lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > स्टफ पराठा देताना फुटतो, पोळपाटाला चिकटतो? ५ टिप्स, पराठा लाटा झटपट...

स्टफ पराठा देताना फुटतो, पोळपाटाला चिकटतो? ५ टिप्स, पराठा लाटा झटपट...

Top 5 Tips To Make Stuffed Paranthas Without Breaking : पराठ्यात सारण भरून लाटले की सगळा चिकटा होतो, त्यासाठीच या खास टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2023 03:26 PM2023-06-21T15:26:46+5:302023-06-21T15:47:59+5:30

Top 5 Tips To Make Stuffed Paranthas Without Breaking : पराठ्यात सारण भरून लाटले की सगळा चिकटा होतो, त्यासाठीच या खास टिप्स

5 Smart Tips To Make Perfect Stuffed Parathas Without Breakage | स्टफ पराठा देताना फुटतो, पोळपाटाला चिकटतो? ५ टिप्स, पराठा लाटा झटपट...

स्टफ पराठा देताना फुटतो, पोळपाटाला चिकटतो? ५ टिप्स, पराठा लाटा झटपट...

'पराठा' हा पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचा आणि सहज झटपट होणारा आहे. पराठा हा एकमेव असा पदार्थ आहे की जो आपल्यात काहीही सामावून घेऊ शकतो.  आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्टफिंग पराठ्यांमध्ये भरून पराठे बनवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा बटाट्याचे सारण भरून तसेच चीज, पनीर यांचा वापर करून पौष्टिक पराठा बनवू शकतो. यामुळे काहीतरी वेगळं खाल्ल्याचा आनंदही मुलांना होतो तसेच यानिमित्ताने मुलांच्या पोटात पौष्टिक पालेभाज्या देखील जातात. 

आपल्यापैकी बऱ्याचजणांना सकाळच्या नाश्त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गरमागरम पराठे खायला आवडतात. आपण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे नाश्त्याला किंवा जेवणाला बनवतो. हे गरमागरम पराठे नारळाच्या चटणीसोबत किंवा दही, सॉससोबत खाण्यासाठी चांगले लागतात. आतापर्यंत आपण नाश्त्याला आलू पराठा, मेथी पराठा, पालक पराठा असे अनेक पराठ्यांचे प्रकार आपण खाल्लेच असतील. काहीवेळा घरी काही भाजी नसली किंवा काही वेगळं खावंसं वाटलं तर आपण झटपट बनून तयार होणारा पराठा लगेच बनवतो. काही पराठयांचें प्रकार असे असतात की जे बघताच आपल्या तोंडाला पाणी सुटत. चपाती सारखे गव्हाचे कणिक मळून त्याच्या आत आपल्याला हवे तसे भाज्यांचे स्टफिंग भरून पौष्टिक पराठा बनवता येतो. पराठा बनवताना त्याच्या आत आपण कोणत्या प्रकारचे स्टफिंग भरतो यावर त्या पराठ्याची चव ठरते. पराठ्यात जितके स्टफिंग भरले जैन तितकाच तो पराठा चविष्ट लागतो. परंतु काहीवेळा पराठे लाटताना ते फाटले जातात. असे फाटलेले पराठे खाण्यात काहीच मजा उरत नाही. त्यामुळे पराठा फाटू नये यासाठी काही महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवू(5 Smart Tips To Make Perfect Stuffed Parathas Without Breakage).

पराठा लाटताना फाटू नये यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवू... 

१. कणिक मळताना काळजी घ्यावी :- स्टफिंगने भरलेले पराठे बनवताना मळलेली कणिक परफेक्ट असावी. कणिक खूप मऊ किंवा खूप घट्ट मळू नये. अर्धा वाटी मैद्याच्या पिठात एक कप गव्हाचे पीठ मिसळल्यास पराठ्यासाठीची परफेक्ट कणिक मळून होते. याचबरोबर पराठ्यांची कणिक मळताना तेल किंवा तूप आणि एक चमचा मीठ घालावे. कोमट पाण्याच्या मदतीने कणिक मळून घ्यावी तसेच कणिक मळून झाल्यानंतर सुमारे १५ मिनिटे कणिक तशीच झाकून ठेवावी. यामुळे कणकेत घातलेलं तेल, तूप मुरण्यास मदत होते व कणिक व्यवस्थित भिजून तयार होते. 

