Join us

ओट्सचे २ चविष्ट पदार्थ, आपण बेचव ओट्स खातो आहोत हे खरेच वाटणार नाही इतके स्वादिष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2025 18:45 IST

2 delicious oatmeal recipes, so delicious that you won't regret trying : ओट्स आवडत नाहीत ? या पद्धतीने तयार करा, नक्की आवडतील.

 आपण वजन कमी करण्यासाठी मन मारून बेचव पदार्थ खातो. तळलेल्याऐवजी परतलेले खातो. शिजवलेल्याऐवजी उकडलेले खातो. (2 delicious oatmeal recipes, so delicious that you won't regret trying )भाताऐवजी भाकरी खातो. तसेच नाष्ट्यासाठी ओट्स खायला सुरवात करतो. पण फार काळ तो प्रकार जमत नाही कारण, ओट्स फारच बेचव लागतात. (2 delicious oatmeal recipes, so delicious that you won't regret trying )हेल्दी पदार्थांना चविष्ट करून खाण्यात मज्जाच काही वेगळी आहे. ओट्ससुद्धा चविष्ट लागू शकतात. विश्वास नाही बसत? मग या दोन रेसिपी तयार करून बघाच.    

१. ओट्स चिला(2 delicious oatmeal recipes, so delicious that you won't regret trying )साहित्यओट्स, पाणी, मिरची, कांदा, गाजर, टोमॅटो, बेसन, मीठ, दही, आलं लसूण पेस्ट, तेल किंवा तूप

कृती१. पंधरा मिनिटांसाठी ओट्स भिजवत ठेवा. त्यामध्ये नंतर बारीक चिरलेला कांदा घाला. त्यात आल लसूण पेस्ट घाला. चवीनुसार मीठ घाला. मिरची बारीक चिरून घाला. गाजर मस्त किसून घाला. अगदी दोन चमचे दही घाला. टोमॅटोही चिरून घाला. बेसन घाला. पाणी घाला. सगळं मिक्स करून घ्या. बेसन अति वापरू नका. सगळं एकजीव होण्यापूरतंच बेसन वापरा. २. पाणी जास्त घालायचं नाही. थोडसं घट्टच ठेवा. अति पातळ झाल्यावर भाज्या आणि पीठ वेगळं होऊन जाईल.  ३. गॅसवर पॅन ठेवा. त्याला थोडं तेल लावा. तूप वापरलेत तरी उत्तम. आता तयार मिश्रणाचे चिले घालून घ्या. पलटून दोन्ही बाजूंनी  मस्त शिजवून घ्या. आवडत्या चटणीशी लावून खा. 

२. ओट्सची खीरसाहित्यओट्स, गूळ, गाजर, दूध, सुकामेवा, तूप

कृती१. एका पातेल्यात चमचाभर तूप घ्या. त्यामध्ये सुकामेवा परतून घ्या.२. सुकामेवा छान पैकी परतून झाला की, त्यात गाजर किसून घाला. तेही व्यवस्थित परतून घ्या. ३. सगळं छान परतून झालं की त्यात दूध घाला. वाटीभर ओट्स घाला. ते व्यवस्थित शिजू द्या. मग त्यात चवी एवढाच गूळ घाला. खीर झाकून उकळवा. थोड्यावेळाने ती जरा घट्ट होईल. मग गॅस बंद करून टाका. ४. तुम्हाला अजूनही जास्त लो-फॅट तयार करायचे असेल तर, गूळाऐवजी मध घाला. खीर पूर्ण शिजल्यावर वाढून घेताना त्यात मध घालायचे.