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्यांसाठी तो कसा फायदेशीर असतो याचा आरोग्यपातळीवर अभ्यास करण्यात आला आहे. आणि हा अभ्यास एक कप लिंबू घालून ग्रीन टी पिल्याने कसे आणि किती फायदे होतात हे सांगतो.

लिंबू घालून ग्रीन टी पिण्याचे फायदे

  • ग्रीन टी आणि लिंबू या दोघांमधेही उच्च प्रमाणात अ‍ॅण्टिऑक्सिडण्टस असतात. हे अ‍ॅण्टिऑक्सिडण्टस दाहाविरुध्द लढतात. शरीरातला दाह हा पेशींवर नकारात्मक परिणाम करतो. संशोधन सांगतं की अ‍ॅण्टिऑक्सिडण्टस हे ह्दय रोग , मधूमेह , कर्करोग आणि स्थूलता या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणीबाणीच्या प्रसंगात महत्त्वाची भूमिका बजावतात.
  •  वजन कमी करण्यासाठीच्या आहारात लिंबू घातलेला ग्रीन टीचा आवर्जून समावेश करावा असं अभ्यासक सांगतात. अनेक अभ्यास हेच सांगतात की ग्रीन टी हा शरीरातील मेद जाळण्यास आणि वजन कमी करण्यास अतिशय फायदेशीर असतो. यासंबंधीच्या जवळ जवळ १५ अभ्यासाचे निष्कर्ष हेच सांगतात की इजीसीजीचं प्रमाण अत्त्युच्य असलेला ग्रीन टी जर १२ आठवडे नियमित प्यायला तर वजन कमी होतं. एका अभ्यासातील ११५ महिलांनी सलग १२ आठवडे लिंबू घालून ग्रीन टी पिला त्यांना त्यांच्या बॉडी मास इंडेक्स हा बराच खाली गेलेला आणि पोटावरची चरबीही कमी झाल्याचं आढळलं.
  •  अनेक अभ्यास सांगतात की ग्रीन टी प्यायल्यानं रक्तातील साखर नियंत्रित राहाते आणि मधुमेह प्रकार २चा धोका टळतो. ग्रीन टी नियमित पिल्यस शरीरातील दाह कमी होतो शिवाय इन्शूलिन वापरण्याची शरीराची क्षमता वाढते. इन्शूलिन हे असं संप्रेरक असतं ते जे रक्तप्रवाहातून पेशींना साखर पाठवतं. एका अभ्यासात मधूमेह प्रकार २ च्या ९२ रुग्णांचा अभ्यास केला गेला गेला. त्यांनी सोळा आठवडे ग्रीन टी घेतला तर त्यांना इन्शुलिनचा प्रतिकार कमी झालेल आढळला. त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहिलेलं आढळलं.
  •  ग्रीन टी आणि लिंबात हदयास उपकारक घटक असतात. लिंबामधे असणाऱ्या सायट्रस फ्लेवोनॉइडस हा घटक दाह थांबवतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांचं काम सुधारतं. आणि कोलेस्ट्रॉची पातळीही नियंत्रित राहाते. एक अभ्यास सांगतो जे नियमितपणे लिंबाचं सेवन करतात त्यांच्यातला रक्तदाबही नियंत्रित राहातो.
  • ग्रीन टी आणि लिंबू एकत्र सेवन केल्यास त्याचा फायदा मेंदूस होतो असं एक अभ्यास सांगतो. आठ अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात की ग्रीन टी घेतल्यानं विस्मरण आणि मेंदूंशी संंबंधित संज्ञात्म समस्या निर्माण होत नाही. तर अनेक अभ्यासात आढळून आलं आहे की अल्झायमरसारख्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या प्रथिनांचं पचन करण्याची क्रिया सुधारते. आणि त्यामूळे अल्झायमरचा धोका कमी होतो.
  •  लिंबात क जीवनसत्त्वं, द्रवस्वरुपात सूक्ष्म पोषक द्रव्यं आणि अ‍ॅण्टिऑक्सिडण्टस असतात. क जीवनसत्त्वं हे रोगप्रतिकारक्षमतेत महत्त्वाची भूमिका बजावतं. लिंबातील घटकांमुळे दाह कमी होऊन रोगप्रतिकारक पेशींचं कार्य सुधारतं. ग्रीन टी सोबत लिंबू घेतल्यास क जीवनसत्त्वं शरीरास मिळतं. त्याचा परिणाम श्वसनसंस्थेस होणाऱ्या संसर्गांना प्रतिबंध होतो. ग्रीन टी आणि लिंबामधील अ‍ॅण्टिऑक्सिडण्टस एकत्रितपणे शरीराच्या रोगप्रतिकारक व्यवस्थेस बळ देतात.

