lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > मश्रूम विकत घेताय? ते ताजे की शिळे कसे ओळखणार? काय काळजी घ्यायची?

मश्रूम विकत घेताय? ते ताजे की शिळे कसे ओळखणार? काय काळजी घ्यायची?

मश्रूम अनेकांना आवडतात पण ते घेताना ताजे-शिळे समजत नाहीत, कुठले पदा‌र्थ कसे खावेत याविषयी प्रश्न पडतात, त्याची ही उत्तरं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:57 PM2021-09-22T16:57:40+5:302021-09-22T17:03:32+5:30

मश्रूम अनेकांना आवडतात पण ते घेताना ताजे-शिळे समजत नाहीत, कुठले पदा‌र्थ कसे खावेत याविषयी प्रश्न पडतात, त्याची ही उत्तरं.

Buying mushrooms? How to recognize fresh or stale? how to select it? | मश्रूम विकत घेताय? ते ताजे की शिळे कसे ओळखणार? काय काळजी घ्यायची?

मश्रूम विकत घेताय? ते ताजे की शिळे कसे ओळखणार? काय काळजी घ्यायची?

Highlightsनुसती बटरवर परतून भाजी, साधी भाजी, सँडविच, उकडलेले कॉर्न घालून चाट असे काही सोपे पदार्थही करता येतात.

नयना पाटील

मश्रुम. ते हल्ली सर्वत्र मिळतात. अनेकांना खूप आवडतातही. हॉटेल्समध्ये जाऊनही मश्रूम मसाला किंवा मश्रूम सूप अनेकजण पितात. आहारात ते असावेच म्हणूनही प्रयत्न केला जातो.
मात्र मश्रूम कोणते उत्तम? ते खरेदी कसे करायचे? ताजे, कोवळे, निबर कसे ओळखायचे? ते कसे खातात? पावसाळ्यात खावेत का? विकत घेताना काय काळजी घ्यायची? फ्रिजमध्ये किती काळ टिकतात?
असे अनेक प्रश्न अनेकींच्या मनात असतात.
भाजीपलीकडे चटचट आणि नाश्त्याला किंवा सायंकाळी त्याचं काय करता येईल असाही प्रश्न पडतो.
मश्रूमच्या अनेक रेसिपी आता ऑनलाइन मिळतात.

मात्र मश्रूमची भाजी करताना, ते विकत घेताना हे काही लक्षात ठेवलेलं उत्तम.
१. पॅक केलेले मश्रूम घेणं तसं सुरक्षित किंवा खात्रीलायक विक्रेता, शेतकऱ्याकडून घ्यावे. त्याचं कारण असं की, उघड्यावर मिळणारे ओळखायला कठीण असतात. ते ताजे की शिळे हे हळूहळू समजते, त्यामुळे सुरक्षित म्हणून पॅक केलेले विकत घेणं उत्तम. त्यावर कधीपर्यंत वापरावेत वगैरे लिहिलेलं असतं.
२. सुटे घेणारच असाल तर मश्रूमचा एक तुकडा तोडून तो आपल्या कानाच्या मागे तोडून लावावा, लालसर होऊन खाज आली थोडी तर ते घेऊ नयेत.
३. पॅक केलेले मश्रुमही स्वछ पांढरे हवेत.

मश्रूमचं करायचं काय?

तर मश्रूमची मसाला भाजी तर करता येतेच. पण
सूप,पुलाव,स्टर फ्राय,सँडविचमध्ये मश्रूम छान लागतात.
त्यापैकीच या काही साध्या कृती..
१. मश्रुम बारीक चिरून बटरवर परतून घ्यावे, पाणी सुकले पाहिजे
त्यात हवा तो मसाला घालावा. अंडी खात असाल तर ते घाला, त्याचे ऑम्लेट होते.
चीझ किसून घातलं, कोबी-गाजर किसून घातलं तर पोटभरीचा नाश्ता होतो.
२. उरलेला भात वापरून फ्राईड राईस
करतोच. त्यात मश्रूम घालावेत. लसूण घालावा. मस्त होतो.
३. नुसती बटरवर परतून भाजी, साधी भाजी, सँडविच, उकडलेले कॉर्न घालून चाट असे काही सोपे पदार्थही करता येतात.

(लेखिका हौशी खाद्यप्रेमी आहेत.)

Web Title: Buying mushrooms? How to recognize fresh or stale? how to select it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.