आपल्या मुलांच्या पोटात सगळे पौष्टिक पदार्थ जायला हवेत असे प्रत्येक पालकांना वाटते. त्यासाठी मुलांना आवडणारे पदार्थ त्यांना खाऊ घालतात. (Beetroot pink sauce noodles) पालकांना सगळ्यात जास्त टेन्शन असते ते मुलांच्या टिफिनला काय द्यायचे. अनेकदा टिफिन बॉक्समध्ये मुलांच्या आवडीचे पदार्थ नसले की, ते नाक मुरडतात. (Kid-friendly beetroot recipe) अशावेळी मुलांचे वागणं पालकांसाठी डोकेदुखीचे कारण बनते.
मुलांना सतत बाहेरच जंक फूड, पास्ता, पिझ्झा खायला हवा असतो. परंतु, मैद्याचे पदार्थ अगदी कमी वयात मुलांना खाऊ घालताना पालकांना टेन्शन येतं. (Nutritious pasta for toddlers) जर आपली मुले ही खाताना चिडचिड- रडरड करतात किंवा काहीही खायला मागत नसतील. पिझ्झा, पास्ता किंवा नुडल्स खाण्याची सवय असेल तर ट्राय करा बिटाचा पिंक सॉस नुडल्स.यात असणारे प्रोटिन आणि कॅल्शियम मुलांच्या वाढीस उत्तम राहातील. तसेच मैदा नसल्यामुळे त्यांच्या शरीराला कोणतीही हानी होणार नाही. झटपट बनेल बिटाचे पिंक सॉस नुडल्स. (Easy beetroot pasta recipe)
बीट आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीटामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे आढळतात. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. मेंदूचे कार्य आणि चयापचय सुधारते. यात मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते जे मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पाहूयात बिटाचे पिंक सॉस नुडल्स कसे बनतात.
साखर-मैदा न वापरता घरीच बनवा ओट्स खजूर केक, करायला अगदी सोपा आणि मऊमुलायम स्पाँजी
साहित्य
गव्हाचे नुडल्स
बिटाचे तुकडे - १ कप
काजू - ५ ते ६
लसूण पाकळ्या- ३ ते ४
आले - १ इंच
तूप
दूध - १ कप
ऑरिगॅनो
चिली फ्लेक्स
चीज स्लाइस
काळी मिरी पावडर
कृती
1. नुडल्स बनवण्यासाठी पाणी गरम करत ठेवा. त्यात नुडल्स शिजवून चाळणीत गाळून घ्या. ज्यामुळे त्यातील सर्व पाणी बाहेर निघून जाण्यास मदत होईल.
2. त्यानंतर कढई तूप किंवा बटर घाला. त्यात बारीक केलेला लसूण चांगला परतून घ्या. आता एका मिक्सरच्या भांड्यात बिटाचे तुकडे, काजू, लसूण, आले चांगले वाटून पेस्ट तयार करा.
3. फ्राय केलेल्या लसूणमध्ये तयार पेस्ट आणि दूध घालून मिश्रणला उकळी येऊ द्या. आता यात ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि चीज स्लाइस घाला.
4. वरुन काळी मिरी पावडर घालून चांगले ढवळून घ्या, आता यात शिजवलेले नुडल्स घालून वरुन मीठ घाला. नुडल्स तयार मिश्रणात एकजीव करुन मुलांना खाऊ घाला.