Join us  

गणपतीच्या नैवैद्यात हवीच २१ भाज्यांची भाजी, मिक्स भाजीचा पारंपरिक टेस्टी प्रकार- करायलाही सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 3:58 PM

Ganesh Chaturthi Special Mix Bhaji Recipe: गणपतीच्या नैवेद्यासाठी २१ भाज्यांची मिक्स भाजी (21 mix vegetable) कशी करायची, त्याची ही अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी 

ठळक मुद्देही भाजी नेमकी कशी करायची आणि त्यात कोणकोणत्या भाज्या असतात, ते पाहूया...

गणेश उत्सव जवळ आला की गणपतीची सजावट, मखर, आरास अशा गोष्टी लक्ष वेधून घ्यायला लागतात. एकदा सजावटीची तयारी झाली की मग वेध लागतात ते नैवेद्याचे. आता गणपतीचा नैवेद्य म्हटलं की मोदक ओघाने आलेच. काही ठिकाणी तळणीचे मोदक असतात, तर काही ठिकाणी उकडीचे मोदक. मोदकाची तयारी झाली की मग घाट घातला जातो तो मुख्य स्वयंपाकाचा. मुख्य स्वयंपाकात अनेक ठिकाणी गणेश स्थापनेच्या दिवशी २१ भाज्यांची मिक्स भाजी केली जाते (Ganesh Chaturthi special mix bhaji recipe). ही भाजी नेमकी कशी करायची आणि त्यात कोणकोणत्या भाज्या असतात, ते पाहूया...(How to do 21 mix vegetable sabji for Ganesh festival)

 

२१ भाज्यांमध्ये कोणकोणत्या भाज्या असतात?या भाज्यांमधे वेलवर्गीय लाल भोपळा, दुधी भोपळा, काकडी, दोडकी, गिलके तसेच वांगी, भेंडी शेंगभाज्याए गवार, घेवडा, वालाच्या शेंगा अशा फळभाज्या तसेच जमिनीखाली वाढणार्‍या बीट, सुरण, मुळा, गाजर, अरबी, बटाटा, तसेच वेगवेगळ्या पालेभाज्या अशा सगळ्या मिळून २१ भाज्यांचा समावेश असतो.

गणेशोत्सव : फक्त ३०० रुपयांहूनही कमी किमतीत घ्या डेकोरेशनचं साहित्य, चमचमता मोदक- एलईडी उंदीर- पाहा पर्याय

रानाभाज्या या दिवसांत भरपूर प्रमाणात मिळतात. त्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असतात. त्या सगळ्याच भाज्या यानिमित्ताने पाेटात जातील, म्हणून या २१ भाज्यांच्या मिक्स भाजीचे तसेच महालक्ष्मी किंवा गौरीच्या स्वयंपाकात १६ भाज्यांच्या मिक्स भाजीचे अतिशय महत्त्व आहे. 

 

२१ भाज्यांच्या मिक्स भाजीची रेसिपी

साहित्य

२१ भाज्यांचा वाटा

५ हिरव्या मिरच्या

शेवटच्या क्षणी घाईघाईत भारी डेकोरेशन करायचंय? घ्या आयडिया, हवी फक्त १ ओढणी- करा आरास भारी 

फोडणीसाठी मोहरी आणि जिरे प्रत्येकी १- १ टिस्पून

१ टिस्पून हळद

चवीनुसार मीठ

तेल

 

रेसिपी

१. कढई गॅसवर तापायला ठेवा आणि त्यात २ पळी तेल टाका. तेल गरम झाले की मोहरी आणि जिरे, हिंग टाकून फोडणी करून घ्या. 

२. त्यानंतर हळद टाकून मिरच्या टाकून परतून घ्या.

गणपती- गौरीसाठी हौशीने साडी नेसली, पण साडी नेसून काम उमजत नाही? ३ टिप्स, भरभर करा कामं

३. मिरच्या परतल्यानंतर मिक्स भाज्या टाका आणि ५ ते ७ मिनिटे परतून घ्या. 

४. भाज्या परतून झाल्यानंतर त्यात २ ते ३ टेबलस्पून पाणी घाला आणि झाकण ठेवून भाजी शिजवून घ्या.

५. भाजी शिजली की त्यात मीठ आणि थोडंसं तिखट घाला.

६. चवीसाठी थोडीशी साखर, धनेपूड, जिरेपूड असंही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. काही जणांना या भाजीत लिंबू पिळलेलेही आवडते. 

 

टॅग्स :गणेशोत्सवगणेश चतुर्थी रेसिपीअन्न