lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > उकडीच्या तांदळाचे काय करतात, फक्त  इडली? उकडीच्या तांदळाचा भात खा, त्याचे 5 फायदे

उकडीच्या तांदळाचे काय करतात, फक्त  इडली? उकडीच्या तांदळाचा भात खा, त्याचे 5 फायदे

आपल्या पांढर्‍या भातापेक्षा गुणवत्तेनं उकडा तांदूळ कैकपटीनं उत्कृष्ट असला तरी आपल्या आहारात उकडा तांदूळ असतो तो फक्त इडली डोसे करण्यापुरताच. आरोग्यासाठी उकडीचा तांदूळ रोज खाण्याचा सल्ला दिला जातो तो त्यातील गुणधर्मामुळेच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 07:17 PM2021-10-20T19:17:28+5:302021-10-21T12:44:16+5:30

आपल्या पांढर्‍या भातापेक्षा गुणवत्तेनं उकडा तांदूळ कैकपटीनं उत्कृष्ट असला तरी आपल्या आहारात उकडा तांदूळ असतो तो फक्त इडली डोसे करण्यापुरताच. आरोग्यासाठी उकडीचा तांदूळ रोज खाण्याचा सल्ला दिला जातो तो त्यातील गुणधर्मामुळेच.

5 Benefits of eating parboiled rice.. It's more healthy than usual white rice | उकडीच्या तांदळाचे काय करतात, फक्त  इडली? उकडीच्या तांदळाचा भात खा, त्याचे 5 फायदे

उकडीच्या तांदळाचे काय करतात, फक्त  इडली? उकडीच्या तांदळाचा भात खा, त्याचे 5 फायदे

Highlightsउकडा तांदूळ तयार करताना धान आधी उकळलं जातं त्यामुळे तांदळाच्या गुणधर्मात बराच बदल होतो.उकडीच्या तांदळात पांढर्‍या तांदळाच्या तुलनेत प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं.उकडीचा तांदूळ करताना धान जेव्हा उकळलं जातं तेव्हा धानातील पोषक घटक तांदळात समाविष्ट होतात.

 तांदळाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारच्या तांदळाचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. उकडा तांदूळ हा तांदळाचा प्रकार सर्वांनाच परिचित आहे. पण त्याचे गुण, त्याचे फायदे याची माहिती मात्र नसते. म्हणूनच उकडा तांदूळ आपल्याकडे फारच मर्यादित कारणांसाठी वापरला जातो. आपल्या पांढर्‍या भातापेक्षा गुणवत्तेनं उकडा तांदूळ कैकपटीनं उत्कृष्ट असला तरी आपल्या आहारात उकडा तांदूळ असतो तो फक्त इडली डोसे करण्यापुरताच. आरोग्यासाठी उकडीचा तांदूळ रोज खाण्याचा सल्ला दिला जातो तो त्यातील गुणधर्मामुळेच.

Image: Google

उकडा तांदूळ म्हणजे?

उकडा तांदूळ हा जसा आपण मर्यादित प्रमाणात वापरतो तशीच मर्यादित स्वरुपातच आपल्याला उकडा तांदुळाची माहिती असते. उकडा तांदूळ तयार करण्याची पध्दत आपल्या नेहेमीच्या पांढर्‍या तांदळापेक्षा वेगळी असते. धानापासून थेट तांदुळ काढला जातो तो आपला नेहेमीचा पांढरा तांदूळ. पण उकडीचा तांदूळ करताना आधी धानाला पहिले उकळलं जातं. म्हणजे वाफेवर हलक्या स्वरुपात तो शिजवला जातो. त्यानंतर हे धान उन्हात सुकवला जातो. सुकल्यानंतर धान पहिल्यासारखं कडक होतं. त्यानंतर या धानातून तांदूळ काढला जातो. या तांदळाचा रंग हलका पिवळसर असतो. यालाच ‘गोल्डन राइस’ही म्हटलं जातं.

Image: Google

उकडीच्या तांदळाचे गुणधर्म

1. उकडा तांदूळ तयार करताना धान आधी उकळलं जातं त्यामुळे तांदळाच्या गुणधर्मात बराच बदल होतो. नेहेमीच्या पांढर्‍या तांदळात कर्बोदकांचं प्रमाण खूप असतं. त्यामुळे जी लोकं अंगमेहनतीचं काम करत नाही त्यांनी या पांढर्‍या तांदळाचा भात रोज खाल्ला तर त्याचा आरोग्यावर आणि वजनावर प्रतिकूल परिणाम होतो. पण याच्या उलट गुणधर्म उकडा तांदळाचा असतो. उकडा तांदळात नेहेमीच्या पांढर्‍या तांदळापेक्षा कमी कॅलरीज असतात. 155 ग्रॅम उकडा तांदळात 194 ग्रॅम कॅलरीज असतात तर पांढर्‍या तांदळात 205 ग्रॅम कॅलरी असतात. तसेच कर्बोदकाचं प्रमाणही उकडा तांदळात 41 ग्रॅम असतं तर फायबरचं प्रमाण एक ग्रॅम असतं तर पांढर्‍या तांदळात 45 ग्रॅम कर्बोदकं आणि अर्धा ग्रॅम फायबर असतं. ही दोन गुणधर्म बघता पांढर्‍या तांदळापेक्षा उकडीचा तांदुळ खाणं योग्य मानलं जातं.

2. आरोग्यासाठी प्रथिनं सर्वात महत्त्वाची मानली जातात. उकडीच्या तांदळात पांढर्‍या तांदळाच्या तुलनेत प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. 155 ग्रॅम उकडा तांदळात 5 ग्रॅम प्रथिनं असतात तर पांढर्‍या तांदळातून 4 ग्रॅम प्रथिनं मिळतात.

3. उकडीच्या तांदळात ब1, ब6 आणि ब3 हे जीवनसत्त्व पांढर्‍या तांदळाच्या तुलनेत दुप्पट असतं.4. उकडीच्या आणि पांढर्‍या तांदळात लोहाचं प्रमाण सारखं असलं तरी मॅग्नेशियम, झिंकचं प्रमाण उकडीच्या तांदळात जास्त असतं.

Image: Google

4. उकडीचा तांदुळ खाल्ल्यानं शरीराला स्फूर्ती जास्त मिळते. याचं कारण कर्बोदकं नसून या तांदळातील ब1, ब3 आणि ब6 या जीवनसत्त्वांची विपुलता हे आहे. ब जीवनसत्व शरीराच्या स्फूर्ती आणि उत्साहासाठी महत्त्वाचं असतं.

5. उकडीचा तांदूळ करताना धान जेव्हा उकळलं जातं तेव्हा धानातील पोषक घटक तांदळात समाविष्ट होतात. या प्रक्रियेमुळे तांदळातील कर्बोदकांचं प्रमाण मात्र कमी होतं. त्यामुळे उकडीचा तांदूळ जास्त गुणकारी होतो.

Web Title: 5 Benefits of eating parboiled rice.. It's more healthy than usual white rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.