थालीपीठ करायचं पण भाजणीचं पीठच नाही? झटपट करा मिक्स पिठांचे खमंग मेथी थालीपीठ, पौष्टिक आणि पोटभर...

२. पराठ्यांचे सारण व्यवस्थित बनवा :- बटाटा किंवा मटारचे सारण तयार करताना लक्षात ठेवा की  भाजीचे पाणी उकळल्यानंतर चांगले गाळून घेतले आहे भाजीमध्ये पाणी उरले असेल तर मॅश करण्यापूर्वी पॅनमध्ये मंद आचेवर किंचित हलकेच परतून घ्यावे, जेणेकरून त्यातील पाण्याचा अंश संपूर्णपणे निघून जाईल. पाण्याचा अंश संपूर्णपणे निघून गेल्यानंतर या सर्व भाज्या व्यवस्थित मॅश करून घ्याव्यात. यामुळे सारण पाहिजे तेवढे सुके बनते तसेच आणि  सारणात ओलावा नसल्यामुळे पराठा लाटताना फाटत नाही.  

दिवसभर मुलांचा दंगा, काहीतरी खायला दे अशी भूणभूण? करा चीज पराठा, सुटीचा स्पेशल बेत....

सकाळी नाश्त्याला घाईत फक्त १० मिनिटांत करा झटपट ‘मसाला पराठा’, चव उत्तम-नाश्ता पोटभर...

३. सारण भरताना घ्या काळजी :- पराठ्याचे सारण व्यवस्थित बनून तयार झाले की ते कणकेमध्ये योग्य पद्धतीने भरून पराठा लाटला पाहिजे. पराठ्याचे सारण भरताना कणकेची मध्यम गोल आकाराची पोळी लाटून घ्यावी. पोळी लाटून घेतल्यानंतर, त्या पोळीच्या बरोबर मधोमध सारण भरावे. सारण भरताना ते अधिक जास्त किंवा खूपच कमी प्रमाणात भरू नये. सारण भरून घेतल्यानंतर, कणकेचा व्यवस्थित गोळा करून घ्यावा. सारण भरलेल्या कणकेचा गोळा तयार करताना त्याचे तोंड नीट बंद होईल याची काळजी घ्यावी. कणकेच्या गोळ्याचे तोंड नीट बंद करून मगच पराठा लाटायला घ्यावा, यामुळे पराठा फुटून त्यातील सारण बाहेर येत नाही. 

४. लाटण्याचा जास्त वापर करु नका :- जर तुम्हाला पराठ्यांमध्ये जास्त सारण आवडत असेल तर ते बनवताना सर्वप्रथम हाताने दाबून पसरवा. हाताने चहूबाजूंनी पसरून त्यात थोडे पीठ घालून शेवटी लाटण्याने लाटावे. असे केल्याने पराठा फुटणार नाही. पराठा लाटताना लाटणे जास्त वापरू नका शक्य होईल तितका हाताने पराठा हलकेच दाबून त्याला गोल आकार देण्याचा प्रयत्न करावा. तसेच पराठा हाताने दाबून गोल करताना एका प्लास्टिकवर ठेवून मग तो हलकेच दाबून पसरावा यामुळे प्लास्टिकच्या मदतीने पराठा कुठेही न चिकटता व्यवस्थित गोल लाटून तयार होतो. 

५. पराठा लाटताना मैद्याचा वापर करावा :- स्टफ केलेला पराठा बनवताना, सारण भरून पराठ्याचा गोळा तयार झाल्यावर पराठा लाटताना त्याच्या आजूबाजूला मैदा भुरभुरवून घ्यावा. त्यामुळे पराठा लाटणे सोपे होईल. यानंतर, पीठ हलके दाबा आणि हळूहळू पसरवा. त्यामुळे पराठा फुटण्याची आणि सारण बाहेर येण्याची समस्या उद्भवणार नाही.

Web Title: 5 Smart Tips To Make Perfect Stuffed Parathas Without Breakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न