  • ग्रीन टी हा कॅफिन या घटकचा नैसर्गिक स्त्रोत आहे. हा घटक केंद्रिय मज्जासंस्थेस उद्दिपित करतो आणि आपली ऊर्जा वाढते. हा घटक शरीरातला थकवा घालवतो आणि सजगता वाढवतो. शिवाय मेंदूचं संज्ञापन क्रिया आणि शारीरिक क्रिया आणि क्षमताही सुधारते. ग्रीन टी ह लिंबू घालून घेतला तर त्यातील कॅफिन हा घटक कॉफीपेक्षा कमी असतो. त्यामुळे ज्यांना कॉफीतल्या कॅफिनची अ‍ॅलर्जी असते त्यांच्यासाठी लिंबू घातलेला ग्रीन टी फायदेशीर ठरतो.
  •  लिंबू घालून ग्रीन टी घेतल्यास किडनीत किडनी स्टोन होण्यास प्रतिबंध होतो. लिंबात असलेल्या सायट्रिक अ‍ॅसिडमुळेही किडनी स्टोन होण्यास अटकाव होतो. अभ्यास सांगतो की ११८ मिलि लिंबाचा रस सेवन करणं हा किडनी स्टोनवर चांगला उपचार मानला जातो.
  •  ग्रीन टी आणि लिंबामधे कर्करोगाशी लढणारे घटक असतात. लिंबातील घटक हे शरीरात कॅन्सर पेशींची वाढ आणि प्रसार रोखतात. अभ्यास सांगतो की लिंबू घातलेला ग्रीन टी हा मूत्राशय, स्तन आणि प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींपासून रक्षण करतो.
  •  शरीरात ओलावा टिकून राहाण्यास लिंबू घातलेला ग्रीन टी मदत करतो. शरीरातील प्रत्येक अवयवासाठी ओलसरपणा महत्त्वाचा असतो. विशेषत: त्वचा ओलसर राखण्यासाठी, वजन नियंत्रित करण्यासाठी , मेंदूचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी, पचनसंस्थेचं आरोग्य नीट राखण्यासाठी आणि किडनीचं काम नीट होण्यासाठी शरीरात ओलावा राहणं गरजेचं असतं. हा ओलावा लिंबू टाकून ग्रीन टी घेतल्यास उत्तम राखला जातो. पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थ शरीरात गेल्यास किडनी स्टोन, डोकेदुखी, बध्दकोष्ठता या समस्यांपासून सुटका होते.

लिंबू घालून ग्रीन टी कसा कराल?
एक कप पाणी घ्यावं. ते चांगलं उकळावं. उकळलं की गॅस बंद करावा. दोन तीन मिनिटं वाफ निवळू द्यावी आणि मग ते पाणी कपात भरावं. आणि त्यात ग्रीन टी बॅग टाकावी.दोन तीन मिनिटं ती तशीच राहू द्यावी. जर ग्रीन टीची पावडर वापरणार असाल तर एक चमचा साधारणत: दोन ग्रॅम पावडर टाकावी. सर्वात शेवटी एक अर्ध्या लिंबाचा रस त्यात घालावा. स्वादासाठी त्यात मध, दालचिनी, अद्रक किंवा पूदिन्याची पानंही घालता येतात . दिवसातून तीन ते चार कप लिंबू घातलेला ग्रीन टी हा शरीर आतून ओलसर राखण्यास आणि शरीराला इतर फायदे मिळवून देण्यास उपयुक्त मानला जातो.

Web Title: Green tea with lemon, this tea keeps away from diseases in rainy season, read the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.