Join us

विदर्भाची खासियत रसना तृप्त करणारा पदार्थ डाळ कांदा, चमचमीत पदार्थाची चव चाखून पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2025 11:22 IST

Vidarbha special food: Dal Kanda recipe: Traditional Maharashtrian food: विदर्भातील झणझणीत डाळ कांदा रेसिपी कशी करायची, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

विदर्भातील खाद्यसंस्कृती म्हटलं की सर्वांत आधी आठवण येते ती झणझणीत मसालेदार पदार्थांची.(Vidarbha special food) वऱ्हाडी रस्सा, पिठलं-भाकरी, झुणका यांच्यासोबत लोकप्रिय पदार्थ म्हणजे डाळ-कांदा. पदार्थाची चव अप्रतिम लागते.(Dal Kanda recipe) डाळ-कांदा हा विदर्भातील ग्रामीण संस्कृतीतला पारंपरिक पदार्थ.(Traditional Maharashtrian food) भाजी नसली की हा पदार्थ सहज करता येतो. यामध्ये पौष्टिकता, चव आणि पोटभरले जाईल असे घटक असतात.(Spicy Vidarbha cuisine) यामध्ये उडीद किंवा चणाडाळीचा प्रामुख्याने वापर केला जातो. विदर्भातील झणझणीत डाळ कांदा रेसिपी कशी करायची, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. (Famous food of Vidarbha)

नैवेद्य स्पेशल: कांदा- लसूण न घालता करा मटार बटाट्याची रस्सा भाजी, पाहा ग्रेव्ही करण्याची सोपी पद्धत

साहित्य 

चणाडाळ - १/२ कप कांदे - ३ बारीक चिरलेलेतेल - ४ मोठे चमचे मोहरी - १/२ चमचाजिरे - १ चमचा हिंग - १ चमचा तमालपत्र - १आले-लसूण- कोथिंबीर पेस्ट - १ चमचा हळद - १ चमचा धणेपूड - १ चमचा जिरेपूड - १ चमचा लाल तिखट - १ चमचा काश्मिरी लाल तिखट - १ चमचा काळा मसाला - १ चमचा गरम पाणीमीठ - चवीनुसारकोथिंबीर - आवश्यकतेनुसार

कृती 

1.  सगळ्यात आधी चणाडाळ स्वच्छ धुवून ४ ते ५ तास भिजवा. त्यानंतर कांदे बारीक चिरून घ्या. आता कढई गरम करुन त्यात ४ चमचे तेल घाला. त्यात मोहरी, जिरे, हिंग, तमालपत्र, आलं-लसूण पेस्ट घालून फोडणी चांगली परतवून घ्या. 

2. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला. लालसर होईपर्यंत परतवून घ्या. नंतर झाकण झाकून २ ते ३ मिनिटे वाफ येऊ द्या. नंतर भिजवून घेतलेली चणाडाळ यात घालून परतवून घ्या. मंद आचेवर फ्लेम ठेवून झाकण ठेवा. डाळ वाफेवर अर्धी शिजल्यानेतर त्यात हळद, धणेपूड, जिरेपूड, तिखट, काश्मिरी मिरची पूड, काळा मसाला घालून पुन्हा परवतून घ्या. 

3. यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला. वरुन मीठ घालून पुन्हा झाकण झाका. डाळ शिजल्यानंतर वरुन चिरलेली कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा. 

 

टॅग्स :अन्नपाककृती