अनेक असे पदार्थ असतात जे आपण लहानपणापासून पाहीले असतात. वापरलेही असतात. (Don't you know these 10 benefits of nutmeg?)पण ते किती औषधी आहेत, हे आपल्याला माहितीच नसते. आयुर्वेदानुसारही ते फार फायदेशीर असतात. जाणून घ्या असाच एक पदार्थ ज्याला औषधी मानले जाते. पण आपल्याला माहितीच नसते. तो पदार्थ म्हणजे जायफळ. आई आपल्याला झोपायच्या आधी कधीतरी जायफळाचे दूध प्यायला सांगते. लहानपणी आपण ते आई सांगते म्हणून मुकाटयाने प्यायचो. (Don't you know these 10 benefits of nutmeg?)तरी त्याचे गुणधर्म आपल्याला माहिती नाहीत. महिलांसाठी तर जायफळ खजिनाच आहे. अगदी स्वस्त दरात मिळणारे जायफळ, मोठ्या महागड्या ट्रिटमेंटपासून आपल्याला वाचवू शकते.
१. जायफळ पचनासाठी फार चांगले. पोट साफ होण्यात जर समस्या असेल तर, जायफळाची पावडर खा. किंवा त्याचा वापर जेवणात करा. (Don't you know these 10 benefits of nutmeg?)
२. पोटात गॅस होतात. कधी-कधी जाता जात नाहीत. जायफळ ब्लोटिंग, गॅस अशा समस्या गायब करते.
३. लहान मुलांना झोपण्यासाठी जायफळ दिले जाते. जायफळामुळे झोप छान लागते. मोठ्या व्यक्तींनाही झोपेचा त्रास असतो. अनेक जण गोळ्या घेतात. त्यापेक्षा जायफळाचे दूध प्या. झोप छान लागेल.
४. जायफळात मायरीस्टिसिन, मॅसेलिग्नन सारखे गुणधर्म असतात. त्यांच्यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते.
५. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठीही जायफळ उपयुक्त ठरते. डोकं शांत राहण्यासाठी जायफळ मदत करते.
६. वजन कमी करण्यासाठी जायफळ पावडर खातात. पोटाची चरबी कमी करण्यासाठी ते मदत करते.
७. त्वचेसाठी जायफळ प्रचंड चांगले असते. त्याच्या पावडरची पेस्ट चेहर्याला लावल्याने चेहरा स्वच्छ होतो. तसेच सतत सेवन केल्यानेही त्वचा चांगली राहते.
८. कॉफीतही जायफळ घालून पितात. त्यामुळे डिप्रेशन ताब्यात ठेवण्यास मदत होते.
९. पाळीत येणारे क्रॅम्प्स कमी करण्यासाठी जायफळ मदत करते. जायफळाची पावडर घालून दूध प्या. जर पाळीत रक्तस्त्राव नीट होत नसेल तरी जायफळ उपयुक्त ठरते.
१०. हृदयासाठीही जायफळ चांगले असते. विविध आजारांपासून वाचवते.
तुमच्याही घरी जायफळ असेलच. त्याचा वापर करा. महिलांच्या आरोग्यासाठी जायफळ फार उपयुक्त आहे.