उन्हाळ्यात आपण सगळेच हिरव्यागार शहाळ्याचे पाणी पिणे पसंत करतो. उन्हाळा आणि शहाळ यांचं पूर्वीपासूनचे एक अतूट नाते आहे. घामाने अंग भिजलेले असताना थंडगार, गोड शहाळ (4 Things To Add In Coconut Water To Increase Nutrients) फोडून त्यात स्ट्रॉ घालून पिण्याची मजा आपण सगळ्यांनीच अनुभवली असेल. रणरणत्या उन्हांमुळे आलेला शारीरिक थकवा दूर करण्याचे सर्वात मोठे काम शहाळाचे पाणी करते. शहाळ (4 things to add to coconut water to boost its nutritional value) पिऊन झाल्यावर त्यातील मऊ, लुसलुशीत मलई खाणे म्हणजे स्वर्गसुखच. उन्हाळ्यांत शहाळाचे पाणी पिण्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात.
उन्हाळ्याचा हंगाम सुरु झाला की अशावेळी आपल्याला खूप तहान लागते, घसा कोरडा पडतो. त्याचबरोबर अनेकदा लोक डिहायड्रेशनचे बळी ठरतात. त्यामुळे या ऋतूत शरीर हायड्रेटेड ठेवणं खूप गरजेचं आहे. उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण शहाळाचे पाणी तर आवर्जून पितोच. शहाळ्याच्या पाण्यांत अधिक पोषणमूल्य आणि व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतातच, परंतु शहाळ्याच्या पाण्यात काही गोष्टी मिसळून प्यायले असता या पाण्याचे पौष्टिक मूल्य दुपटीने वाढते. आहारतज्ज्ञ गीतांजली सिंग (एम.एस.सी फूड अँड न्यूट्रिशन) यांनी onlymyhealth.com ला दिलेल्या मुलाखतीनुसार, आपण शहाळ्याच्या पाण्यांत कोणकोणते पदार्थ मिसळून त्याची पौष्टिकता वाढवू शकतो, ते पाहूयात.
शहाळ्याच्या पाण्यांत मिसळा 'हे' ४ पदार्थ...
१. लिंबाचा रस :- शहाळ्याच्या पाण्यांत लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने त्याची चव तर वाढतेच पण त्याचे फायदेही दुपटीने वाढतात. शहाळ्याच्या पाण्यांत आढळणारे सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आणि लिंबूमधील व्हिटॅमिन 'सी' शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. शहाळ्याच्या पाण्यांत लिंबू मिसळून प्यायल्याने शरीराची पीएच पातळी संतुलित होण्यास मदत होते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला इलेक्ट्रोलाइट्स मिळतात.
मलायका अरोराच्या परफेक्ट फिगरचे सीक्रेट, सकाळी 'हा' कपभर चहा पिते रोज...
२. चिया सीड्स :- शहाळ्याच्या पाण्यांत चिया सीड्स मिसळून प्यायल्याने त्याचे फायदे वाढतात. चिया सीड्समध्ये फायबर व्यतिरिक्त, त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात. हे प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि बराच वेळ भूक लागत नाही. चिया सीड्स भरपूर पाणी शोषून घेतात, ज्यामुळे शरीराला बराच काळ हायड्रेट राहण्यास मदत होते. शहाळ्याच्या पाण्यांत चिया सीड्स मिसळून प्यायल्याने शरीराला अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म दोन्ही मिळतात. यामुळे पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
विराट कोहलीच्या पोषणतज्ज्ञांनी सांगितली खास युक्ती, ४ सवयी फक्त बदला-फिटनेस मिळवा कोहलीसारखा!
३. मध :- शहाळ्याच्या पाण्यांत मध मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणि पचन दोन्ही सुधारते. मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स, एंजाइम आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. जेव्हा हे गुणधर्म शहाळ्याच्या पाण्यातील खनिजांशी एकत्रित होतात तेव्हा ते रोग आणि संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत करतात. शहाळ्याचे पाणी आणि मध एकत्रित प्यायल्याने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत होते.
४. काळे मीठ :- शहाळ्याच्या पाण्यांत काळे मीठ मिसळून प्यायल्याने शरीराला सोडियम, लोह आणि सल्फर सारखे खनिजे मिळतात. शहाळ्याच्या पाण्यांत काळे मीठ घातल्याने, शहाळ्याच्या पाण्यांत असलेले इलेक्ट्रोलाइट्स ते एक परिपूर्ण एनर्जी ड्रिंक बनविण्यास मदत करतात. हे प्यायल्याने पचनक्रियेलाही फायदा होतो. कारण, हे पेय शरीरातील अॅसिड कमी करुन पचनक्रियेचा वेग वाढवतात. रक्तदाब असलेल्या लोकांनी मीठ घालणे टाळावे.