केस विंचरताना अनेकदा गळतात पण ही सामान्य वाटत असणारी गोष्ट अनेकदा भयंकर समस्या घडवू शकते.(Hair loss Solution) रोज पेक्षा जास्त प्रमाणात केस गळू लागले तर ते त्रासाचे कारण बनते.(Hair Care Tips) वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, केमिकल्स उत्पादन आणि अपुरी झोप, मानसिक त्रासामुळे केसांवर त्याचा परिणाम होतो.(Weight Loss Tips) यामुळे केसगळतीची समस्या वाढू लागते. अनेकदा केसांना पुरेशा प्रमाणात पोषण न मिळाल्यास केस विरळ होऊ लागतात. (Drumstick leaves for hair growth)
डॉक्टर सांगतात शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण मिळाले नाही तर केसगळतीसह वजन देखील वाढते. वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण अनेक व्यायाम व योगा करतो.(Green Leaves Chilla) पण पुरेशा प्रमाणात पोषण न मिळाल्यास वजन भराभर वाढू लागते. पण आपल्या आहारात काही लोहयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास केसगळतीसह वजनही कमी होण्यास मदत होईल.
पोषणतज्ज्ञ लिमा महाजन म्हणतात केसगळती आणि वाढत्या वजनाला नियंत्रित ठेवण्यासाठी आपण लोहाचा आहारात समावेश करायला हवा. ज्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतील. जर आपल्यालाही केसगळतीची समस्या थांबवायची असेल तर ह्या हिरव्या पानांचा पराठा खा. कसा बनवायचा पाहूया.
साहित्य
काळे चणे - १ कप
लाल पोहे - २ चमचे
शेवग्याची पाने - मूठभर
लसूण पाकळ्या - २ ते ३
हिरवी मिरची - १
हिंग - चिमूटभर
जिरे - अर्धा चमचा
मीठ - चवीनुसार
पाणी - गरजेनुसार
गणपती बाप्पाच्या नैवैद्यासाठी करा गुलाबी उकडीचे मोदक, सुंदर गोडगुलाबी मऊ मोदक करण्याची सोपी ट्रिक
कृती
हा पराठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काळे चणे रात्रभर पाण्यात भिजवावे लागतील. त्यानंतर १० मिनिटे लाल पोहे पाण्यात भिजवा. आता एका पॅनमध्ये शेवग्याची पाने, लसूण, हिरवी मिरची आणि हिंग हलके भाजून घ्या. त्यानंतर पोहे, काळे चणे आणि भाजलेल्या सर्व मसाल्यांचे बॅटर तयार करा. वरुन जिरे, मीठ आणि गरजेनुसार पाणी घाला. बेसनाचा पोळा किंवा धिरडे करतो तसा पराठा बनवा. पुदिन्याच्या चटणीसोबत खा.
यात असणारे उच्च लोह आणि प्रथिने केसांसाठी फायदेशीर आहेत. जे केसांना मजबूत बनवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतात. शेवग्याच्या पानांपासून लोह मिळते तर लाल पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे चांगले स्त्रोत असते. तर यामध्ये असणारे घटक शरीराला लोह देते.