Join us

करंजी-लाडू-चकली-अनारसे बिघडले तर ऐनवेळी काय कराल? घ्या झटपट टिप्स, पदार्थ चुकला तर घाबरू नका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 17:17 IST

Diwali Food Special : दिवाळीत कधीतरी आपल्याला हमखास जमणारे पदार्थही चुकतात, अशावेळी काय करावं?

ठळक मुद्देकाही ट्रिक्स वापरुन आपण वेळ निभावूनही नेऊ शकतो. तेव्हा हाताशी ठेवा ही लिस्ट..

दिवाळी जवळ आली. घरोघर फराळाची तयारी सुरु झाली. अनेक पदार्थ आपल्याला उत्तम जमतात अनेक फसतात. पदार्थ आहे, हमखास जमणारा पदार्थही कधीकधी चुकूच शकतो. अशावेळी घाबरुन न जाता, टेंशन न घेता काही झटपट ट्रिक्स वापरल्या तर फसलेला पदार्थही उत्तम जमतो. छान खाता येतो. आणि दिवाळीचा आनंद कमी करण्यापेक्षा अशा काही ट्रिक्स वापरुन आपण वेळ निभावूनही नेऊ शकतो. तेव्हा हाताशी ठेवा ही लिस्ट..

(Image : google)

अशावेळी काय करावं?   

१. करंज्या मऊ झाल्या तर सरळ ओव्हनमध्ये खाण्यापूर्वी गरम करुन घ्या. कडक होतील. आणि ओव्हन नसेल तर तवा चांगला तापवून, गॅस मंद करुन, त्यावर ताटलीत ठेवा.. किंवा गॅस बंद करुन डायरेक्ट तव्यावर ठेवा, छान खरपूस लागतील.२. चकलीचं पीठ करताना एकदम मोठा घाट कधीच घालायचा नाही. वाटीभर पीठाच्या आधी चकल्या करा. प्रमाण पहा. मऊ होत असतील तर पीठात थोडं तांदुळ पीठ कालवा. त्यामुळे कुरकुरीत होतील. मोहन म्हणून जे तेल घालाल ते एकदम कडक गरम हवं. म्हणजे चकल्या बिघडत नाही.

३. अनारसे फसत असतील, विरघळत असतील तर पिठात रवा घालून पीठ परत भिजवून रात्रभर बाहेर ठेवा. दुसऱ्यादिवशी अनारसे करा.  ४. चिवडा चामट झाला. वातड झाला हवेत तरी ओव्हनमध्ये खाण्यापूर्वी थोडा गरम करुन घ्या. नाहीतर कढईत जरा परतून घ्या. मस्त कुरकुरीत लागतो. पण लगेच खा.५. पाकातला लाडू भगराळा झाला तर किंचित दुधाचा शिपका देऊन वळा. नाहीतर थोडा पाक करुन पुन्हा त्यात घाला.६. जास्त सैल झाले तर घाबरु नका. थोडं गरम करुन परता.. राहू द्या पाकात लाडू एक पूर्ण दिवस. तो घट्ट होतो. छान मुरतो रवा. लाडू छान लागतो.

टॅग्स :दिवाळी 2022