Join us

अधिक मास स्पेशल : अनारसे बिघडले-पीठ भुसभुशीत कोरडं झालं तर काय करायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2023 17:01 IST

अधिक मास स्पेशल : अनारसे करणं हे निगुतीचं काम, ते बारकाईने सावकाश करायला हवं.

ठळक मुद्देपीठ कोरडं, भूसभूशीत झालं तर काय करायचं?

ऋचा मोडक

अनारसे आपण अधिक मासात हौशेने करतो, दिवाळीत तर करतोच करतो. अनारसे करणं हे अत्यंत निगुतीचं आणि संयमाचं काम आहे. मात्र अनेकदा काळजी घेऊनही अनारसे फसतात. तळताना विरघळतात. किंवा पीठ फारच भुसभुशीत कोरडं होतं. अशावेळी काय करायचं? अनारसे फसू नयेत आणि बिघडलंच काही तर चटकन दुरुस्त करता यावं म्हणून या काही टिप्स

(Image :google)

अनारसे बिघडतील असं वाटलं तर?

१. गुळ जास्त झाला तर, तळताना तूप व्यवस्थित तापले नसेल तर, पीठ सैल झाले तर अनारसे तुपात विरघळतात.२. पीठ सैल असेल तर तांदूळ पीठ घालावे ते पण मैदा चाळणीवर चाळून घ्यावे.  ३. पीठ घट्ट असेल तर तुपाचा हात लावून मळावे, किंवा खूपच कोरडे वाटत असेल तर केळं (१ ईंचभर तुकडा) कुस्करून मिक्स करावे.  ४. एकदम सगळे पीठ बाहेर काढू नये. नीट जमले की अंदाज घेऊन त्यात हवा तो बदल करता येतो.

पीठ कोरडं, भूसभूशीत झालं तर काय करायचं?

तूप घालताना २ वाटी पीठ असेल तर ४ चमचे पातळ तूप घालावं.अनारसा करताना लागलं तर दूध वापरतात पण पीठ तयार करताना दूध घालू नये पीठ खराब होते.गुळ आणि पीठ कुटून मिक्स करतात म्हणूनच २ दिवस ठेवूनही कोरडं वाटलं तर डब्यात केळीचे पान घालून ठेवा किंवा केळे अख्खे सालासकट ठेवून द्यायचं. पीठ मऊ होतं १-२ दिवसात.

 

टॅग्स :अन्न